सोयाबीन दर्जेदार, दर मात्र कवडीमोल, शेतकऱ्यांनो ‘वेट अँड वॅाच’
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे (Soyabean) सोयाबीन तब्बल 21 दिवस पावसामध्ये होते. त्यामुळे सोयाबीनचा दर्जा ढासळणार हे नक्कीच होत. (Quality soybeans in the market) पण सध्या 50 टक्के सोयाबीन चांगल्या प्रतीचे दाखल होत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. पण दराच्या बाबतीत शेतकरी काहीच करु शकत नसल्याने चांगल्या सोयाबीनला देखील 5 हजाराचाच भाव मिळत आहे.
लातूर : अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे (Soyabean) सोयाबीन तब्बल 21 दिवस पावसामध्ये होते. त्यामुळे सोयाबीनचा दर्जा ढासळणार हे नक्कीच होत. (Quality soybeans in the market) पण सध्या 50 टक्के सोयाबीन चांगल्या प्रतीचे दाखल होत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. पण दराच्या बाबतीत शेतकरी काहीच करु शकत नसल्याने चांगल्या सोयाबीनला देखील 5 हजाराचाच भाव मिळत आहे. गेल्या आठ दिवसांपासून (Latur) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे. असे असताना दर मात्र स्थिर आहेत. चांगल्या सोयाबीनला मागणी आहे तर डागाळलेले सोयाबीन हे 3 हजार 500 ते 4 हजारपर्यंत विकले जात आहे. शेतकऱ्यांची नाजूक स्थिती आणि सणसुद तोंडावर असल्याने सोयाबीनची आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे.
अखेर अथक परीश्रम घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन हे पदरात पाडून घेतले. मध्यंतरी भर चिखलात सोयाबीनची काढणी केली आणि आता पावसाने उघडीप दिल्याने मळणीची कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली आहेत. शिवाय ऑक्टोंबर हीट वाढल्याने सोयाबीन चांगल्या प्रकारे वाळवले गेले आहे. त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाणही कमी झाले आहे. योग्य दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी सर्वकाही प्रयत्न केले आहेत मात्र, बाजारपेठेत दरात उठावच नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. शनिवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. चांगल्या सोयाबीनला 5 हजाराचा तर डागाळलेल्या सोयाबीनला 4 हजाराचा दर मिळाला आहे.
सोयाबीनची साठवणूक फायद्याची
सध्या सोयाबीनचे दर खालावले असले तरी जानेवारी- फेब्रुवारीमध्ये उठाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आताच पैशाची आवश्यकता नाही अशा शेतकऱ्यांनी साठवणूक करण्यास हरकत नसल्याचा सल्ला व्यापारी अशोक आग्रवाल यांनी दिला आहे. मात्र, खरीपात झालेले नुकसान आता सण तोंडावर असल्याने शेतकऱ्यांचा विक्रीवरच भर आहे. 5 हजार दरावरच शेतकरी समाधान मानत आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. ही जमेची बाजू असून दर अणखीन वाढण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
मळणीनंतर वाळवण गरजेचे
पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या गंजी करुन ठेवल्या होत्या. आता पावसाने उघडीप दिल्यानंतर अनेकांनी सोयाबीनची मळणी केली आहे. मात्र, मळणी केले की साठवूण न ठेवता सोयाबीन वाळवणे आवश्यक आहे. त्यामुळे हवेचे प्रमाण हे कमी होते. आर्द्रतेचे प्रमाण हे 10 ते 12 वर आल्यावरच सोयाबीन साठवून ठेवणे आवश्यक आहे. सध्या ऊनही कडक असल्याने दोन दिवस वाळवले तरी भविष्यात सोय़ाबीनला बुरशी लागणार नाही.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6200 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6200 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6050 रुपये क्विंटल, जानकी चना 4975 रुपये क्विंटल, विजय चणा 5000, चना मिल 4850, सोयाबीन 5212, चमकी मूग 7250, मिल मूग 6350 तर उडीदाचा दर 700 एवढा राहिला होता. (Inflow of quality soyabean, rates are low, farmers worried, Latur Bazar Samiti)
संबंधित बातम्या :
डबल धमाका ..! शेतकऱ्यांना पी. एम किसान योजनेचे मिळणार दोन हप्ते !
पावसाने नव्हे तर शेतकऱ्याच्या मनमानी कारभारामुळे 40 एक्कर क्षेत्र बाधित, काय आहे नेमकं प्रकरण ?
पोषक वातावरणामुळे रब्बीचा ‘राजा’ हरभराच, विक्रमी लागवड होणार