Turmeric Crop: अवकाळीनंतरही हळदीला चढला ‘पिवळा’ रंग, प्रतिकूल परस्थितीमध्ये उत्पादन वाढले दराचे काय?

सध्या हळदीची काढणी आणि हळद शिजवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन आता प्रत्यक्ष विक्रीला सुरवात झाली आहे. यंदा अवकाळीमुळे हंगामातील प्रत्येक पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे हळद उभी असताना झालेल्या अवकाळीमुळे या पिकांचे कंद सडतील अशी शंका उपस्थित झाली होती. शिवाय देशात सर्वाधिक उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जात असल्याने उत्पादनावर याचा परिणाम होणार हे पक्के होते.

Turmeric Crop: अवकाळीनंतरही हळदीला चढला 'पिवळा' रंग, प्रतिकूल परस्थितीमध्ये उत्पादन वाढले दराचे काय?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 12:02 PM

सांगली : सध्या हळदीची काढणी आणि हळद शिजवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन आता प्रत्यक्ष विक्रीला सुरवात झाली आहे. यंदा (Unseasonable Rain) अवकाळीमुळे हंगामातील प्रत्येक पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे (Turmeric Crop) हळद उभी असताना झालेल्या अवकाळीमुळे या पिकांचे कंद सडतील अशी शंका उपस्थित झाली होती. शिवाय देशात सर्वाधिक (Turmeric Production) उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जात असल्याने उत्पादनावर याचा परिणाम होणार हे पक्के होते. पण प्रत्यक्षात होत असलेल्या आवकमुळे अवकाळीचा परिणाम हळद उत्पादनावर झाले असे दिसत नाही. कारण दिवसाकाठी देशात तब्बल 1 लाख हळदीच्या पोत्यांची विक्री सुरु होत आहे. वाढत्या उत्पादनामुळे मात्र, सध्या हळदीचे दर हे स्थिर आहेत.

यंदा दराचे काय राहणार चित्र?

उत्पादन घटल्यास शेतीमालाचे दर वाढतात हे बाजारपेठेचे सुत्र आहेत. मात्र, अवकाळी आणि सततच्या पावसामुळे उत्पादन घटेल असा अंदाज होता पण प्रत्यक्षात हळद पिकावर बदलत्या वातावरणाचा परिणाम झाला नाही. सांगली ही हळदीसाठीची मुख्य बाजारपेठ आहे. सध्या हळद आवक वाढली असून दिवसाकाठी देशभरात 1 लाख पोत्यांची विक्री होत आहे. मागणीपेक्षा अधिकची आवक होत असल्याने दर हे स्थिर आहेत. भविष्यातही असेच दर राहतील असा अंदाज आहे. देशभरात 80 ते 85 लाख पोत्यांचे उत्पादन झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे दरात वाढ होणार नसून हळदीच्या प्रकारानुसार सरासरीएवढा दर मिळत आहे.

हंगामाच्या सुरवातीला दरात वाढ, आवक वाढताच बदलले चित्र

देशातील मुख्य बाजारपेठेत हळदीचा हंगाम सुरु होताच दरात 800 रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे उत्पादकांच्या आशा उंचावल्या होत्या. शिवाय यंदा आवक होणार नाही असा उत्पादकांचा अंदाज होता पण प्रत्यक्षात उत्पादन वाढल्याचा परिणाम काय असतो हे सांगली बाजारपेठेत पाहवयास मिळाले आहे. वाढलेल्या दरात गेल्या आठ दिवसांमध्ये 400 ते 500 रुपयांची घसरण झाली आहे. मागणीपेक्षा अधिकचा पुरवठा झाल्याने ही परस्थिती ओढावली आहे.

सांगली बाजार समितीमध्ये हळदीचे दर

सध्या सांगली येथील बाजारपेठेमध्ये हळदीची आवक दिवसागणिस वाढत आहे. त्यानुसार सेलम कणी 7 हजार 200 ते 7 हजार 500, पावडर क्वालिटी 9 हजार ते 10 हजार, देशी कडपा 6 हजार 800 ते 7 हजार 300, मध्यम सेलम 8 हजार ते 8 हजार 500, उच्च सेलम 11 हजार ते 12 हजार तर लगडी हळद 10 हजार 500 ते 12 हजार रुपये क्विंटल असे दर आहेत.

संबंधित बातम्या :

Chickpea Crop : हमीभाव केंद्रावर हरभरा विक्रीचा मार्ग मोकळा, पणन मंडळाने ‘असा’ कोणता निर्णय घेतला?

Vineyard Damage : हंगाम संपल्यानंतरही अवकाळीची अवकृपा सुरुच, द्राक्षानंतर आता बागाच उध्वस्त

Success Story : नांदेडच्या शिवारात फुललीय फणसाची बाग, 7 वर्षाची मेहनत यंदा आली कामी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.