काय सांगता ? कांद्यालाही ‘देशी दारुचा’ डोस, रोगांपासून बचावासाठी शेतकऱ्यांची शक्कल
काळाच्या ओघात शेती व्यवसायामध्येही वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब केला जात आहे. सर्वकाही हे उत्पादन वाढीसाठी केले जात आहे. असे असले तरी ग्रामीण भागात आजही शेतरकरी स्वत:च निर्णय घेतात की जे अनुभवावरून किंवा कुणाच्या सांगण्यावरून घेतले जातात. त्यापैकीच एका प्रयोगाची मराठवाड्यात जोरदार चर्चा सुरु आहे. कांद्याला एक वेगळी चकाकी यावी म्हणून चक्क शेतकरी आता कांद्यावर देशी दारुची फवारणी करीत आहेत.
उस्मानाबाद : काळाच्या ओघात शेती व्यवसायामध्येही वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब केला जात आहे. सर्वकाही हे उत्पादन वाढीसाठी केले जात आहे. असे असले तरी ग्रामीण भागात आजही शेतरकरी स्वत:च निर्णय घेतात की जे अनुभवावरून किंवा कुणाच्या सांगण्यावरून घेतले जातात. (Marathwada) त्यापैकीच एका प्रयोगाची मराठवाड्यात जोरदार चर्चा सुरु आहे. ( Onion cultivation) कांद्याला एक वेगळी चकाकी यावी म्हणून चक्क शेतकरी आता कांद्यावर (spraying of native liquor) देशी दारुची फवारणी करीत आहेत. पण हे ऐकूण तुम्हाला विश्वास बसणार नाही पण कांद्याला तरतरी यावी म्हणून उस्नामानाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या अनोख्या प्रयोगामुळे कांद्याला केवळ चकाकीच येत नाही तर रोगांचा प्रादुर्भावही कमी होतो. आतापर्यंत कांद्याचे उत्पादना वाढविण्यासाठी वेगवेगळा सल्ला कृषितज्ञ हे देत होते पण शेतकऱ्यांनीच या अनोख्या प्रकाराचा शोध लावला असून त्याचा परिणामही होत असल्याचे म्हणने आहे.
मराठवाड्यातही कांदा क्षेत्रात वाढ
कांदा हे नगदी पिक आहे. शिवाय मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोलापूर, परंडा ह्या मुख्य बाजारपेठा जवळ आहेत. त्यामुळे केवळ पारंपारिक पिकावर आता शेतकरी अवलंबून न राहता इतर हंगामी पिकाचेही उत्पादन घेत आहेत. कांद्याच्या दरावरुन उत्पादन ठरते तर काही शेतकरी दराची तमा न करता नियमित कांद्याची लागवड करतात. मराठवाड्यात कांद्यापेक्षा रब्बीत ज्वारी तर खरिपात केवळ सोयाबीन या पिकावरच भर दिला जात होता. पण आता उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून कांद्याच्या क्षेत्रात तर वाढ होत आहे पण उत्पादनासाठीही वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.
कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते
परंडा तालुक्यात पाण्याची मुबलक सोय असल्याने त्या क्षेत्रात सिंचनाचे प्रमाण वाढले आहे. परंडा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बार्शी आणि सोलापूर बाजार समितीमध्ये जो कांद्याला मिळणारा भाव आहे तो भाव परंडा येथील बाजार समितीमध्ये मिळत आहे. ही बाजारपेठ चांगली असल्यामुळे या बाजारपेठेत करमाळा, जामखेड, भूम, कुर्डुवाडी, माढा, टेभुर्णी, कर्जत, राशीन या भागातील शेतकरी आपला कांदा घेऊन या बाजारपेठेत विक्री करण्यासाठी येत आहेत.
वातावरणातील बदलाचा कांद्यावर परिणाम
सध्या वातावरणामध्ये बदल झाला आहे. रब्बी हंगामातील कांद्याची लागवड होताच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय सकाळी धुई पडत असल्यानेही कांद्यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे कांद्याला वाचवायचे असेल तर शेतकरी त्यावर देशी दारूची फवारणी करत आहेत या देशी दारूची फवारणी केल्याने कांद्यावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव पडत नाही. यामुळे कांदा फुगतो आणि त्याला रंग सुद्धा येतो आणि कांद्याला तरतरी येते असे कांदा उत्पादक शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. कांद्याची तरतरी वाढावी म्हणून शेतकऱ्यांचा कल देशी दारूकडे वाढलेला आहे.
संबंधित बातम्या :
नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीचा ‘तडका’, यंदा होणार विक्रमी आवक
ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांच्या घडावर परिणाम, फळबागांचे असे करा व्यवस्थापन
ठरलं तर मग, आता बाजार समित्यांमध्ये 50 किलो वजनाचीच गोणी, प्रशासन अन् संघटनांच्या बैठकीत निर्णय