कांद्याचा वांदा : खरीपातील कांद्याची लागवड जोमात, काय राहतील भविष्यात दर?
मध्यंतरी झालेल्या पावसामुळे (Rain Damage) कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी आता दरात वाढ होत आहे. तर दुसरीकडे खरीपात लागवड केल्या जाणाऱ्या कांद्याच्या रोपाचेही नुकसान झाले आहे. असे असतानाही महागडे कांद्याचे रोप आणि बी घेऊन कांदा लागवडीचा सपाटाच राज्यात सुरु आहे.
लातूर : कांदा (Onion) हे एक पीक आहे ते कधी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणते तर कधी ग्राहकांच्या. सध्या वेळ आहे ती ग्राहकांची. कारण किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 70 रुपये किलोवर गेलेले आहेत. मात्र, कांद्याच्या दरात किती दिवस स्थिरता राहते हे केवळ उत्पादकालाच नाही तर ग्राहकांना देखील अंदाज आलेला आहे.
मध्यंतरी झालेल्या पावसामुळे (Rain Damage) कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी आता दरात वाढ होत आहे. तर दुसरीकडे खरीपात लागवड केल्या जाणाऱ्या कांद्याच्या रोपाचेही नुकसान झाले आहे. असे असतानाही महागडे कांद्याचे रोप आणि बी घेऊन कांदा लागवडीचा सपाटाच राज्यात सुरु आहे. भविष्यातील दराची परवा न करता कांदा लागवडीची लगबग ही संपूर्ण राज्यात दिसते आहे. खरीप हंगामाच्या उत्तरार्धात कांदा पेरणी सुरू होते, परंतु या मोठ्या समस्येला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांना
देशात सर्वाधिक कांदा उत्पादन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातही कांदा लागवड केली जात आहे. पण रोपाचा तुटवडा भासत आहे. कांद्याच्या रोपाचे पावसामुळे नुकसान झाले असल्याने दर गगणाला भिडलेले आहेत. त्यामुळे बाजारात ग्राहत अधिकच्या दराने खरेदी करीत आहेत दुसरीकडे शेतकरीही रोप अधिकच्या दराने खरेदी करीत आहेत. यावर्षी धुळे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड आणि जळगाव आदी भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा नर्सरीचे नुकसान झाले आहे. मागणी आणि पुरवठ्यामुळे मोठी तफावत असल्याने दर वाढलेले आहेत.
कांदा लागवडीसाठी दुपटीने खर्च
शेतकऱ्यांनी महागडे बियाणे आणि रोप घेऊन कांद्याची लागवड केली आहे. सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी हे कांदा लागवडीवर भर देत आहेत. पण कांद्याच्या दराचा भरवासा हा कधीच देता येत नसल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत डिखोले यांनी सांगितले. आता लागवड केलेला कांदा हा 90 दिवसांनी तयार होतो तर 100 दिवसानंतर तो बाजारात येतो. पण यंदा अधिकचे पैसे खर्चून कांदा लागवडीते धाडस केले आहे. त्यामुळे कांदा पुन्हा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो का शेतकऱ्यांच्या हे पहावे लागणार आहे.
लागवडीचा खर्च दुपटीने वाढला
एक एक्कर कांदा लागवडीसाठी किमान 15 हजार रुपयांचा खर्च होतो. यामध्ये मशागत, रोप परीश्रम हे सर्व आले. यंदा रोपाचे दर वाढल्याने हा खर्च दुपटीने वाढलेला आहे. एक एक्कर कांदा लावण्यास 30 हजार रुपये मोजावे लागत आहेत. ज्या शेतकऱ्याकडे स्वतःचे रोप नाही अशा शेतकऱ्याच्या कांद्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे. ही मोठी समस्या आहे. यावेळी हा खर्च एकरी 80000 रुपयांपर्यंत गेला आहे. कारण यावेळी केवळ रोपाच्याच किमती वाढलेल्या नाहीत तर वाहतूकही वाढली असून वाढत्या डिझेलच्या किमतीचाही परिणाम झालेला आहे.
वाढत्या खर्चाबरोबर बाजारपेठेचाही अभ्यास महत्वाचा
एकरी 10 हजार रुपये लागवडीचा खर्च आहे. तर भविष्यात मशागत, खतांची फवारणी, काढणी असा अधिकचा खर्चही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड करतानाच किती दर मिळाला तर कांदा परवडेल याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कांदा हे नगदी पीक आहे. एका रात्रीतून लखपती करते आणि रोडपतीही त्यामुळे बाजारभाव आवक याचा अभ्यास महत्वाचा असल्याचे डिघोळे यांनी सांगितले. (Increase in onion prices also increased cultivation of kharifi onions, more real to farmers …)
संबंधित बातम्या :
कृषी सल्ला : पावसाच्या उघडीपीचा ‘असा’ घ्या फायदा
‘टॅगिंग’च्या उपक्रमात राज्यातील 53 साखर कारखाने, थकबाकी वसुलीसाठी अनोखी शक्कल
हरभऱ्याला पोषक वातावरण, अनुदानही मिळणार प्रतिक्विंटल अडीच हजाराचे, असा घ्या लाभ