अफगाणिस्तानातील संघर्षाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका, केळीची निर्यात थांबली, शेतकरी चिंतातूर
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी वर्चस्व मिळवल्यानंतर त्याचा थेट परिणाम सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा तालुक्यातील केळी निर्यातीवर झाला आहे.
सोलापूर : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी वर्चस्व मिळवल्यानंतर त्याचा थेट परिणाम सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा तालुक्यातील केळी निर्यातीवर झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारताकडून अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जाते. मात्र या केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. याचा आर्थिक फटक केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीमुळे केळीची निर्यात थांबली
भारतातून अफगाणिस्तानात दर वर्षी किमान 30 टक्के केळी निर्यात होते. दरम्यान अफगाणिस्तानात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे केळीची निर्यात थांबली आहे. वेळीच सुधारणा न झाली नाही तर, त्याचा आणखी फटका केळी निर्यातदार शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, आता अफगाणिस्तानच्या वातावरणामुळे चिंतेत भर
आधीच कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत असतानाच अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे केळी उत्पादकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे मागील काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक बंदीचा मोठा बसला होता. लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर केळी दरात तेजी निर्माण झाली आहे. परंतु अफगाणिस्तान येथील तालिबानी वर्चस्वानंतर निर्यात थांबली आहे. जोपर्यंत तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत निर्यात चालू होण्याची शक्यता कमी आहे.
अफगाणिस्तान हा भारतातून केळी आयात करणारा देश
अफगाणिस्तान हा इराण नंतरचा भारतातून केळी आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन केलंय. मात्र सध्या हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
अफगाण युद्धाचा परिणाम थेट तुमच्या खिशावर!
तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर आता तिथल्या परिस्थितीचा परिणाम भारतीय बाजारावरही होताना दिसून येतोय. मुंबई सुक्या पदार्थांचे भाव वाढले आहेत. अफगाणिस्तानात तख्तापलट होण्यापूर्वी मुंबईत बदामाची किंमत 680 रुपये किलो होते. मात्र, आता अफगाणीस्तानातील बदलांमुळे मुंबईत बदामांची किंमत 1 हजार 50 रुपये किलो झाली आहे. याशिवाय बाजारात काजू, पिस्ता आदींची किंमत वाढली आहे. येत्या काही दिवसांत हे भाव अजून वाढण्याची शक्या व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात होणाऱ्या घडामोडीचे परिणाम आता थेट तुमच्या खिशावर होताना दिसत आहेत.
अफगाणिस्तानात तालिबाने सरकार हातात घेतल्यानंतर देशातील अनेक भागात ड्राय फ्रूटचे दर कृत्रिमरित्या वाढवण्यास सुरुवात झालीये. सध्या देशात अफगाणिस्तानातून येणाऱ्या ड्राय फ्रूटचा पुरेसा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दर सध्या तरी स्थिर आहेत. परंतु पुढील काही दिवसात केंद्र सरकारच्या धोरणानुसार दर वाढतील की नाहीत हे सांगता येणार नाही. परंतु पुढील काळात हे दर 10-15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतायेत.
(India export bananas to Afghanistan but now due conflict, export of bananas has stopped)
हे ही वाचा :
मुंबईत बदामाचे दर 680 वरुन थेट 1050 रुपये किलोवर, काजू-पिस्ताही महागला, कारण काय?