Sugar Rate : वाढत्या उन्हाबरोबर साखर उद्योगाचाही वाढला गोडवा, नेमका परिणाम काय ?

वाढत्या उन्हामुळे नागरिकांचा अंगाची लाहीलाही होत असली तरी साखर उद्योगामध्ये याच वाढत्या उन्हामुळे शीतपेयांना अधिकची मागणी वाढत आहे. त्याचाच परिणाम आता दरावर दिसून येऊ लागला आहे. साखरेचे उत्पादन आणि वाढीव उन्हामुळे निर्माण झालेली परस्थिती यामुळे सरकारने एप्रिल महिन्याचा कोटा देखील 22 लाख टनाचा दिला आहे. तर मार्चमध्ये हा कोटा 21.5 लाख टनाचा होता.

Sugar Rate : वाढत्या उन्हाबरोबर साखर उद्योगाचाही वाढला गोडवा, नेमका परिणाम काय ?
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 5:20 AM

पुणे : वाढत्या उन्हामुळे नागरिकांचा अंगाची लाहीलाही होत असली तरी साखर उद्योगामध्ये याच वाढत्या (Summer Season) उन्हामुळे  (Cold drink) शीतपेयांना अधिकची मागणी वाढत आहे. त्याचाच परिणाम आता दरावर दिसून येऊ लागला आहे. (Sugar Production) साखरेचे उत्पादन आणि वाढीव उन्हामुळे निर्माण झालेली परस्थिती यामुळे सरकारने एप्रिल महिन्याचा कोटा देखील 22 लाख टनाचा दिला आहे. तर मार्चमध्ये हा कोटा 21.5 लाख टनाचा होता. यंदा साखरेचे उत्पादन वाढताच वेगवेगळ्या माध्यमातून मागणीही वाढत आहे. कोरोनाच्या अनुशांगाने लादण्यात आलेले सर्व नियम शिथिल करण्यात आल्याने बाजारपेठा आता फुलत आहे. याचा परिणामही साखर मागणीवर झालेला आहे.

शीतपेय उद्योगामध्ये मोठी उलाढाल

वाढत्या उन्हामुळे शीतपेयासह अन्य उद्योगातून साखरेला मागणी वाढत आहे. याचाच अंदाज बांधत केंद्र सरकारने या महिन्यासाठीचा वाढीव कोटो ठेवला आहे. शिवाय कोरोनाचा धोका थोडक्यात संपल्यानेच बाजारपेठेत वर्दळ निर्माण होत आहे. सार्वजनिक कार्यक्रमात नागरिकांची संख्या ही वाढत असल्यामुळे उद्योगधंदे हे आता उभारी घेऊ लागले आहेत. या सर्वांचा परिणाम थेट साखरेच्या मागणीत होत आहे. यापूर्वी वाढीव उत्पादन आणि आता योग्य दरही त्यामुळे साखर उत्पादनातून समाधान व्यक्त केले जात आहे.

साखरेला 3 हजार 200 ते 3 हजार 300 रुपये प्रति क्विंटलचा दर

गेल्या दोन वर्षात उन्हाळ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शीतपेय ही सर्व बंद होते. त्यामुळे मागणीत घट झाली होती. यंदा मात्र, सर्वकाही पूर्ववद सुरु झाले आहे. सध्या देशांतर्गत बाजारात साखरेला 3 हजार 200 ते 3 हजार 300 असा दर सुरु आहे. यातच एप्रिल महिन्यातही कडक ऊन राहणारच आहे. त्यामुळे आईसक्रीम, शीतपेय यासाठी साखरेच्या मागणीत वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱ्यांनी साखर खरदीवर भर दिला होता.

तिसऱ्या लाटेचा धसका मात्र, सर्व निर्बंध शिथील

गेल्या दोन वर्षापासून ऐन उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला होता. यंदाही तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे व्यापऱ्यांसह व्यवसायिक हे थंडच होते. पण आता कोरोनाचा धोका टळलेला आहे. शिवाय बाजारपेठा, हॉटेल्स, लहान-मोठे व्यवसाय हे सुरु झाल्याने साखरेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचअनुशंगाने पावले उचलली जात आहेत. आता सर्व निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ साखरेवरच नाही तर अन्य घटकांवरही परिणाम होत आहे.

संबंधित बातम्या :

मोहीम फत्ते : कृषी विभागाचे आवाहन अन् शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने मिटला खरिपाचा प्रश्न, बियाणाच्या बाबतीत शेतकरी आत्मनिर्भर

Latur Market : हरभऱ्याची आवकही वाढली अन् दरही, शेतकऱ्यांचे लक्ष सोयाबीनवरच

Drone Farming : ड्रोन शेतीमध्ये सुविधांपेक्षा अडचणी अधिक, शेतकऱ्यांसमोर काय आहेत अडचणी?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.