देशात पुन्हा दुध क्रांती | काय सांगता पशुधन वाढीसाठी  IVF तंत्रज्ञानाचा वापर ; समधी आणि गौरी साहिवाल गायींनी दिला 100 ते 150 वारसांना जन्म

अपत्यासाठी आसूसलेल्या दाम्पत्यांना वरदान ठरणारे IVF तंत्रज्ञान जर गायी-म्हशींसाठीही उपयोगी ठरत असेल तर कल्पनाच आपल्याला हरकून टाकेत नाही का. तर मित्रांनो ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली सुद्धा आहे. गाई आणि म्हशींनी IVF तंत्रज्ञानाआधारे बछड्यांना, वासरांना आणि वगारुंना जन्म ही दिला आहे. देशात दवलक्रांती करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. गायीच्या कासेतून दुधाची धार वाहण्यासाठी केंद्र सरकार  विज्ञानाची कास धरणार आहे. 

देशात पुन्हा दुध क्रांती | काय सांगता पशुधन वाढीसाठी  IVF तंत्रज्ञानाचा वापर ; समधी आणि गौरी साहिवाल गायींनी दिला 100 ते 150 वारसांना जन्म
white revolution
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 12:33 PM

देशात पुन्हा धवल क्रांतीचे नवल घडविण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. स‌मधी आणि गौरी साहिवाल गायींसह म्हशींच्या उत्पादन वाढीसाठी संकरणासोबतच आता  IVF तंत्रज्ञानाचा वापर करून देशी वाणांच्या गाई आणि म्हशींची पैदावर वाढविण्यात येणार आहे. समधी आणि गौरी सहिवाल गाईन सहित म्हशीच्या कृत्रिम गर्भधारणा देशात पशुधन वाढीसाठी केंद्राचे आणखीन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.देशात पुन्हा दूध क्रांती घडून आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे, विज्ञानाची सांगड घालत आता देशात संकरित गाई आणि देशी गाई यांचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी या विषयावर केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याचे स्पष्ट केले.  IVF या तंत्रज्ञानाधारित गाई आणि म्हशीच्या पिल्लांना जन्म देण्याची प्रक्रिया आणि त्यापासून होणारी कमाईची शक्यता लक्षात घेत या याविषयीच्या कार्यक्रमावर भर देण्यात येत असल्याचे रुपाला यांनी सांगितले.  समधी आणि गौरी साहिवाल या गायींनी IVF तंत्रज्ञानाधारे 100 ते 125 वासरांना जन्म दिला आहे आणि त्यांचे वासरू हे एक लाख रुपयांना विक्री केल्याचे मी स्वतः बघितल्याचं रुपाला यांनी सांगितले. मला मिळालेल्या माहितीनुसार, जे. के. ट्रस्ट बुवा झोनिक्स यांनी गायीवर हा प्रयोग केला होता. त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामाध्यमातून एक कोटी रुपयांची कमाई करण्यात आली. पशुसंवर्धन मंत्र्यांनी पुणे येथील जे के ट्रस्ट बुवा झेनिक्स चा दौरा केला त्यावेळेस त्यांनी ही माहिती दिली. देशात पहिल्यांदाच आयव्हीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करून एका म्हशीने  पिल्लांना जन्म दिला आहे. रुपाला यांनी स्पष्ट केले की मला हे दृश्य प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव घेता आला. डॉक्टर विजयपथ सिंघानिया सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी इन लाईव्ह स्टॉक याठिकाणी साहिवाल जातीच्या गाईवर हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

दर्जेदार गाई आणि म्हशीची संख्या वाढविण्यावर जोर

दमदार आणि दर्जेदार जातीच्या गाई आणि म्हशी ची संख्या वाढविण्यासाठी आयव्हीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. पंतप्रधान यासाठी आग्रही आहेत. पुण्यातून याची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी देशी वाहनाच्या गाई आणि म्हशीची निवड करण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आयव्हीएफ तंत्रज्ञानाधारित भारतातील  म्हसीला पहिल्यांदा  गर्भ धारणा झाली होती  तिने वगारू ला अर्थात पिल्लाला जन्म दिला होता. हा प्रयोग बनी जातीच्या म्हशी वर करण्यात आला होता.

Sanjay Raut | धर्मांधतेला दूर ठेवून हिंदुत्वाचं राजकारण करता येतं, हे वाजपेयींनी दाखवलं : संजय राऊत

‘तर तो ऐतिहासिक क्षण…’, 83 Movie पाहिल्यानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया

Cyber crime in pune| पुणेकरांवर ‘सायबर चोरांचा’ डल्ला ; ऑनलाईन फसवणुकीच्या वर्षात १७ हजारहून अधिक तक्रारी

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.