Fruit Insurance : मुख्य फळपिकांना विमा कंपनीचा ठेंगा, सीताफळाला मात्र मंजुरी

पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या हीताच्या नाहीतर स्वता:च्या आर्थिक हीताचा निर्णय घेतात हे सातत्याने समोर आलेच आहे. पण नैसर्गिक संकटात असलेल्या फळ बागायतदार शेतकऱ्यांचा तरी सहानभूतीपुर्वक निर्णय घेणे गरजेचे असताना विमा कंपनीने जिल्ह्यात कमी क्षेत्रावर असलेल्या सीताफळाला विमा मंजूर केला आहे. मात्र, मोसंबी आणि डाळिंबाचे अधिकचे नुकसान होऊन देखील या फळपिकांना वगळण्यात आले आहे.

Fruit Insurance  : मुख्य फळपिकांना विमा कंपनीचा ठेंगा, सीताफळाला मात्र मंजुरी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 5:00 AM

जालना: पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या हीताच्या नाहीतर स्वता:च्या आर्थिक हीताचा निर्णय घेतात हे सातत्याने समोर आलेच आहे. पण नैसर्गिक संकटात असलेल्या (Fruit Orchardist) फळ बागायतदार शेतकऱ्यांचा तरी सहानभूतीपुर्वक निर्णय घेणे गरजेचे असताना (Crop Insurance Company) विमा कंपनीने जिल्ह्यात कमी क्षेत्रावर असलेल्या सीताफळाला विमा मंजूर केला आहे. मात्र, मोसंबी आणि डाळिंबाचे अधिकचे नुकसान होऊन देखील या फळपिकांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे (Kharif Season) खरीपानंतरही विमा कंपन्यांचा मनमानी कारभार हा सुरुच आहे. यामुळे खरीप हंगामात पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही आता फळ बागांबाबतही अशीच भूमिका निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यासाठी स्वतंत्र विमा योजनेची संकल्पना आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरवर्षीच नियमात बदल होत असून शेतकरीही याबाबत अनभिज्ञ असतात.

विमा भरुनही शेतकरी भरपाईच्या प्रतिक्षेत

गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरीही निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहे. त्यामुळे शेतकरी हे पीकविमा योजनेचे कवच घेत आहे. पण राज्यात विमा कंपन्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याने विमा रक्कम अदा करुनही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला हा मिळत नाही. हीच अवस्था जालना जिल्ह्यातील मोसंबी आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामानावर आधारित एचडीएफसी कंपनीकडे विमा रक्कम अदा केली होती. मात्र, या दोन फळपिकांनाच योजनेचतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.

सीताफळाचा समावेश असूनही अडचणी कायम

जालना जिल्ह्यामध्ये मोसंबीचे अधिक क्षेत्र आहे. त्याचअनुशंगाने पैठण येथे ‘सीट्रस इस्टेट’ ची उभारणी केली जात आहे. असे असतानाही पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा मृग बहर योजनेतून मोसंबी आणि डाळिंब या पिकांना तर वगळण्यात आले आहेच पण सीताफळाचा यामध्ये समावेश करण्यात आला असला तरी मापात पाप करुन तोकडाच विमा दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाने प्रथमच सीताफळासाठी विम्याचे कवच दिले होते पण विमा कंपन्यांच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला नाही.

हवामान बदलामुळे फळपिकांचे नुकसान

केवळ खरीप हंगामातील पिकांवरच वातावरण बदलाचा परिणाम झाला नाही तर फळबागांचेही नुकसान झाले होते. हाच धोका गेल्या काही वर्षांपासून कायम असल्या्ने जिल्ह्यातील फळ बागायत शेतकऱ्यांनी विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला शिवाय विमा रक्कमही अदा केली. असे असताना या मोसंबी आणि डाळिंब या मुख्य पिकांनाच डावलण्यात आले आहे. त्यामुळे विमा कंपनीने फेरविचार करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Latur: लातूरमध्ये 11 साखर कारखाने तरीही शेतकऱ्यांचा ऊस फडातच, नुकसानीला जबाबदार कोण?

शेतकरी उत्पादक कंपन्यामुळेच भारत बाजरी उत्पादनात जगाच्या केंद्रस्थानी, केंद्र सरकारचे कंपन्यांना पाठबळ

शेती उत्पादनवाढीसाठी ‘जीएम’ वाणांशिवाय पर्याय नाही, काय आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या?

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.