Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati: देर आए दुरुस्त आए, रब्बीच्या अंतिम टप्प्यात मिळाली खरिपाची नुकसानभरपाई

खरीप हंगामातील पिकांना अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा फटका बसला होता. पिकांचेच नाही तर शेतजमिनीचेही नुकसान झाले होते. नुकसानीची दाहकता पाहता राज्य सरकारकडून मदतीची घोषणा तर झाली मात्र, पुर्तता करण्यासाठी तब्बल 5 महिन्यांचा अवधी लागलेला आहे. पिकनिहाय रकमेचे स्वरुप ठरवून ही मदत देण्यात आली ती ही दोन टप्प्यामध्ये. पहिला टप्पा हा दिवाळीनंतर शेतकऱ्यांना मिळाला तर उर्वरीत 25 टक्के रक्कम सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे.

Amravati: देर आए दुरुस्त आए, रब्बीच्या अंतिम टप्प्यात मिळाली खरिपाची नुकसानभरपाई
खरीप हंगामात पावसाने पिकांचे नुकसान झाले होतेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 10:12 AM

अमरावती:  (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांना अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा फटका बसला होता. पिकांचेच नाही तर शेतजमिनीचेही नुकसान झाले होते. नुकसानीची दाहकता पाहता (State Government) राज्य सरकारकडून मदतीची घोषणा तर झाली मात्र, पुर्तता करण्यासाठी तब्बल 5 महिन्यांचा अवधी लागलेला आहे. पिकनिहाय रकमेचे स्वरुप ठरवून ही मदत देण्यात आली ती ही दोन टप्प्यामध्ये. पहिला टप्पा हा दिवाळीनंतर शेतकऱ्यांना मिळाला तर उर्वरीत 25 टक्के रक्कम सध्या (Farmer Account) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. त्याच अनुशंगाने अमरावती जिल्ह्यातील 11 तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील 33 कोटी 71 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. देर आऐ…दुरुस्त आऐ अशीच काहीशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. पहिल्या टप्प्यात 126 कोटी आणि आता दुसरा टप्पा 33 कोटी 71 लाख रुपये हे जमा झाले आहेत.

1 लाख 64 हजार हेक्टरावरील पिके झाली बाधित

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे सध्या शेतीमालाचे दर वाढले तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 64 हजार 999 हेक्टरावरील पिके ही बाधित झाली होती. यासाठी शासनाने 126 कोटींचा पहिला टप्पा दिवाळीच्या दरम्यान वितरित केला होता. त्यानंतर आता राहिलेला दुसऱ्या टप्प्याचा 33 कोटी 71 लाखाचा निधी तब्बल पाच महिन्यांनी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केला आहे.

कसे होते मदतीचे स्वरुप?

पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने पंचनामे करण्यात आले होते. यासंबंधीचा अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकारकडूनदोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत कोरडवाहूसाठी हेक्टरी 10 हजार तर बागायतीसाठी 18 हजार व फळबागांसाठी 25 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली होती. मात्र, एकरकमी मदत न करता याचे दोन टप्पे ठरवून देण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 75 टक्के तर दुसऱ्या टप्प्यात 25 टक्के रक्कम ही ठरविण्यात आली होती. त्यानुसार गेल्या महिन्याभरापासून ही उर्वरीत 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.

सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनचे

खरीप हंगामातील सोयाबीन हे मुख्य पीक आहे. हे पीक बहरात असतानाच अतिवृष्टीने हजेरी लावली होती. काही भागात काढणी सुरु होती तर काही ठिकाणी सोयाबीनच्या बनीमचीच वहिवाट झाली होती. त्या नुकसानीचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला आहे. मात्र, पाच महिन्यानंतर का होईना शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे.

संबंधित बातम्या :

Krishi Udan Scheme : शेतकऱ्यांचा शेतीमाल सातासमुद्रापार, असा घ्या योजनेचा लाभ..!

मराठवाड्यात उभा राहतोय रेशीम शेतीचा पर्याय, लागवड ते काढणी असे करा नियोजन..!

Rabi Season: ज्वारी बाजारात, पहिला मान सोलापूर बाजार समितीला, हंगामाच्या सुरवातीला मुख्य पिकाचे चित्र काय?

दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा.