PM किसान योजनेत अनियमितता, महाराष्ट्रातील 4 लाख 45 हजार शेतकऱ्यांना द्यावा लागणार परतावा

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अनेकांनी अनियमितपणा दाखवत पैसे घेतलेले आहेत. देशभरात अशा शेतकऱ्यांचा आकडा हा 42 लाख 16 हजार आहे तर महाराष्ट्रात 4 लाख 45 हजार 497 शेतकरी हे अपात्र ठरले आहेत.

PM किसान योजनेत अनियमितता, महाराष्ट्रातील 4 लाख 45 हजार शेतकऱ्यांना द्यावा लागणार परतावा
पंतप्रधान किसान सन्मान योजना
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 2:53 PM

मुंबई : आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यामातून विविध योजना राबवल्या जात आहेत. हे सर्व होत असताना मात्र, (Pradhan Mantri Kisan Samman Yojana) पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अनेकांनी अनियमितपणा दाखवत पैसे घेतलेले आहेत. देशभरात अशा (Farmers) शेतकऱ्यांचा आकडा हा 42 लाख 16 हजार आहे तर महाराष्ट्रात 4 लाख 45 हजार 497 शेतकरी हे अपात्र ठरले आहेत. आता या अपात्र शेतकऱ्यांना सरकारचे पैसे परत करावे लागणार आहेत. या अनुशंगाने केंद्र सरकारने पावले उचलले असून अपात्र शेतकऱ्यांची यादीच प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे अनियमित कारभाराला आळा बसणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देशातील कोट्यावधी शेतकरी घेत आहेत. या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी 6 हजार रुपये हे 2 हजारांचे तीन हप्ते करुन थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. मात्र, काही अपात्र शेतकरीही योजनेचा लाभ घेत असल्याने केंद्र सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे.

या शेतकऱ्यांना करावे लागणार पैसे परत

सर्वसामान्य शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा हा केंद्र सरकारचा उद्देश होता. मात्र, या योजनेअंतर्गत फसवणूकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अधिकतर प्रकार हे बिहार राज्यात समोर आले आहेत. ज्या अपात्र शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत आपली नोंदणी केली आहे. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारांना पैसे परत करावे लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना पारदर्शक बनवण्यासाठी डीबीटी वेबसाईट बनवण्यात आली आहे. या लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील त्यांना सरकारला पैसे परत करावे लागणार आहे.

देशात 42 लाख 16 हजार अपात्र शेतकरी

देशातील 42.16लाख अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तर महाराष्ट्रातील 4,45,497 अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून 358 कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. या अपात्र शेतकऱ्यांकडून 29.127 लाख कोटी रुपये वसूल करणार आहे. महाराष्ट्रात असे 4 लाख 45 हजार 497 अपात्र असून ते सरकारचे 358 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

यांना नाही मिळत योजनेचा लाभ

*संविधानिक पदावर असणारा किंवा मंत्री असणारा शेतकरी *नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, विधानपरीषद आमदार, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य *केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकारी *प्राप्तिकर भरणारे शेतकरी *10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे शेतकरी *डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वकिल

अशा प्रकारे करा आपले नाव चेक

* या लिस्टमध्ये अपात्रतेत आपले नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सम्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या pmkisan.gov.in

* त्यानंतर होम पेजवर अपात्र श्रेणी, शेतकऱ्यांचे नाव, नोंदणी संख्या, लिंग, राज्य, ब्लॉक, जिल्हा, हफ्ता रक्कम, रिफंड मोड आणि बँकेच्या खात्याचे विवरण भरा.

*विवरण नोंदवल्यानंतर यादी स्क्रीनवर दिसून येईल.

* या यादीत आपले नाव आहे का त्याचा शोध घ्या.

*जर यादीत आपले नाव असले तर, योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम परत द्यावी लागेल.

संबंधित बातम्या :

सात दिवसांत 1 हजार रुपयांनी कांद्याच्या दरात घट, सरकारच्या निर्णयामुळेच शेतकऱ्यांचा वांदा

शेतकरी दुहेरी संकटात, शेळीपालनाचा जोडव्यवसायही अडचणीत

आवक असतानाही नंदुरबारमध्ये मिरचीचे लिलाव बंद, काय आहे कारण ?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.