कृषी पंपावरुन रणकंदन : राज्य सरकारच्या सुल्तानी कारभारामुळेच ‘सुरज’ सारख्या शेतकऱ्याचा अस्त

रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच कृषी पंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीत केला जात आहे. शिवाय थकबाकीपोटी सक्तीची वीजबिल वसुलीही केली जात असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट ओढावले आहे. दरवर्षी उत्पादनात घट, वाढते कर्ज आणि यंदा पाणी असूनही केवळ कृषीपंपामुळे पिकांना देता येईना यामुळे पंढरपूर तालुक्यातील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने ‘पुन्हा कधी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही.अस म्हणत व्हिडीओ करुन विष प्राशन करुन आत्महत्या केली होती.

कृषी पंपावरुन रणकंदन : राज्य सरकारच्या सुल्तानी कारभारामुळेच 'सुरज' सारख्या शेतकऱ्याचा अस्त
कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यावरुन विधान सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 1:11 PM

मुंबई : रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच (Agricultural Pump) कृषी पंपाचा विद्युत पुरवठा हा खंडीत केला जात आहे. शिवाय (Arrears) थकबाकीपोटी सक्तीची वीजबिल वसुलीही केली जात असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट ओढावले आहे. दरवर्षी उत्पादनात घट, वाढते कर्ज आणि यंदा पाणी असूनही केवळ कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने पिकांना देता येईना यामुळे पंढरपूर तालुक्यातील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने ‘पुन्हा कधी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही.अस म्हणत व्हिडीओ करुन विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. याचे पडसाद आता राज्य विधीमंडळाच्या (At the convention) अधिवेशनात उमटत आहे. आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना आणि आता हे सुल्तानी संकट यामुळेच राज्यातील शेतकरी आत्महत्या संख्या वाढत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. एवढेच नाही तर सुरज जाधव च्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून किमान आता तरी कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

सरकारमुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

राज्य सरकारच्या धोरणामुळेच सुरज जाधव सारख्या तरुण शेतकऱ्यावर ही वेळ येत आहे. सरकारकडून शेतकरी हीताच्या गोष्टी अपेक्षित आहेत. मात्र, ठाकरे सरकारला नेमके झाले तरी काय? गेल्या दोन वर्षात अस्मानी संकट आणि यंदा सुल्तानी संकट यामुळे जणूकाही सरकारच हे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे चित्र सध्या राज्यात सुरु आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली पीके ही करपून जात आहेत. रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण असताना सरकारच अडचणी निर्माण करीत आहे. ठाकरे सरकारला नेमके झाले तरी काय असा सवाल यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला होता.

मंत्र्यांमध्ये अवमेळ, फटका शेतकऱ्यांना

गतवर्षीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाही कृषीपंपाची वीज कापली जाणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, ठाकरे सरकामध्ये अवमेळ आहे. आता उर्जामंत्री हे विद्युत पुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे ठणकावून सांगत आहे. सरकारच्या या धोरणांचाच फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत.

तरुणाकडून विष प्राशन करताना व्हिडीओ रेकॉर्ड!

विष प्राशन करताना या तरुणाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केलीय. ‘पुन्हा कधी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही. आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं. शेतकरी नामर्द आहे. शेतकऱ्याच्या जन्माला आपण कधीच येणार नाही. सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या नादी लागत नाही. शेतकऱ्याचा कधीही विचार करणारं नाही हे सरकार. जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत सरकार नाही’, असं म्हणत सुरजने विष प्राशन केलं.

संबंधित बातम्या :

Grape : सर्वकाही व्यर्थ, हंगामाच्या अंतिम टप्प्यात उत्पादनही घटले अन्…

Photo Gallery: अहो खरंच का… गायीच्या पोटी जुळ्या वासरांची जोडी, गाव म्हणतंय मारुतीरायाच्या सेवेचा प्रसाद!

शेतकरीच लावणार अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी, जिल्हानिहाय काय होत आहे निर्णय? वाचा सविस्तर

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.