Lumpy Diseases : लम्पी रोगावर स्वदेशी लस विकसीत, जागतिक कार्यक्रमातच पंतप्रधान मोदींची घोषणा
दूग्ध व्यवसाय शेतकऱ्यांचा मुख्य जोडव्यवसाय आहे . मात्र, गेल्या काही दिवसांपासून जनावरांना त्वचेचा आजार होत असून काही राज्यांमध्ये याची तीव्रता अधिक आहे. राजस्थानमध्ये जनावरे दगावली आहेत. त्यामुळे जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात असून 2025 पर्यंत देशातील प्रत्येक जनावराला तोंड आणि पायाच्या आजावर लस दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
मुंबई : देशभरातील जनावरांवर (Lumpy Skin) लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राजस्थानमध्ये तर आतापर्यंत 75 हजार जनावरे दगावलेली आहेत. (Farmer) शेतकऱ्यांच्या जोड व्यवसाय अडचणीत येत आहे तर माणसांमध्येही या रोगाला घेऊन धास्ती आहे. रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पातळीपासून ते केंद्र स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. असे असतानाच (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे वक्तव्य केले आहे. भारतामधील शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. या लसीकरणाबरोबरच तपासणी चाचण्यांना वेग देऊन जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन हा आजार अटोक्यात आणला जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत .
2025 पर्यंत देशातील सर्वच जनावरांचे लसीकरण
दूग्ध व्यवसाय शेतकऱ्यांचा मुख्य जोडव्यवसाय आहे . मात्र, गेल्या काही दिवसांपासून जनावरांना त्वचेचा आजार होत असून काही राज्यांमध्ये याची तीव्रता अधिक आहे. राजस्थानमध्ये जनावरे दगावली आहेत. त्यामुळे जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात असून 2025 पर्यंत देशातील प्रत्येक जनावराला तोंडाच्या आणि पायाच्या आजावर लस दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिटमध्ये ते सहभागी झाले होते. त्यावेळी हे वक्तव्य केले आहे.
48 वर्षानंतर यजमान पद भारताकडे
सध्या नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायावर मार्गदर्शन केले जात आहे. जगभरातील 156 तज्ञ हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे दूध उत्पादन वाढीसाठी ही परिषद महत्वाची राहणार आहे. शेतकऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीबाबतही माहिती होऊ शकते.
पशूपालनावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण
पशूपालन हा शेतकऱ्यांचा मुख्य जोड व्यवसाय आहे. शेती उत्पदनात कमी-अधिक झाले तरी याच जोड व्यवसायावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यामुळे जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.