Gadchiroli : धान खरेदी केंद्रात सुविधांपेक्षा अडचणी अधिक, विदर्भातील आमदारांच्या एकीने सुटणार का प्रश्न?

विदर्भात धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असते शिवाय खरेदी केंद्राशिवाय धान पिकाला योग्य दरही मिळत नाही. त्यामुळे यंदा उशीरा का होईना खरेदी केंद्र सुरु झाली आहेत पण काही जिल्ह्यात प्रति एकर 9.6 क्विंटल एवढे धान घेतले जात आहे तर काही ठिकाणी एकरी 14 क्विंटल एवढे धान हे आदिवासी विकास महामंडळाकडून घेतले जात आहे.

Gadchiroli : धान खरेदी केंद्रात सुविधांपेक्षा अडचणी अधिक, विदर्भातील आमदारांच्या एकीने सुटणार का प्रश्न?
विदर्भातील धान खरेदी केंद्रात अनियमितता आढळून येत आहे. धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्याची मागणी आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 11:36 AM

गडचिरोली : उशीरा का होईना शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे (Vidarbha) विदर्भात (Paddy Crop) धान खरेदी केंद्राला सुरवात झाली खरी पण शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायमच राहिले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये धान खरेदी केंद्र सुरु झाली पण वेगवेगळ्या नियमावलीने. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमता निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा विदर्भातील सर्वच आमदारांनी (Piyush Goyal) केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर वाचून दाखवला आहे. त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागून ठरवून दिलेल्या वेळेत धानाची खरेदी पूर्ण होणार का हे पहावे लागणार आहे.

खरेदी केंद्राच्या माध्यमातून दुजाभाव

विदर्भात धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असते शिवाय खरेदी केंद्राशिवाय धान पिकाला योग्य दरही मिळत नाही. त्यामुळे यंदा उशीरा का होईना खरेदी केंद्र सुरु झाली आहेत पण काही जिल्ह्यात प्रति एकर 9.6 क्विंटल एवढे धान घेतले जात आहे तर काही ठिकाणी एकरी 14 क्विंटल एवढे धान हे आदिवासी विकास महामंडळाकडून घेतले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. आदिवासी महामंडळाप्रमाणे सरकारने सुरु केलेल्या केंद्रावरही धान खरेदी मर्यादा वाढवून देण्याची मागणी होत आहे. लागलीच नियमावलीत बदल केला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

लोकप्रतिनिधींचे मंत्र्यांना साकडे

विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर येथील लोकप्रतिनीधी हे एकटले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना यासंदर्भात सर्वकाही माहिती दिली असून यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. सर्वच खरेदी केंद्रावर 14 क्विंटल मर्यादा ठरवून दिली तर शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान टळणार आहे. अन्यथा धान पीक हे खासगी बाजारपेठेतच विकावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्यांची पूर्तता झाली तर खरेदी केंद्राचा खऱ्या अर्थाने लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे. याकरिता गडचिरोलीचे आ.कृष्णा गजभिये,देवराव होऴी, बंटी भांगडिया यांनी पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा केली.

हे सुद्धा वाचा

चार जिल्ह्यांमध्ये धानाचे अधिक उत्पादन

धान हे विदर्भातील प्रमुख पीक आहे .दोन्ही हंगामात हे घेतले जात असले तरी खरिपात अधिकचे क्षेत्र आहे. शिवाय विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यात सर्वात जास्तीचे उत्पादन पदरी पडते. यंदा तर पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावरील मर्यादाही वाढली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात होणार आहे. आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यावर काय मार्ग काढणार का असा सवाल आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.