भारत पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने, दोन्ही देशांमधील वाद युरोपियन यूनियनमध्ये पोहोचला

भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने आले असून दोन्ही देशामधील वाद युरोपियन यूनियनमध्ये पोहोचला आहे. India Pakistan European Union

भारत पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने, दोन्ही देशांमधील वाद युरोपियन यूनियनमध्ये पोहोचला
India Pakistan
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 6:33 PM

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. दोन्ही देशांमध्ये नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र, यावेळी कारण वेगळेच आहे. बासमती तांदूळ प्रोटेक्टेड जिऑग्राफिकल इंडिफिकेशनवरून भारत आणि पाकिस्तान युरोपियन युनियनमध्ये आमने सामने आले आहेत. भारतानं युरोपियन यूनियनमध्ये बासमती तांदळाचं प्रोटेक्टेड जिऑग्राफिकल इंडिफिकेशन भारताला द्यावं असा अर्ज केला आहे. युरोपियन यूनियनमध्ये पाकिस्तानने या गोष्टीला विरोध केला आहे. (India and Pakistan battle in European Union over Basmati rice)

भारताची भूमिका

भारताने युरोपियन यूनियनमध्ये बाजू मांडताना हिमालयाच्या पायथ्याशी तांदळाच्या विशिष्ट जातींचे आम्हीच उत्पादक आहोत असं आमचं म्हणणं नाही, असं सांगितलं. प्रोटेक्टेड जिऑग्राफिकल इंडिफिकेशन दिल्यामुळे या परिस्थितीत बदल होणार नाही असं देखील मांडण्यात आलं आहे. भारतीय तांदूळ निर्यातदार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय सेठिया यांनी भारत आणि पाकिस्तान गेल्या 40 वर्षांपासून वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये कोणत्याही वादाशिवाय निर्यात करत आहेत. प्रोटेक्टेड जिओग्राफिकल इंडिकेशनचा याच्यावर परिणाम होणार नाही, असे देखील ते म्हणाले.

पाकिस्तानची भूमिका

पाकिस्तानातील अल-बरकत राईस मिलचे गुलाम मुर्तझा यांनी बासमती तांदळासाठी प्रोटेक्टेड जिओग्राफिकल इंडिकेशनसाठी भारताचा अर्ज आमच्यावर अणू बॉम्ब टाकण्यासारखा आहे, असं म्हटलं. पाकिस्तानची बाजारपेठ हस्तगत करण्यासाठी भारताने हा अर्ज केल्याचा दावा मुर्तझा यांनी केला. यामुळे आमच्या तांदूळ व्यवसायावर परिणाम होईल, असंगी मुर्तझा म्हणाले.

तीन महिन्यांची मुदत

युरोपियन युनियनच्या नियमानुसार दोन्ही देशांना यासंदर्भात वाटाघाटी करून तोडगा काढण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे. भारताने या संदर्भात तीन महिन्यांची मुदत वाढवून मागितली होती, अशी माहिती युरोपियन कमिशनच्या प्रवक्त्यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला दिली. कायदेविषयक संशोधक डेल्फिन मेरी विवेन यांनी ऐतिहासिक दृष्ट्या बासमती तांदळाचं भौगोलिक ठिकाण भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे संयुक्तपणे जातं असं म्हटलं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी मिळून बासमती तांदळाच्या प्रोटेक्टेड जॉग्रफिकल इंदिकेशन साठी संयुक्तपणे अर्ज करावा, असं जहांगीर यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांमध्ये सहमती झाली नाही आणि भारताच्या बाजूने युरोपियन युनियनचा निर्णय गेल्यास आम्ही युरोपियन कोर्टामध्ये जाऊ अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार आहे तर त्यानंतर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही देश बासमती तांदळाचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत.

संबंधित बातम्या:

सोयाबीन शेती न करणारा नेपाळ चर्चेत, भारतात 2 लाख टन तेल निर्यात, नेमकं प्रकरण काय?

Weather Update: महाराष्ट्रात आजही पावसाची दमदार बॅटिंग? हवामान विभागानं काय सांगितलं?

(India and Pakistan battle in European Union over Basmati rice)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.