Sugarcane : सहनशीलतेचा अंत, उसाच्या फडाला लावली काडी अन् उसतोड कामगरांबरोबर शेतकऱ्याची अशी ही ‘गांधीगिरी’
कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांच्या शेतात ऊसतोड कामगार हे दाखल झाले होते. पण ऊसाच्या फडात अधिकचा पालापाचोळा असल्याचे सांगत त्यांनी तोड करायला नकार दिला. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून तोडणीसाठी त्रस्त असलेल्या बर्गे यांच्या सहनशिलतेचा अंत झाला आणि त्यांनी चक्क 3 एकरातील उसाच्या फडाला तर आग लावली.
सातारा : मे महिन्याचा अंतिम टप्पा असतानाही राज्यात (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. केवळ मराठवाड्यातच नाहीतर इतर भागामध्येही हा प्रश्न कायम असल्याने शेतकरी त्रस्त आहे. प्रशासनाची आश्वासने आणि (Sugar Factory) कारखान्याकडून होणारी हेटाळणी याचा अतिरेक झाल्यावर काय होऊ शकते याचा प्रत्यय (Satara) सातारा जिल्ह्यातील चिंचणेर शिवारात आला आहे. उसतोडणीबद्दल केवळ आश्वासनांची खैरात मिळत असल्याने राजेंद्र बर्गे यांनी 3 एकरातील उभ्या ऊसाला आग लावली. एवढेच नाही ऊसतोडणीसाठी नकार देणाऱ्या उसतोड कामगारांचाही त्यांनी शाल श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार केला आहे. अतिरिक्त उसामुळे नुकसान केवळ शेतकऱ्यांचे होत आहे. प्रशासन आणि साखऱ कारखाने हे केवळ वेळकाढूपणा करीत आहे त.
20 महिन्यानंतरही ऊस फडाताच
लागण झाल्यानंतर किमान 12 महिन्यात ऊसाचे गाळप झाले तर वजन चांगले भरते आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. यंदा मात्र अतिरिक्त ऊसाचा प्रश्न असा काय निर्माण झाला आहे की, 20 महिने उलटूनही तोडणीविना ऊस फडातच उभा आहे. यामुळे वजनात तर घट होतेच पण ऊसाचे क्षेत्र हे गुंतून पडते. आता खरिपाचे दिवस आहेत शेतकऱ्यांना मशागतीचे काम करुन खरिपाचा पेरा करायचा असताना अनेक क्षेत्रावरील ऊस उभाच असल्याने दुहेरी नुकसान होत आहे. शिवाय आता शेतकऱ्यांनी पाणीही बंद केल्याने ऊस जागेवर वाळून जात आहे.
…म्हणून ऊसतोडणीसाठी कामगारांचा नकार
ऊस तोडणीसाठी कारखाना तयार झाला तरी ऊसतोड कामगारांची शेतकऱ्यांना मनधरणी ही करवीच लागते. आता शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांच्या ऊसामध्ये अधिकचे पाचरट असल्याचे कारण सांगत तोडणीला कामगारांनी नकार दिला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून तोडीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या बर्गे यांची कामगारांनी निराशा केली. शेतकऱ्यांना कारखान्याच्या चेअरमन पासून ते ऊस वाहतूकीसाठी दाखल होणाऱ्या वाहन चालकांची मनधरणी ही करावीच लागते. यातूनच त्रस्त झालेल्या बर्गे यांनी 3 एकरातील ऊसाला काडी लावली.
ऊसाचे नुकसान अन् कामगारांचा सत्कार
कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांच्या शेतात ऊसतोड कामगार हे दाखल झाले होते. पण ऊसाच्या फडात अधिकचा पालापाचोळा असल्याचे सांगत त्यांनी तोड करायला नकार दिला. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून तोडणीसाठी त्रस्त असलेल्या बर्गे यांच्या सहनशिलतेचा अंत झाला आणि त्यांनी चक्क 3 एकरातील उसाच्या फडाला तर आग लावलीच पण ऊस तोडणीसाठी नकार दिलेल्या कामगारांचा शाल श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. या गांधीगिरीची राज्यभर चर्चा होत असली तरी यंत्रणेने बर्गे यांचे दु:ख समाजावून घेणे तेवढेच गरजेचे आहे.