Hingoli : ऊस दरात अनियमितता, शेतकऱ्यांचे कारखान्यासमोरच उपोषण

कळमनुरी तालुक्यातील शिऊर साखर कारखाना लिमिटेडने यावर्षी ऊसाला केवळ एकेविससे रुपये दर दिला आहे, 2 हजार चारशे रुपये प्रति टन असा भाव जाहीर केलाय,पण एफआरपी प्रमाणे नाही तर नाही किमान 2 हजार 560 रुपये प्रति टन येवढा तरी भाव द्यावा या मागणीसाठी आज कारखाना परिसरात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे.

Hingoli : ऊस दरात अनियमितता, शेतकऱ्यांचे कारखान्यासमोरच उपोषण
साखर कारखाना
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 7:47 PM

हिंगोली : गत (Sugarcane Sludge) गाळप हंगामात ऊसाचे विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले होते. असे असतानाही (Sugarcane) ऊस उत्पादकांच्या पदरी निराशाच पडत आहे. साखर कारखाने आता शेतकऱ्यांना कात्रीत पकडत आहेत. साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे बीले अदा करावीत असा नियम आहे. असे असताना देखील कारखानदारांकडून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार (Hingoli District) हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शिऊर साखर कारखाना लिमिटेडने केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या कारखान्यात प्रतिटन केवळ 2 हजार 100 रुपये शेतकऱ्यांची हाती टेकवले जात आहेत. किमान 2 हजार 560 या प्रमाणे दर मिळावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कारखान्याच्या या भूमिकेवरुन शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरवात केली आहे.

घोषणा केली अंमलबजावणीचे काय?

कळमनुरी तालुक्यातील शिऊर साखर कारखाना लिमिटेडने यावर्षी ऊसाला केवळ एकेविससे रुपये दर दिला आहे, 2 हजार चारशे रुपये प्रति टन असा भाव जाहीर केलाय,पण एफआरपी प्रमाणे नाही तर नाही किमान 2 हजार 560 रुपये प्रति टन येवढा तरी भाव द्यावा या मागणीसाठी आज कारखाना परिसरात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे. एफआरपी सोडा किमान घोषणा केल्याप्रमाणे दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

विदर्भ अन् मराठवाड्यातील दरात तफावत

साखर कारखान्यानुसार ऊसाच्या दरातही तफावत आढळून येत आहे. मध्यंतरी गाळप अधिक आणि कारखाने कमी अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांनी सोय होईल त्या कारखान्यावर ऊसाचे गाळप केले होते. पण आता बीलावरुन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. विदर्भातील गुंज येथील साखर कारखान्याने 2 हजार 560 प्रतिटन असा दर दिला आहे. तर याप्रमाणेच दर न मिळाल्याने शेतकरी आता उपोषणाला बसले आहेत.जोपर्यंत मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत उपोषण हे सुरुच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

कारखान्यांसमोर दररोज एका गावचे शेतकरी

ऊसाला किमान दर मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी राहिलेली आहे. केवळ एकाच कारखान्यावर शेतकऱ्यांची लूट होतेय असे नाही तर या परिसरातील चार साखर कारखान्यात हीच स्थिती आहे. त्यामुळे या चार कारखान्यांसमोर दररोज एका गावातील शेतकरी उपोषणाला पाठिंबा म्हणून सोबत बसणार आहेत. आता यंदाचा हंगाम काही दिवसा येऊन ठेपला असताना देखील गतवर्षीच्या बिलाचा प्रश्न अद्याप कायम आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.