Special Story ! टोकण पध्दतीने सोयाबीनचे भरघोस उत्पादन, काय आहे टोकण पध्दत ?

नैसर्गाच्या लहरीपणाचा सामना राज्यातील सोयाबीन उत्पादकांना करावा लागतो ते वेगळेच. पण गेल्या काही वर्षांपासून राज्यात टोकण पध्दतीने सोयाबनची लागण केली जात आहे. त्याचा फायदा काय होतो ते यावर्षी निदर्शनास आलेले आहे. पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले पण ज्या शेतकऱ्यांनी टोकण पध्दतीने सोयाबीनची लागवड केली आहे त्यांचे नुकसान तर झाले नाही उलट उत्पादनात वाढ झालेली आहे.

Special Story ! टोकण पध्दतीने सोयाबीनचे भरघोस उत्पादन, काय आहे टोकण पध्दत ?
टोकण पध्दतीने सोयाबीनची लागवड केल्याने उत्पादनात वाढ
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 10:50 AM

राजेंद्र खराडे : लातूर : दरवर्षी सोयाबीनच्या (Soyabean) क्षेत्रामध्ये वाढ होती आहे. मात्र, वाढत्या क्षेत्राच्या तुलनेत उत्पादन हे वाढत नाही. आजही (traditional farming ) शेतकरी पारंपारिक पध्दतीनेच सोयाबनची पेरणी करीत असल्याने ही स्थिती कायम आहे. शिवाय नैसर्गाच्या लहरीपणाचा सामना राज्यातील सोयाबीन उत्पादकांना करावा लागतो ते वेगळेच. पण गेल्या काही वर्षांपासून राज्यात टोकण पध्दतीने सोयाबनची लागण केली जात आहे. त्याचा फायदा काय होतो ते यावर्षी निदर्शनास आलेले आहे. पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले पण ज्या शेतकऱ्यांनी टोकण पध्दतीने सोयाबीनची लागवड केली आहे त्यांचे नुकसान तर झाले नाही उलट उत्पादनात वाढ झालेली आहे. काय आहे ही टोकण पध्दत हे आपण माहिती करुन घेणार आहोत…

खरीपातील मुख्य पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. गेल्या चार वर्षापासून या पीकाला चांगला दर मिळत असल्याने क्षेत्रही वाढत आहे. राज्यात यंदा तब्बल 52 लाख हेक्टरावर सोयाबीनचा पेरा झालेला होता. मात्र, पावसाने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झालेले आहे. मात्र, टोकण पध्दतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झालेली आहे. टोकण पध्दत ही तशी पश्चिम महाराष्ट्रात रुजलेली आहे. मराठवाड्यात सोयाबीनचे अधिकचे क्षेत्र असतानाही शेतकऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पण यंदा लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, रेणापूर तालुक्यात या पध्दतीने सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. 20 किलोच्या बियाणांमध्ये शेतकऱ्यांना 22 क्विंटलचा उतारा मिळाल्याचे उदाहरण समोर आलेले आहे…

काय आहे टोकण पध्दत?

आजही शेतकरी हे सोयाबीनची पेरणी करतात. शेताची मशागत करायची आणि पावसाची ओल असली की चाढ्यावर मूठ धरायची ही पारंपारिक पध्दत पण टोकण लागवडीमध्ये शेताची मशागत करुन सरी काढली जाते. सरी म्हणजे ज्या पध्दतीने हळदीची किंवा ऊसाची लागवड केली जाते त्याप्रमाणे सरी काढून त्यावर सोयाबीने हे डोबले जाते. साडेतीन फुटावर सरी काढून बेड तयार केले जातात. सरीच्या दोन्ही बाजूस 9 इंचाच्या अंतरावर सोयाबीनची लागवड केली जाते. याची उगवण क्षमताही अधिक असल्याने कमी कालावधीत पीक जोमात वाढते.

असा आहे दुहेरी फायदा

यंदा अधिकच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झालेले आहे. अजूनही मराठवाड्यातील सोयाबीन हे पाण्यातच आहे. मात्र, सरी काढून सोयाबीनची लागवड केल्याने सरीमध्ये पाणी साचल्याने त्याचा परिणाम हा थेट पीकावर होत नाही. शिवाय पाण्याचा लवकर निचरा होऊन शेतातील पाणी वावराबाहेर काढून देणे अगदी सहज शक्य होते. तर पाऊस कमी झाला तरी तरी पावसाचे पाणी हे सऱ्यामध्ये साचून राहिल्याने पीकाला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला तरी त्याचा परिणाम पिकावर होत नाही तर कमी झाला तरी लागलीचे पीके सुकत नाहीत.

पोषक वातावरणामुळे वाढ जोमात

सरी काढून लागवड केलेल्या सोयाबीनमध्ये एक विशिष्ट अंतर ठेवण्यात आलेले असते. पीकाला योग्य त्या प्रमाणात ऊन, वारे मिळते त्यामुळे सोयाबीनची वाढही जोमात होते. हलक्या प्रतिच्या क्षेत्रावर या लागवड पध्दतीचा अधिक फायदा होतो. मराठवाड्यातही ही पध्दत आता रुजत असताना पाहवयास मिळत आहे.

दीडपट उत्पादन

पारंपारिक पध्दतीने सोयाबीनची पेरणी केली तर एकरी सहा ते सात क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. शिवाय जर पेऱ्यात जर उगवण क्षमता कमी झाली तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. तर टोकण पध्दतीने सोयाबीनची लागवड केली तर एकरी 12 ते 13 क्विंटलचे उत्पादन होत असल्याचे शेतकरीच सांगत आहेत. त्यामुळे कमी बियाणामध्ये अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.

टोकण पध्दतीनेच सोयाबीन फायद्याचे

शेती क्षेत्रामध्ये काळाच्या ओघात बदल होत आहेत. पण मराठवाड्यात लवकर ते बदल स्वीकारले जात नाहीत. केवळ जिल्ह्यात 10 हजार हेक्टरावर टोकण पध्दतीने लागवड केली जात आहे. गेल्या दोन वर्षापासून अशा पध्दतीने शेतकरी लागवड करीत आहेत. त्यांच्या उत्पादनात ही वाढ झालेली आहे. शिवाय बदलत्या वातावरणाचा परिणामही यावर होत नाही. आगामी हंगामात शेतकऱ्यांनी अशाच पध्दतीने सोयाबीनची लागवड करावी यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे लातूरचे जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले आहे. (Increase in production, soyabean token method if soyabean is cultivated in a state-of-the-art manner)

संबंधित बातम्या :

पीक नुकसानीच्या पूर्वसूचनांचा ‘ढीग’, सर्व्हेक्षणात तक्रारी अपात्र

पावसात भिजलेल्या सोयाबीनची काढणी- मळणीच महत्वाची, शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला

मोहरीने मिळेल उभारी ; दरात 400 रुपयांची वाढ, लागवडीसाठीही पोषक वातावरण

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.