दुग्धजन्य पदार्थामुळे का होईना दुधाचे भाव वाढले, खासगी डेअरी चालकांचा निर्णय

दुधावर प्रक्रिया करुन जे पदार्थ बनविले जातात त्याच्यामुळे का होईना दुधाच्या दरात वाढ होत आहे. ऐन दिवाळीमध्येच दरात दोन रुपयांची घट करण्याचा निर्णय खासगी दुध संघाकडून घेण्यात आला होता. मात्र, आता दुध भुकटी आणि लोण्याचे भाव वाढल्याने गायीच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय खासगी डेअरी चालकांकडून घेण्यात आला आहे.

दुग्धजन्य पदार्थामुळे का होईना दुधाचे भाव वाढले, खासगी डेअरी चालकांचा निर्णय
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 12:44 PM

पुणे : दुधावर प्रक्रिया करुन जे पदार्थ बनविले जातात त्याच्यामुळे का होईना (Milk Prices) दुधाच्या दरात वाढ होत आहे. ऐन दिवाळीमध्येच दरात दोन रुपयांची घट करण्याचा निर्णय खासगी दुध संघाकडून घेण्यात आला होता. मात्र, आता (Dairy products) दुध भुकटी आणि लोण्याचे भाव वाढल्याने गायीच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय खासगी डेअरी चालकांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे ही वाढ नसून जैंसे थे असेच भाव झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. बरोबर 20 दिवसांपूर्वीच दुधाच्या दरात 2 रुपयांची घट करण्यात आली होती तर आता वाढ करण्यात आली आहे.

दुधापासून बनविण्यात येणाऱ्या दुभ भुकटी आणि लोणी याचे दर वाढले आहेत. त्यामुळे दुधाचे दरवाढीला वाव होता. त्याअनुशंगाने खासगी दुध डेअरी चालकांमध्ये चर्चा होती. अखेर त्याला मूर्त स्वरुप मिळाले आहे.

गायीच्या दुधाला आता 26 रुपयांचा दर

दिवाळीपूर्वीही गाईच्या दुधाचा दर हा 26 रुपयेच होता. मात्र, यामध्ये 2 रुपयांची घट करण्यात आली होती. ऐन दिवाळीत दुधाला मागणी वाढत असतानाच खासगी दुध संघांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आता दुधाच्या साईड प्रॅाटक्टच्या मागणीत वाढ झाली आहे. लोणी आणि दुधाच्या भुकटीची मागणी वाढली असल्याने दुध दर वाढीला अनुकूल वातावरण तयार झाल्याने हा निर्णय खासगी डेअरी चालकांनी घेतला होता. मध्यंतरीची घट आणि आता वाढ यामुळे या वाढीचा फारसा परिणाम होणार नाही.

खासगी व्यवसायातील स्पर्धेचाही दरावर परिणाम

सहकारी दुध संघापेक्षा खासगी डेअरींची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुधाच्या दर्जाप्रमाणे दरही मिळत आहे. मात्र, दुधाचे अधिकचे संकलन करण्यासाठी खासगी दुध डेअऱ्यांची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एका गावात 3 ते 4 खासगी दुध डेअऱ्या आहेत. त्यामुळे वाढत्या स्पर्धेमुळेही दर वाढीची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात एकूण उत्पादनापैकी खासगी दुध डेअऱ्यांकडून 70 टक्के दुध खरेदी केले जाते. दुधाचे दर वाढण्यास अणखीन पोषक वातावरण असून काही दिवसांमध्ये 2 रुपयांनी वाढीची शक्यता असल्याचे दुग्धविकास सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश कुतवळ यांनी सांगितले आहे.

लॅाकडाऊननंतर मागणी होतेय सुधारणा

मध्यंतरी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे दुध आणि दुधापासून होणाऱ्या पदार्थांनाही मागणी नव्हती. त्या दरम्यानच्या कालावधीत 30 टक्केपर्यंत घट झाली होती. पण आता हळूहळू मागणीत सुधारणा होत आहे. विशेषत: दुधापासून बनविण्यात येणाऱ्या इतर पदार्थांची मागणी वाढत आहे. त्याचाच फायदा आता दूध उत्पादकांना होत आहे.

संबंधित बातम्या :

पपईला वेगळा पर्यांय निवडला मात्र तोही फसला, मग शेतकऱ्याने उभ्या पिकावरच नांगर फिरवला

आतापर्यंत घडले नाही ते घडतंय यंदाच्या रब्बी हंगामात, मग कशाला भासतेय पाण्याची टंचाई?

ठिबक सिंचनास वाढीव अनुदान म्हणजे, पुढचे पाठ.. मागचे सपाट ; काय आहे नेमका प्रकार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.