तुम्हाला माहिती आहे का पिकांची अंदाजित उत्पादकता कशी ठरवली जाते? जाणून घ्या
रब्बी हंगामाची. त्यानुसार मुख्य पिकांचा उत्पादकता कृषी विभागाने ठरवली आहे. त्यामध्ये अधिकचे महत्व हे हरभरा पिकाला देण्यात आले आहे. समाधानकारक पाऊस आणि पोषक वातावरण यामुळे हे स्वभाविकच होते. मात्र, नेमकी ही उत्पादकता कशाच्या पार्श्वभूमीवर सांगितली जाते हे आपण पाहणार आहोत.
लातूर : हंगाम कोणताही असो त्याच्या पूर्वतयारी नुसार कृषी विभागाकडून उत्पादकता ही ठरवली जाते. त्यानुसार शेतकऱ्यांना अंदाज बांधता येतो की, यंदा कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यावे म्हणून. आता खरीप हंगाम संपलेला आहे. लगबग सुरु आहे ती, (Rabi Season) रब्बी हंगामाची. (Crop Productivity) त्यानुसार मुख्य पिकांचा उत्पादकता कृषी विभागाने ठरवली आहे. त्यामध्ये अधिकचे महत्व हे हरभरा पिकाला देण्यात आले आहे. समाधानकारक पाऊस आणि पोषक वातावरण यामुळे हे स्वभाविकच होते. मात्र, नेमकी ही उत्पादकता कशाच्या पार्श्वभूमीवर सांगितली जाते हे आपण पाहणार आहोत.
कृषी विभागाने अंदाजित उत्पादकता सांगितल्यानंतर शेतकऱ्यांच्याही लक्षात येते की, यंदा या पिकाला अधिकचा उतार राहणार आहे. त्यामुळे ही उत्पादकता घोषित करणे म्हणजे शेतकऱ्यांना एक प्रकराचा सल्लाच असतो. मात्र, बदलत्या वातावरणानुसार या अंदाजित उत्पादनात बदलही होतो. त्यामुळे पेरणी होण्यापूर्वीच उत्पादकता सांगण्याचा उद्देश आणि महत्व हे जाणून घेणार आहोत..
उत्पादकात जाहीर करण्याची काय पध्दत
पेरणी आगोदर उत्पादकता ठरवताना त्या जिल्ह्यातील किंवा विभागातील गेल्या वर्षीची उत्पादकता आणि पाच वर्षात झालेले उत्पादन यावरुन आगामी काळात हेक्टरी किती उत्पादन होईल याचा अंदाज कृषी विभागातील तज्ञ काढत असतात. याशिवाय यंदा पाण्याची स्थिती कशी आहे? कोणत्या पिकास वातावरण हे पोषक आहे. याचा अभ्यास करुन एक अंदाज बांधला जातो की एकरी एवढे उत्पादन होणार त्याच्या सव्वापटीने अंदाजित उत्पादनाची घोषणा कृषी विभागाच्यावतीने केली जाते.
तीन वेळेस ठरवली जाते उत्पादकता
पेरणीपूर्वी पोषक वातावरण, गेल्या वर्षीची आणि पाच वर्षातील उत्पादकता यावरुण पेरणी होण्यापूर्वी उत्पादकता ठरवली जाते. त्यानंतर हंगामाच्या मध्यावर्ती पिकाची पाहणी करुन उत्पादकता ठरवली जाते. या दरम्यान, किडीचा प्रादुर्भाव आहे का? वातावरण कसे आहे ? ऐन पीक बहरात असताना कोणत्या अवस्थेत आहे या दरम्यान एक अंदाजित उत्पादन काढले जाते तर पीकाची कापणी झाल्यावर अंतिम उत्पादन हे ठरवले जाते.
काय आहे उद्देश?
कृषी विभागाने अंदाजित उत्पादकता काढली तर शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची लागवड किती प्रमाणात करावी याचा अंदाज येतो. यावेळी कृषी विभागाने हरभरा या पिकासाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज केला आहे. त्यानुसार हरभऱ्याचे क्षेत्र हे वाढणार आहे. त्यानंतर ज्वारीसाठीही पोषक वातावरण असल्याचे सांगण्यात आले आहे. कृषी विभागाच्या या अंदाजाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा हा यामागचा उद्देश आहे.
रब्बी पिकांची उत्पादकता जाहीर
लातूर विभागात हरभरा पिकाची हेक्टरी 10 क्विंटल 95 किलो प्रस्तावित करण्यात आली आहे तर गव्हाची हेक्टरी 17 क्विंटल 25 किलो, ज्वारी 13 क्विंटल 10 किलो, मका 8 क्विंटल 85 किलो, करडई 4 क्विटल 12 किलो तर सुर्यफूल 1 क्विंटल 40 किलो अशी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे. (It is decided that the estimated productivity of crops is determined by the Agriculture Department )
संबंधित बातम्या :
संशोधकांची किमया : शेळ्यांमध्येही आता ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या तंत्राचा वापर
आस्मानी संकट त्यात चोरट्यांचा धुमाकूळ, हताश 65 वर्षीय शेतकऱ्याची कहाणीच निराळी