डाळिंबापेक्षाही टोमॅटो महाग, केव्हा मिळणार दिलासा? केंद्र सरकारनेच सांगितला तोडगा

मध्यंतरी झालेल्या बेमोसमी पावसाचा परिणाम अद्यापही बाजारपेठेवर जाणवत आहे. सध्या टोंमॅटो उत्पादक राज्यातून टोमॅटोची आवक होत नसल्याने दर गगणाला भिडलेले आहेत. महाराष्ट्र राज्यात 65 रुपये किलो तर राजधानी दिल्ली येथे 75 रुपये किलो टोमॅटोची विक्री होत आहे. दुसरीकडे फळ असणारे डाळिंब हे 50 रुपये किलो मिळू लागले आहे.

डाळिंबापेक्षाही टोमॅटो महाग, केव्हा मिळणार दिलासा? केंद्र सरकारनेच सांगितला तोडगा
टोमॅटो
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 12:52 PM

मुंबई : मध्यंतरी झालेल्या बेमोसमी पावसाचा परिणाम अद्यापही बाजारपेठेवर जाणवत आहे. सध्या टोंमॅटो उत्पादक राज्यातून टोमॅटोची आवक होत नसल्याने दर गगणाला भिडलेले आहेत. महाराष्ट्र राज्यात 65 रुपये किलो तर राजधानी दिल्ली येथे 75 रुपये किलो टोमॅटोची विक्री होत आहे. दुसरीकडे फळ असणारे डाळिंब हे 50 रुपये किलो मिळू लागले आहे. अतिवृष्टीने केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसा झाले होते. त्यामुळेच आता आवक घटली असून दर हे वाढत आहेत. डिसेंबरपर्यंत असेच दर राहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, “देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधून टोमॅटोचे आगमन डिसेंबरच्या सुरुवातीपासून सुरू होईल. यामुळे आवक वाढेल आणि किंमती कमी होतील. डिसेंबरमध्ये आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अणखीन काही दिवस तरी अधिकच्या दरानेच टोमॅटोची खरेदी करावी लागणार आहे.

पावसामुळे टोमॅटोचे नुकसान होते

यावर्षी नोव्हेंबरमध्ये 19 लाख 62 हजार टन टोमॅटोची आवक झाली तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत ही आवक 21 लाख 32 हजार दशलक्ष टन होती. टोमॅटोच्या दरवाच्या कारणाबाबत मंत्रालयाने सांगितले की, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात बेमोसमी पावसामुळे सप्टेंबरअखेरपासून टोमॅटोच्या किरकोळ किंमती वाढल्या आहेत. पावसामुळे टोमॅटोपिकाचे नुकसान झाले आणि या राज्यांमधून होणारी आवक ही लांबणीवर पडलेली आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात मुसळधार पाऊस पडला आणि पुरवठा खंडित झाला आहे. शिवाय पिकांचेही नुकसान झाले. मंत्रालयाने सांगितले की, टोमॅटोची किंमत अत्यंत अस्थिर आहे. टोमॅटोचा पुरवठा होण्यास झालेल्या उशिरामुळेच सध्याचे दर वाढत आहेत.

वाढत्या मागणीचाही परिणाम दरावर

सबंध देशात टोमॅटो हा 65 ते 70 रुपये किलोने विकला जात आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने सध्याची परस्थिती निर्माण झाली आहे. या महिन्यात 25 नोव्हेंबरपर्यंत टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किंमत 67 रुपये प्रति किलो होती, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 63 टक्क्यांनी जास्त आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चालू वर्षात टोमॅटोचे खरीप उत्पादन गेल्या वर्षीच्या 70 लाख 12 हजार टनाच्या तुलनेत 69 लाख 52 हजार टन आहे.

महाराष्ट्रात 65 रुपये किलो टोमॅटोचा दर

गेल्या काही दिवसांपासून सर्वच राज्यांमध्ये टोमॅटोच्या किंमती ह्या वाढत आहेत. महाराष्ट्रात तर 65 रुपये किलोपर्यंत दर गेले असून आता डाळिंबापेक्षाही टोमॅटोला अधिकचा भाव आला आहे. फळांना प्रमाणे टोमॅटोला महत्व आले आहे. शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत टोमॅटोच्या किरकोळ किंमती 75 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले, तर दक्षिण भारताच्या काही भागात किंमती कमी झाल्या, पण किंमत अजूनही जास्त आहे. उत्तर भारतातील राज्यांमधून टोमॅटोची आवक होत नाही तोपर्यंत दर असेच राहणार आहेत.

संबंधित बातम्या :

काय सांगता? एकरकमी विजबिल थकबाकी भरल्यास 50 टक्के सूट, शेतकऱ्यांना सुवर्णसंधी

जनावरांची देखरेख आता पशुमंडळाकडे, कामधेनूच्या गावात वाढले दुधाचे उत्पादन

Smart Farmers : ‘ई-पीक पाहणी’चा पहिला टप्पा यशस्वी आता ‘ई-पंचनामाचे’ अव्हान

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.