कस्तुरी – भारतातील सर्वोत्तम कापसाचे प्रतिक

कस्तुरी कॉटनमध्ये, आपल्या स्वदेशी विकसित ब्लॉकचेन प्लॅटफॉर्ममुळे पारदर्शकता आणि विश्वास निर्माण होतो. ब्लॉकचेनद्वारे, पुरवठा श्रृंखलेच्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर ट्रेसेबिलिटीची काळजी घेतली जाते. चेन ऑफ कस्टडीच्या संपूर्ण श्रृंखलेवर क्यूआर कोड वापरून लक्ष ठेवता येते.

कस्तुरी - भारतातील सर्वोत्तम कापसाचे प्रतिक
Kasturi CottonImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 5:58 PM

गेले अनेक शतके, आपण आपल्या कापसामुळे जगाच्या कौतुकास पात्र बनलो आहोत असा कापूस ज्यात आहे सहजता, प्रसन्नता, शुद्धता आणि कलात्मकता. आता, आम्ही जागतिक बाजारात पदार्पण करणाऱ्या कस्तुरी कॉटन मध्ये देखील याच गुणांचा फायदा करून घेत आहोत.

वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार, कापड व्यापार मंडळे आणि उद्योग यांचा संयुक्त उपक्रम असलेले कस्तुरी कॉटन भारतीय कापसाचे सर्वोत्कृष्ट पैलू जगासमोर सादर करेल ज्याचा शेतकरी, जिनर्स, स्पिनर्स, उत्पादक आणि ब्रँडसह सर्व संबंधितांना फायदा होईल.

स्वप्न ते वास्तव

कस्तुरी कॉटनने प्रत्येक शेतकरी, जिनर, स्पिनर आणि कापूस उद्योगातील प्रत्येक संबंधिताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले आहे. कस्तुरी कॉटन हे एक मानचिन्ह आहे जे येथून पुढे प्रत्येक उत्तम दर्जाचा कापूस धारण करेल. कस्तुरी कॉटनने कापसाच्या विश्वात एक कायमस्वरूपी ठसा निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली आहे!

कस्तुरी कॉटन मध्ये,

आम्ही सर्वजण एक असे भारतीय परिमाण निर्माण करत आहोत जे संपूर्ण जागतिक कापूस बाजारपेठेत प्रशंसेस पात्र असेल. कोणतीही तडजोड न करता, कायमस्वरूपी सर्वोत्तमता साध्य करणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि आमच्या या मार्गात गुणवत्तेचा प्रत्येक बेंचमार्क (टप्पा) साध्य करण्याची आम्ही काळजी घेतो. शेतापासून ते अंतिम उत्पादनापर्यंत गुणवत्तेची परिमाणे सक्षम व विश्वासार्ह रहावीत या दृष्टीकोनातून आपल्या ट्रेसेबिलिटी व सर्टिफिकेशन प्रक्रियेची काळजीपूर्वक आखणी करण्यात आली आहे.

कस्तुरी कापसाची निवड करण्याचे फायदे

कस्तुरी कॉटनच्या परिमाणांचे पालन केल्यास त्यामुळे अनेक फायदे होतात जे फक्त गुणवत्तेपेक्षा देखील मोठे आहेत. आमचा कापूस केवळ चांगला नाही; तर त्याची सर्वोत्तमता कामस्वरूपी आहे, उच्च गुणवत्तेच्या सर्वोच्च परिमाणांशी सुसंगत आहे. प्रगत कार्यपद्धतींचा फायदा करून, आम्ही भारतीय कापसासाठी त्याचा मुलायमपणा वाढवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तसेच त्याची मजबुती आणि टिकाऊपणा वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर, कस्तुरी कॉटनमध्ये रंगांची वैविध्यता आहे ज्यामुळे अंतिम उत्पादन नजरेस निश्चितच भरेल आणि आकर्षक होईल मग ते घरगुती वापराचे कापड असो किंवा परिधान करण्याचे वस्त्र असो.

भारतात आपल्या कापसाची अभिमानाने लागवड केली जाते. तुम्हाला कधीही त्याच्या अस्सलपणाबद्दल शंका असेल तर ते ही आम्ही यात समाविष्ट केले आहे. आमच्या नाविन्यपूर्ण ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, तुम्ही जिनरपासून ते तुमच्या उत्पादनांपर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्याचा मागोवा घेऊ शकता, ज्यात या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर विश्वासार्ह गुणवत्ता आणि पारदर्शकता यांची काळजी घेतली जाते. कस्तुरी कॉटन कार्यक्रमात सहभागी होऊन, तुम्ही केवळ उच्च दर्जाच्या कापसाची जागतिक मागणी पूर्ण करत नाही तर तुम्ही भारतीय कापसाला जागतिक पातळीवर विजेते देखील बनवत आहोत. आणि आमच्यावर विश्वास ठेवा, तुमच्या कस्तुरी-ब्रँडेड कापसासाठी बाजारपेठ अधिक पैसे देण्यास सुद्धा तयार आहे. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करणे खरोखर योग्य आहे. मग, वाट कशाची बघताय? कस्तुरीसोबत तुमच्या कापसाच्या उद्योगाला उत्तुंग पातळीवर घेऊन चला.

कार्यक्रमाची कार्यपद्धती

ह्या कार्यक्रमाद्वारे मुलायमपणा, चमकदारपणा, मजबुत, आल्हाददायकपणा आणि शुभ्रता अनेक फायदे करून देण्यासाठी गुणवत्तेची हमी देण्यास ‘कस्तुरी’ वचनबद्ध आहे. या कस्तुरी कॉटन भारत कार्यक्रमात 4 मुख्य उपक्रमांचा समावेश आहेः

1. ऑडीट आणि इंस्पेक्षण 2. नमुने घेणे व चाचणी 3. प्रमाणिकरण (सर्टिफीकेशन) 4. ब्रँडिंग

ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर पहिल्या 3 उपक्रमांचे काम क्यूआर कोड तंत्रज्ञान वापरून करण्यात येईल. याद्वारे कापसाच्या प्रत्येक लॉटचा नमुना घेतला जाईल आणि गुणवत्तेच्या 7 प्रमुख निकषांसाठी त्याची चाचणी केली जाईल आणि जर या चाचण्या उत्तीर्ण झाल्या तर त्याला कस्तुरी कॉटन असे प्रमाणित केले जाईल. या चाचणी केलेल्या आणि प्रमाणित कापसापासून बनवलेली उत्पादने, म्हणजे धागा, कापड, घरगुती कापड आणि कपडे त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत ट्रेसेबल असतील. शेतकरी हे या ब्रँडचे पहिले पालक असतील आणि जिनर्स त्याचे सर्वप्रथम मूल्यनर्धनाचे काम करतील ज्यांच्यावर खालील निकषांची पूर्तता करणारा कापूस वितरीत करण्याची जबाबदारी आहेः

1. अतिशय आल्हाददायक अंतिम उत्पादन तयार करण्यासाठी 29 मिमी आणि 30 मिमी लांबीचा धागा 2. उत्पादनात अधिक कार्यक्षमता साध्य करण्यासाठी 2% पेक्षा कमी कचरा 3. उत्पादनात सुलभता साध्य करण्यासाठी 8% पेक्षा कमी आर्द्रता 4. कापसाचा धागा अधिक टिकण्यासाठी कापसाच्या धाग्याची मजबुती 29.5 g/tex आणि 30.5 g/tex 5. मुलायमपणा आणि चमकदारपणा वाढविण्यासाठी मायक्रोनेअर मूल्य 3.7 ते 4.5 पर्यंत 6. शुभ्रता वाढवण्यासाठी 76+ चे आरडी मूल्य 7. अधिक शुद्धतेसाठी 83% + आणि 84% + प्रत्येक स्टेपलचा एकसारखेपणा

तुमच्यासाठी यात काय आहे?

शेतकऱ्यांसाठी

योग्य वेचणी आणि साठवणुक यासह कस्तुरी परिमाणांनुसार तुमच्या कापसाचे उत्पादन घेतल्यास कचऱ्याचे प्रमाण कमी होते. यामुळे बाजारात तुमच्या उत्पादनाची किंमत वाढेल. कस्तुरी मार्क हे कापसाच्या गुणवत्तेचे सर्वोच्च मानक आहे ज्यामुळे तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळते.

जिनर्ससाठी

कस्तुरी कॉटन सोबत काम केल्यास तुम्हाला त्यामुळे अनेक फायदे होतील. सर्वप्रथम, कापसाच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याने तुम्हाला तुमच्या कापसासाठी चांगला परतावा मिळेल. दुसरे म्हणजे, कस्तुरी कॉटन हे उद्योगक्षेत्रातील सहकाऱ्यांसारख्या प्रमुख संबंधितांच्या एकत्रित प्रयत्नाचे फलित आहे, ज्याचा अर्थ तुम्ही काढत असलेल्या कस्तुरी कॉटनसाठी उत्सुक खरेदीदार तयार आहेत. तिसरे म्हणजे, कस्तुरी प्रमाणपत्र मिळाल्याने तुमच्या व्यवसायाला जागतिक पातळीवर मान्यता मिळते त्यामुळे तुमचा नफा देखील वाढेल. शेवटी, परिपूर्ण ट्रेसेबिलिटीमुळे संपूर्ण उत्पादन प्रक्रियेवर भरवसा आणि विश्वास ठेवला जातो.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान

कस्तुरी कॉटनमध्ये, आपल्या स्वदेशी विकसित ब्लॉकचेन प्लॅटफॉर्ममुळे पारदर्शकता आणि विश्वास निर्माण होतो. ब्लॉकचेनद्वारे, पुरवठा श्रृंखलेच्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर ट्रेसेबिलिटीची काळजी घेतली जाते. चेन ऑफ कस्टडीच्या संपूर्ण श्रृंखलेवर क्यूआर कोड वापरून लक्ष ठेवता येते, ज्यामुळे उत्पादन ते वितरण अशा संपूर्ण कार्यपद्धतीचा अगदी सहज मागोवा घेता येतो आणि पारदर्शकता ठेवता येते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे पुरवठा श्रृंखलेत जबाबदारी आणि विश्वास वृद्धिंगत होतो, त्यामुळे तुम्हाला, आमच्या संबंधितांना उत्पादनाचा विश्वसनीय पुरावा प्राप्त होतो.

थोडक्यात, कस्तुरी कापूस उपक्रम हा जागतिक बाजारपेठेत भारतीय कापसाचा ठसा उमटविण्याच्या दृष्टीकोनातून एक महत्त्वाचे पाऊल आहे. संपूर्ण कापूस पुरवठा श्रृंखलेतील संबंधितांच्या सहकार्याने आणि गुणवत्ता आणि ट्रेसेबिलिटी यात सुधारणा करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या संघटनाद्वारे, कस्तुरी कॉटनला भविष्यातील पिढ्यांसाठी उत्तमता आणि देशाचा अभिमान यांचे प्रतिक म्हणून प्रस्थापित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.