पेरणी यंत्र एक अन् फायदे अनेक, वेळेची बचत शिवाय उत्पादनात वाढ

कांदा लागवड तशी लेंदी प्रक्रीया आहे. लागवडीच्या आगोदर दोन महिने रोपाची जोपासना त्यावर रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे लागवड होते की नाही हे अनिश्चित असते पण जर कांदा पेरलाच तर उत्पादन पदरात. आणि यामुळेच लासलगाव तालुक्यातील खेडले येथील शेतकरी नीलेश घोटेकर यांनी नवीन तंत्रानुसार एक एकर मध्ये लाल कांद्याची पेरणी केली आहे. शिवाय कांद्याचीच पेरणी नाही तर या पेरणी यंत्राने कोथिंबीर, मेथी, गाजर या पीकांचीही पेरणी करता येत असल्याने अनेक फायदे आहेत.

पेरणी यंत्र एक अन् फायदे अनेक, वेळेची बचत शिवाय उत्पादनात वाढ
ट्रक्टरने कांद्याची पेरणी आणि रेन पाईपने सिंचन हा अनोखा उपक्रम लासलगाव तालुक्यातील खेडले येथील शेतखऱ्याने केला आहे.
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 12:12 PM

लासलगाव : काळाच्या ओघात शेतीपध्दतीमध्ये बदल होत आहेत. (lasalgaon) पारंपारिक शेतीपध्दतीला बगल देत शेतकरी आधुनिकतेची कास पकडत आहे. याचा परिणामही समोर असल्याने तरुणही शेती व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. (onion cultivation) कांदा लागवड तशी लेंदी प्रक्रीया आहे. लागवडीच्या आगोदर दोन महिने रोपाची जोपासना त्यावर रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे लागवड होते की नाही हे अनिश्चित असते पण जर कांदा (Increase in production by sowing onion) पेरलाच तर उत्पादन पदरात. आणि यामुळेच लासलगाव तालुक्यातील खेडले येथील शेतकरी नीलेश घोटेकर यांनी नवीन तंत्रानुसार एक एकर मध्ये लाल कांद्याची पेरणी केली आहे. शिवाय कांद्याचीच पेरणी नाही तर या पेरणी यंत्राने कोथिंबीर, मेथी, गाजर या पीकांचीही पेरणी करता येत असल्याने अनेक फायदे आहेत.

कांदा हे साधारण: चार महिन्याचे पीक आहे. मात्र, यापुर्वी बियाणांची लागवड आणि मग दोन महिन्यांनी रोप लागवडीला येणार त्यामुळे कांदा पिकाचा कालावधी हा सहा महिन्याचा होतो. कांदा हे नगदी पीक आहे. बाजारपेठेत सर्वात आगोदर आवक झाली तर चांगले दरही मिळतात. त्यामुळे यंत्राच्या सहाय्याने पेरणी झाली तर लवकर उगवण होऊन उत्पादनही पदरी पडते. मात्र, अद्यापही ग्रामीण भागात रोप लावूनच लागवड करतात. मात्र, खेडले येथील शेतकऱ्यांने नविन पेरणी यंत्र घेतल्याने गावच्या आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

काय आहे पेरणी यंत्राचा फायदा ?

कांद्याची प्रत्यक्ष लागवड करण्यापूर्वी आगोदर बियाणाच्या माध्यमातून रोप तयार करावे लागते. त्यावर वातावरणाचा परिणाम होऊन रोगराईचा धोका निर्माण होतो. आणि यामध्ये नुकसान झाले तर शेतकऱ्यांना किलोमागे 2 हजार 500 रुपयांचे नुकसान होते. शिवाय दोन महिने त्या कांद्याच्या रोपाची जोपासना करावी लागते. मात्र, पेरणी पध्दतीने थेट कांदा पिकावरच शेतकऱ्यांना लक्ष केंद्रीत करता येते. लागवडीसाठी मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजही केवळ मजुरांअभावी कांद्याची लागवड रखडलेली आहे. त्यामुळे कमी वेळेत कांद्याच्या उत्पादनासाठी पेरणीयंत्रच महत्वाचे आहे.

कांद्याबरोबर इतर पिकांचाही पेरा

नवीन तंत्रात एक एकरात पेरणी करण्यासाठी कांद्याचे साधारण दोन किलो बी लागते आणि पेरणीनंतर सव्वा चार महिन्यात पीक तयार होते. एरवी दोन महिने रोपासाठी व नंतर लागवड त्यामुळे सहा महिन्याचा कालावधी कांद्यासाठी लागतो आणि त्या लागवडीसाठी साधारणता बारा हजार रुपये खर्च येतो.या नवीन तंत्रानुसार पेरणीमुळे सव्वा चार महिन्यात कांद्याचे पीक हातात येते व लागवड खर्च लागवड कमी होतो. स्वतः निलेशने कांदा पेरणी यंत्र घेतले असून त्या पेरणी यंत्राने कांदे, कोथिंबीर, मेथी, गाजर हे पीक सुद्धा पेरले आहेत.

पेरणीनंतर अशी घ्या काळजी

या नविन तंत्रात कांद्यामध्ये पाच इंचाचे अंतर असते त्याचप्रमाणे निलेशने रेन पाईप चा वापर केला आहे. त्यामुळे पाणी भरणे व सर्वात महत्त्वाचे या दिवसात धूक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. सकाळी पिकांवर दवबिंदू साठतात कोवळ्या उन्हामुळे त्या कांद्याचे शेंडे करपतात. रेन पाईप चा उपयोग सकाळी सुरू केल्यानंतर त्या पाण्यामुळे दवबिंदू तळाशी जातात व शेंडे करपण्याचे प्रमाण कमी होते. सहाजिकच ज्या ठिकाणी औषधाचे चार स्प्रे करावे लागतात ते दोन वेळेस केले तरी चालते. औषधाचा व लागवडीचा खर्च कमी होतो व कांदे ही कमी कालावधीत तयार होतात. (Increase in production by sowing onion rather than onion cultivation and saving time, experimentin Lasalgaon)

संबंधित बातम्या :

नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीचा ‘ठसका’ ; तीन दिवसांमध्ये 15 हजार क्विंटलची आवक

खरेदी केंद्रावर खरचं मिळेल का शेतकऱ्याला ‘आधार’ ? समजून घ्या पीक विक्रीची पध्दत

‘आयवीएफ’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पहिल्यांदाच म्हशीची गर्भधारणा, गोंडस पारडूला जम्न

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.