कांद्याचा वांदाच ; रब्बीतील कांदा जोपासण्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे अव्हान, कृषी तज्ञांचा मोलाचा सल्ला
दराच्या चढ-उतारामु्ळे अनेक शेतकरी हे रात्रीतून लखपती झाले आहेत. त्यामुळे आता मराठवाड्यात देखील कांद्याचे क्षेत्र हे वाढतच आहे. यंदा मात्र, कांद्याच्या रोपावरच किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पावसापुर्वीच लागवड केली आहे त्यांना देखील पुन्नरलागवड करण्याची नामुष्की ओढावली आहे.
लातुर : मध्यंतरीच्या पावसाचा फटका हा केवळ खरिपातील पिकांनाच नाही तर रब्बीत लागवड होणाऱ्या कांद्यावरही झाला आहे. दराच्या चढ-उतारामु्ळे अनेक शेतकरी हे रात्रीतून लखपती झाले आहेत. त्यामुळे आता मराठवाड्यात देखील कांद्याचे क्षेत्र हे वाढतच आहे. यंदा मात्र, कांद्याच्या रोपावरच किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पावसापुर्वीच लागवड केली आहे त्यांना देखील पुन्नरलागवड करण्याची नामुष्की ओढावली आहे. किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि कांद्याची जोमाने वाढ होण्यासाठी कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांचा शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण सल्ला
मराठवाड्यात कांद्याचे उत्पादन हे केवळ हलक्या प्रतिच्या जमिनीवरच घेतले जात होते. मात्र, कांद्यातील अनिश्चितेमुळे काही शेतकरी हे रात्रीतून लखपती झाले तर काहींना पदमोडही करावी लागली आहे. मात्र, या बेभरवश्याचे उत्पादन आता मराठवाड्यातही वाढत आहे. रब्बीत येणाऱ्या कांद्याची तयारी ही खरिप हंगामापासूनच केली जात आहे. यंदाही खरिपातील पिकाला बगल देत कांद्याच्या रोपाची लागवड करण्यात आली होती.
मात्र, अतिवृष्टी झाल्याने काही ठिकाणी रोपच वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत तर उर्वरीत रोपावर आता करपा, आळीचे प्रमाण हे जास्त आहे. शिवाय प्रतिकूल वातादरणामुळे अनेकांना रोपाची पुन्नरलागवड करण्याची नामुष्की ओढावली आहे. कांदा लागवडीपूर्वीच शेतकऱ्यांना रोपाची जोपासना करण्यातच पैसे खर्ची करावे लागत आहे. अशा परस्थिती ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली आहे आणि रोप लागवडीच्या अवस्थेत आहे त्या शेतकऱ्यांसाठी कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांचा महत्वपूर्ण सल्ला राहणार आहे.
असे करा कांदा आणि रोपाचे व्यवस्थापन
वातावरणातील बदल आणि मध्यंतरीच्या पावसामुळे कांद्यावर किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्यामध्ये 65 टक्के सल्फर आणि 10 टक्के केनिकॅानॅझोन हे एकत्र असलेले औषध बाजारपेठेत उपनब्ध आहे. ते एकरी 30 ग्रॅम फवाराचे आहे. त्याच्या सोबत झिप्रोनील 30 मिली, लॅबडासायरोथ्रीन हे 8 मिली 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून शेतकऱ्यांना फवाराणी तात्का करावी लागणार आहे. यामुळे कांदा आणि कांद्याचे रोपही जोमात येणार आहे. दिवसागणिक वातावरणात बदल होत असल्याने शेतकऱ्यांनी वेळेत फवारणी करणे गरजचे झाले आहे.
हलक्या प्रतिच्या जमिनीवर होतेय कांद्याची लागवड
रोप अवस्थेत दीड महिना आणि लागवडीनंतर चार महिने असे साडेपाच महिन्याचे कांदा पिक आहे. हलक्या प्रतिच्या जमिनीवर कांद्याची झपाट्याने वाढ होते. त्यामुळे खरिपात तीन महिन्याचे पिक असलेल्या उडीदाचे क्षेत्र हे कांद्यासाठी राखून ठेवले जात आहे. आता उडीदाची काढणी झाली असून कांद्याची लागवड ही सुरु झाली आहे.
मजुराअभावी यांत्रीकरणाचा होतोय वापर
शेती कामासाठी मजूरांची टंचाई भासत आहे. शिवाय प्रत्येकाच्या शेतामध्ये खरीप काढणीची कामे सुरु असल्याने मजुर मिळत नाहीत. त्यामुळे कांदा लागवडीसाठी देखील आता यंत्राचा वापर वाढलेला आहे. यामुळे उत्पादनावर थोडा परिणाम होत असला तरी औषध फवारणीमधून त्याची सर भरुन काढण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. सध्या शेतशिवारात कांदा लागवडीची लगबग ही सुरु आहे. मात्र, लागवडीपूर्वीच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आता बाजारपेठेत काय भाव खातयं हे पहावे लागणार आहे.
संबंधित इतर बातम्या :
पुढील पाच दिवस पावसाचे, अशी घ्या शेतीपिकाची काळजी
रब्बा हंगामातील उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीशाळांचा उपक्रम, शेतकऱ्यांना होणार फायदा
आता होणार शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार, नेएमएलने सरकारशी केलेल्या कराराचा फायदा