Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market: जे शेतकऱ्यांच्या मनात तेच सोयाबीनच्या बाजारात, अखेर चार महिन्यानंतर…

सोयाबीनचा हंगाम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना ज्या वाढीव दराची अपेक्षा होती तोच दर आता बाजारपेठेत मिळत असल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवस बाजारसमित्या बंद होत्या त्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय चित्र राहणार याची उत्सुकता शिघेला पोहचली होती. मात्र, सोयाबीनच्या दर वाढीतील सातत्य कायम असून आता सात हजाराकडे सोयाबीनची वाटचाल सुरु झाली आहे.

Latur Market: जे शेतकऱ्यांच्या मनात तेच सोयाबीनच्या बाजारात, अखेर चार महिन्यानंतर...
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली असल्याने आवकही वाढली आहे.
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 1:34 PM

लातूर : सोयाबीनचा हंगाम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना ज्या वाढीव दराची अपेक्षा होती तोच दर आता बाजारपेठेत मिळत असल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवस बाजारसमित्या बंद होत्या त्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय चित्र राहणार याची उत्सुकता शिघेला पोहचली होती. मात्र,  (Soybean Rate) सोयाबीनच्या दर वाढीतील सातत्य कायम असून आता सात हजाराकडे सोयाबीनची वाटचाल सुरु झाली आहे. आता पर्यंत 6 हजार 500 हा सर्वाधिक दर होता पण सोमवारी सोयाबीनला 6 हजार 750 एवढा दर मिळाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार हे निश्चित मानले जात आहे. (Kharif Season) हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांनी (Soybean Stock) सोयाबीन आणि कापूस साठवणूकीवर शेतकऱ्यांनी भर दिला होता. तोच निर्णय आता शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

15 दिवसांनंतर दरात झाला बदल

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर स्थिर झाल्यापासून आवकही वाढली होती. असे असले तरी गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीन हे 6 हजार 500 वर स्थिरावले होते. त्यामुळे यापुढे दरात वाढ होणार का घट ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. पण शेतकऱ्यांना खरा दिलासा सोयाबीनने दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीमधील व्यवहार हे बंद होते. सोमावारी थेट 250 रुपायांची वाढ झाली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचा दिलासा शेतकऱ्यांना मिळत आहे.

शेतीमालाची आवक वाढली

शेतीमालाची आवक ही दरावरच अवलंबून असते. त्याच प्रमाणे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा वगळता तूर, सोयाबीन, उडदाला सरासरीप्रमाणे दर मिळत आहे. सोयाबीनचे दर स्थिरावल्यापासून आवकमध्ये वाढ होत आहे. सोमवारी लातूर बाजार समितीमध्ये 15 हजार पोत्यांची आवक झाली होती. तर दुसरीकडे हरभऱ्याची सर्वाधिक म्हणजे 22 हजार पोत्यांची आवक झाली तर खरीप हंगामातील शेवटचे पीक असणारे तूरीची आवकही वाढलेली आहे. खरीप हंगामात उत्पादनात घट झाली असली तरी सध्याच्या दरावर शेतकरी समाधानी आहे.

संबंधित बातम्या :

Success Story : कोरडवाहू जमिनीवर द्राक्षाची बाग, ध्येयवेड्या उमेशची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी

पांढरे सोने तेजीतच राहणार, शेतकऱ्यांचा ‘तो’ निर्णय आजही फायदेशीर..! वाचा सविस्तर

Summer Onion : वाढीव कांदा उत्पादनाचे करायचे काय? सरकारच्या धोरणावरच कांदा दराचे भवितव्य..!

'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.