Turmeric Crop: अवकाळी, अतिवृष्टीनंतरही हळदीचा रंग अधिकच गडदच, कृषितज्ञांचेही अंदाज फोल ठरले

निसर्गाच्या लहरीपणातून यंदा हळद पिकाचीही सुटका झालेली नव्हती. उलट हळदीच्या शेतामध्ये अधिक काळ पाणी साचून राहिल्याने त्यांचे कंद हे सडले होते. पाण्याचा निचरा न होणाऱ्या क्षेत्रावरील पिकाचे अधिक नुकासान झाले होते. असे असताना कृषितज्ञांनी हळदीच्या दराबाबतच नव्हे तर एकंदरीत सर्वच बाजारपेठेबद्दल शंका उपस्थित केली होती. मात्र, कृषितज्ञांचे अंदाज फेल ठरवत हळदीचे दर टिकून आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या आर्थिक वर्षामध्ये सांगली मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेट हळदीची उलाढाल 192 कोटी वाढली आहे.

Turmeric Crop: अवकाळी, अतिवृष्टीनंतरही हळदीचा रंग अधिकच गडदच, कृषितज्ञांचेही अंदाज फोल ठरले
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 12:10 PM

सांगली : निसर्गाच्या लहरीपणातून यंदा (Turmeric Crop) हळद पिकाचीही सुटका झालेली नव्हती. उलट हळदीच्या शेतामध्ये अधिक काळ पाणी साचून राहिल्याने त्यांचे कंद हे सडले होते. पाण्याचा निचरा न होणाऱ्या क्षेत्रावरील पिकाचे अधिक (Crop Damage) नुकासान झाले होते. असे असताना कृषितज्ञांनी हळदीच्या दराबाबतच नव्हे तर एकंदरीत सर्वच (Sangli Market) बाजारपेठेबद्दल शंका उपस्थित केली होती. मात्र, कृषितज्ञांचे अंदाज फेल ठरवत हळदीचे दर टिकून आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या आर्थिक वर्षामध्ये सांगली मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेट हळदीची उलाढाल 192 कोटी वाढली आहे. गेल्या वर्षभरात 1 हजार 899 कोटी 47 लाख रुपयांची खरेदी-विक्री झाले आहेत. त्यामुळे निसर्गिक संकटानंतरही हळद दराच्या बाबतीत घसरेल असे सध्याचे तरी चित्र नाही.

सांगली मार्केटला वेगळे महत्व

राज्यात हळदीचे सर्वाधिक उत्पादन हे हिंगोली जिल्ह्यात घेतले जात असले तरी सांगली येथील बाजारपेठे सोद्यासाठी देशभरात प्रसिध्द आहे. देशभरातील व्यापारी या ठिकाणी येत असातात. मागील दोन वर्षात कोरोनामुळे हळदीच्या मागणीतही वाढ झाली आहे. असे असातनाच गतवर्षी हळद काढणीच्या पूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने थोड्याबहुत प्रमाणात उत्पादनात घट झाल्यानेच हळदीचे मार्केट हे टिकून आहे. सौदार्य प्रसाधने तयार करण्यासाठी हळदीचा वापर अधिकचा होत असल्याने चांगला दर मिळत असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत बाजारपेठेमध्येही हळदीची आवक वाढत आहे. एकंदरीत हळदीच्या मागणीत वाढ झाल्याने निसर्गाच्या लहरीणाचा परिणाम जाणवत नाही.

सांगली बाजारपेठेत अशी झाली हळदीची उलाढाल

2020 ते मार्च 2021 या आर्थिक वर्षात राजापुरी हळदीची 16 लाख 20 हजार 121 क्विंटल आवक झाली होती. तर चालू आर्थिक वर्षात 1603 कोटी 91 लाख 97 हजाराची उलाढाल झाली आहे. तर परपेठ हळदीची एक लाख 16 हजार आहे. परपेठ हळदीची आवक एक लाख 80 हजार 938 क्विंटल वाढली असून 86 कोटी 62 लाख 19 हजार 180 रुपयांनी खरेदी – विक्री वाढली आहे. तज्ज्ञांचे अंदाज चुकीचे ठरवित सांगलीच्या बाजारात हळदीने मोठी उलाढाल केल्याचे चित्र दिसत आहे.

अवकाळीमुळे उत्पादनात घट

हळद काढणीच्या काही दिवस आगोदरच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शिवाय पाऊस हा लागून राहिला होता. त्यामुळे काही दिवस हळद ही पाण्यातच होती परिणाम हळदीचे कंद हे पाण्यातच सडण्याचा प्रकार अनेक ठिकाणी झाले होते. त्यामुळे उत्पादनात घट झाली असली वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

संबंधित बातम्या :

Chickpea Crop : हरभऱ्याला हमीभावाचा आधार, हंगामाच्या मध्यावर आवक वाढली

Photo Gallery | वृक्षवेलींची हिरवी माया अन् पिवळ्या फुलांचा शालू, रखखत्या उन्हाळ्यात भुरळ घालणारं ‘वनराई’तलं घर पाहिलंय?

Sangli : झाले गेले विसरुन पुन्हा डाळिंब उत्पादक जोमात, रोगराईच्या तडाख्यातून वाचलेल्या बागांसाठी धडपड

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.