सरकारचा निर्णय बायोडिझेलबाबतचा अन् फायदा होणार शेतकऱ्यांना
जेट्रोफ्रा ही झुडपी वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीच्या बियाणांतून तेल काढले जाते. हे तेल गाळल्यानंतर ट्रॅक्टर, जनरेटर, रेल आणि सर्व प्रकारच्या वाहनांना हे वापरता येणार आहे. त्यामुळे जेट्रोफ्रा या वनस्पती लागवड शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायदेशीर ठरू शकते.
मुंबई : जेट्रोफ्रा ही झुडपी वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीच्या बियाणांतून तेल काढले जाते. हे तेल गाळल्यानंतर ट्रॅक्टर, जनरेटर, रेल आणि सर्व प्रकारच्या वाहनांना हे वापरता येणार आहे. त्यामुळे जेट्रोफ्रा या वनस्पती लागवड शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायदेशीर ठरू शकते. देशातील अनेक राज्यांमध्ये या झुडपी वनस्पतीची लागवड केली जाते. कारण अधिकचा फायदा असल्याचे सिद्ध होत आहे. हळूहळू त्याची मागणीही वाढत आहे. त्याच्या बियाणांपासून भरपूर तेल तयार करतात जे इंजिन चालविण्यासाठी वापरले जाते. अशा परिस्थितीत जेव्हा डिझेलचे (Disel) दर गगनाला भिडत आहेत तेव्हा हे बॉटनडिझेल हा एक चांगला पर्याय समोर येत आहे. याशिवाय लोक आपल्या बागेत सजावटीसाठीही ते लावतात.
सरकारचा हा मोठा निर्णय
सरकारने डिझेलवरील जीएसटीचा दर 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. यामुळे बायोडिझेलची मागणी वाढण्याची अपेक्षा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
जेट्रोफाचे फायदे
ज्या शेतकऱ्यांनी जेट्रोफा प्रकल्प शेताभोवती उभारला आहे, त्या शेताभोवती हे जेट्रोफा सीमा भिंतीप्रमाणे कार्य करते. त्यामुळे वन्यय जनावरांपासून पिकाचे संरक्षण होते. तसेच जेट्रोफा ह्या तेलासाठी वापरल्या जातात. साबणही त्याच्याच तेलापासून बनविला जातो. त्याचा उपयोग जाळणे आणि वंगण तयार करण्यासाठीही केला जातो. शिवाय जेट्रोफामध्ये औषधी गुणधर्मदेखील आहेत. त्यामध्ये “जेट्रोफिन” नावाचा एक घटक आहे. ज्याची कर्करोग प्रतिरोधक क्षमता आहे. त्याचे तेल कर्करोगाच्या औषधांमध्ये वापरले जाते. खाज, सांधेदुखी, अर्धांगवायु इत्यादींसाठीही वापर केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेट्रोफा बियाण्यांपासून सामान्य स्पेलर्सकडून तेल काढले जाते. तेल गाळल्यानंतर ट्रॅक्टर, जनरेटर, रेल आणि सर्व प्रकारची डिझेल वाहने इत्यादी सर्व प्रकारची डिझेलचालित इंजिने वापरली जाऊ शकतात. त्यामुळे त्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते,
जमीन आणि हवामान
जेट्रोफो हे सर्व प्रकारच्या जमिनींसाठी योग्य आहे. परंतु जिथे लागवड केली जात आहे तेथे पाणी साठले जाणार नाही याची खात्री करा. त्यासाठी जास्त पाण्याची गरज नाही.
अशी करा जेट्रोफाची लागवड
जेट्रोफोरा ची लागवड करण्यापुर्वी तीन ते चार वेळा मशागत करणे आवश्यक आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी त्याची लागवड केली जाते. 5 बाय 45 सेंमी एवढ्या अंतरावर रोपाची लागवड करावी. रोपाच्या प्रत्येक खड्डयात एक पाटी कंपोस्ट खत ज्यामध्ये 200 ग्रॅम केक पावडर टाकावी. वनस्पती लागवडीच्या वेळी प्रत्येक खड्ड्यात सुमारे 20 ग्रॅम युरिया + 120 ग्रॅम सुपर फॉस्फेट + 15 ग्रॅम मराट याचे मिश्रण करुन टाकणे आवश्यक आहे. (Know all about biodiesel, government takes big decision to increase farmers’ income rapidly)
संबंधित इतर बातम्या :
मिरचीचा ठसका शेतकऱ्यालाच, कवडीमोल दरामुळे फिरवला नांगर
फळगतीचा धोका ; फळबागांची अशी घ्या काळजी, सोशल मिडीयातील मॅसेज हे फसवे