Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : पंजाबच्या गायी अन् दर्जेदार दूधावर भर, गावाबाहेर न जाता लाखांच्या घरात उलाढाल! त्यानं करून दाखवलंच!

उस्मानाबाद : कशीही केली तरी (Farming) शेती तोट्यातच, शेतकऱ्यांच्या वाटेला केवळ परिश्रमच अशी वाक्य आज-काल खेडेगावात सहजच कानी पडतात. मात्र, शेती या मुख्य व्यवसयाला (Dairy industry) दुग्ध व्यवसयाची जोड दिली तर काय होऊ शकते हे (Osmanabad) उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील सतिष खडके यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी जोड व्यवसयालाच मुख्य व्यवसयाचे स्वरुप देण्यासाठी HF म्हणजेच […]

Success Story : पंजाबच्या गायी अन् दर्जेदार दूधावर भर, गावाबाहेर न जाता लाखांच्या घरात उलाढाल! त्यानं करून दाखवलंच!
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 10:25 AM

उस्मानाबाद : कशीही केली तरी (Farming) शेती तोट्यातच, शेतकऱ्यांच्या वाटेला केवळ परिश्रमच अशी वाक्य आज-काल खेडेगावात सहजच कानी पडतात. मात्र, शेती या मुख्य व्यवसयाला (Dairy industry) दुग्ध व्यवसयाची जोड दिली तर काय होऊ शकते हे (Osmanabad) उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील सतिष खडके यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी जोड व्यवसयालाच मुख्य व्यवसयाचे स्वरुप देण्यासाठी HF म्हणजेच होल्सटीन फ़्रिसियन जातीच्या गाईंचा साभाळ करुन दुधव्यवसाय वाढवण्याचा निर्धार केला होता. गेल्या 4 वर्षात त्यांनी हा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. 6 गायींच्या माध्यमातून महिन्याला दीड लाखाचे उत्पन्न त्यांच्या पदरी पडत आहे. जिद्द, चिकाटी आणि व्यवसयामध्ये सातत्य ठेवल्यावर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण सध्या वाघोली शिवारात पाहवयास मिळत आहे. चार वर्षांमध्ये गायींची संख्या दुप्पट झाली आहे तर उत्पन्नातही वाढ झाली असल्याचे खडके यांनी सांगितले आहे.

अशी झाली दुग्ध व्यवसायाला सुरवात

हाँलंड येथील HF(होल्सटीन फ़्रिसियन) जातीच्या गाई आता आपल्या देशात आणल्या आहेत. शिवाय केवळ शेतीवर अवलंबून राहिल्यास उत्पन्नात भर पडणार नाही याची खात्री सतीष खडके यांना होती. म्हणूनच 2018 साली त्यांनी पंजाब ( लुधियाना) हरियाण येथुन HF जातीच्या 6 गायी आणल्या ६ लाख रुपये गायींसाठी गुंतवणुक तसेच 2 लाख रुपये शेड असे एकुण 8 लाख रुपये गुंतवणुक करुन हा दुग्ध व्यवसाय चालु केला होता. सुरवातीला गायींची जोपासणा आणि होणारा खर्च याचा ताळमेळ लागत नव्हता पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. म्हणूनच चार वर्षानंतर का होईना ते यशस्वी झाले आहेत.

सकस आहार अन् गावातच दूधविक्री

दूधाचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य वेळी सकस आहार आणि गायींची देखभाल या दोन महत्वाच्या गोष्टी असल्याचे खडके यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुरघास , सुपर निपिअर , ज्वारी कडबा , हरभरा भुसकट , सुगरास , पेंड , सरकी हे खादय दिले जाते या साठी महिण्याला किमान 50 हजार रुपये खर्च येतो. सध्या दूधाला 25 ते 28 रुपये लिटर असा दर मिळत आहे. शिवाय वाघोली गावातच दूध डेअरी असल्याने याच ठिकाणी दूध विक्री होत असल्याने त्यांचा वाहतूकीचा खर्चही टळलेला आहे. खडके यांना वर्षाला शेणखत व दूधा पासुन किमान 7 ते 8 लाखाचा निव्वळ नफा मिळतोय .

असे असते रोजच्या कामाचे नियोजन

सतिष खडके सह त्यांचा MSc चे शिक्षण घेतलेला मुलगा आनंद खडके हे पहाटे 4 ते सकाळी 7 वाजे पर्यंत व त्यानंतर दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत गोठा स्वच्छ करणे गाईना आहार देणे नंतर मशिनद्वारे दुध काढणे हा दिनक्रम असतो. योग्य नियोजन आणि कामामध्ये सातत्य ठेवल्याने त्यांना शेणामधूनही अधिक फायदा मिळत आहे. गायीच्या शेणामुळे शेतजमिनीचा दर्जा सुधारत आहे. तर कधी विक्रीतून चार पैसे मिळत आहेत. बाप-लेकाचे परिश्रम आणि अनोखा प्रयोग पाहून आता वाघोली येथे दूग्ध व्यवसयावर भर दिला जात आहे. शिवाय सर्वांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे.

संबंधित बातम्या :

महावितरणकडून सुविधांपेक्षा अडचणी अधिक, थकबाकी अदा करुनही समस्या कायम, काय आहे बांधावरची स्थिती?

Chickpea Crop : कृषी विभागाकडून हरभऱ्याची उत्पादकता जाहीर? किती टनाला मिळणार हमी भावाचा ‘आधार’?

Banana : एका पिकाचा दुहेरी फायदा, केळीवर प्रक्रिया करुन मिळवा उत्पन्न दुप्पट, जाणून घ्या सर्वकाही

...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.