आम्हालाही दिवाळी साजरी करु द्या..! किसान सभेची संघर्ष दिंडी बीडमध्ये ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या
गेल्या काही दिवसांपासून परळी तालुक्यातील सिरसाळा येथून काढण्यात आलेली किसान सभेची संघर्ष दिंडी आज (सोमवारी) बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली. गेल्या पाच दिवसांपासूनचा प्रवास आज थंडावला आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन ही संघर्ष दिंडी काढण्यात आली होती. पीकविमा, नुकसानभरपाई वेळेत अदा केली नाही तर या संघर्ष दिंडीतील पदाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामुक्काम करणार आहेत.
बीड : गेल्या काही दिवसांपासून (Parali) परळी तालुक्यातील सिरसाळा येथून काढण्यात आलेली (Kisan sabha) किसान सभेची संघर्ष दिंडी आज (सोमवारी) बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली. गेल्या पाच दिवसांपासूनचा प्रवास आज थंडावला आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन ही संघर्ष दिंडी काढण्यात आली होती. पीकविमा, नुकसानभरपाई वेळेत अदा केली नाही तर या संघर्ष दिंडीतील पदाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामुक्काम करणार आहेत.
यंदाचाच नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गतवर्षीचाही विमा मिळालेला नाही. त्यामुळे अखिल भारतीय किसान सेभेने जुलै 2021 पासून आंदोलनाला सुरवात केलेली होती. याकिरता परळी,बीड, पुणे, मुंबई या ठिकाणीही आंदोलने करण्यात आली होती. मात्र, विमा कंपनीने याकडे कायम दुर्लक्ष केलेले आहे. शासनाचे आदेश असतानाही शेतकऱ्यांचे पैसे हे अदा केलेले नाहीत. त्यामुळे गत आठवड्यापासून परळी तालुक्यातील सिरसाळा ते बीड जिल्हाधिकारी कार्यालय अशी संघर्ष दिंडी काढण्यात आली होती. आज (सोमवारी) बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही संघर्ष दिंडी दाखल झाली होती. शेतकऱ्यांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर हा दणाणून गेला होता.
आम्हालाही दिवाळी साजरी करु द्या
केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होते. मात्र, शेतकऱ्यांनाच त्यांच्या हक्काचा पैसा मिळत नाही. गेल्या वर्षभरापासून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संघर्ष हा पिक विम्याच्या पैशासाठी सुरु आहे. शासनाने आदेश देऊनही विमा कंपनीने पैसे अदा केलेले नाहीत. त्यामुळे सिरसाळा ते बीड जिल्हाधिकारी कार्यालय अशी संघर्ष दिंडी काढण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून दिंडी पदाधिकारी पायी प्रवास करीत आहेत. आता तरी हक्काचे पैसे जमा करुन शेतकऱ्यांनाही दिवाळी साजरी करु देण्याचे साकडे मोहन जाधव यांनी घातले.
काय आहेत किसान सभेच्या मागण्या?
सन 2020 सालीही अतिवृष्टीने खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या सर्व पिकांचा विमा तात्काळ जमा करावा, केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे 2020 चा खरीप हंगामातील पिक विमा मंजूर करण्यात यावा, शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये म्हणून साखर कारखाने हे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावेत शिवाय एफआरपी रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. एफआरपी रक्कम ही एकरकमी मिळण्याच्या मागणीसाठी ही संघर्ष दिंडी काढण्यात आली होती. आज बीड येथे दिंडी दाखल झाली असून मागण्या मान्य केल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महामुक्काम केला जाणार आहे. (Kisan Sabha struggle Dindi finally arrives in Beed, travels on foot on crop insurance question)
संबंधित बातम्या :
जे 50 वर्षात घडलं नाही ते परभणी कृषी विद्यापीठाने यंदा करुन दाखवंल..!
कर्जमाफीसाठी ही शेवटची संधी, प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा कर्जबाजारीपणाचा शिक्का कायम राहणार..!