Animal Bloating : कशामुळे फुगते जनावरांचे पोट? काय आहे उपाययोजना, वाचा सविस्तर
वाढत्या उत्पादनाबरोबरच जनावरांची निघरणी करणेही तेवढेच गरजेचे आहे. सर्व मोसमात शेळ्या मेंढ्या व मोठी जनावरे यांच्यामधील रोग म्हणजे 'पोटफुगी' होय. खाद्यामधील झालेल्या बदलामुळे आणि अखाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा इतर कारणामुळे जनावरांच्या पोटातील अन्नावर किण्वनाची प्रकिया जास्त प्रमाणात वाढते.
पुणे : शेती या मुख्य व्यवसायाला पशूपालनाची जोड दिली जात आहे. यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. (Farming) शेती या मुख्य व्यवसयातून हंगामी उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत असले तरी दूधाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजा भागत आहेत. वाढत्या उत्पादनाबरोबरच जनावरांची निघरणी करणेही तेवढेच गरजेचे आहे. सर्व मोसमात शेळ्या मेंढ्या व मोठी जनावरे यांच्यामधील रोग म्हणजे ‘पोटफुगी’ होय. (Animal Food) खाद्यामधील झालेल्या बदलामुळे आणि अखाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा इतर कारणामुळे ( Animal bloating) जनावरांच्या पोटातील अन्नावर किण्वनाची प्रकिया जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे पोटात वायू जास्त प्रमाणात तयार होतो. हा वायू नैसर्गिकरित्या बाहेर टाकला जाऊ शकत नाही. या वाढलेल्या वायूचा ताण पोटाच्या पिशव्यांवर होतो यालाच ‘ पोटफुगी ‘ म्हणतात.
पोटफुगीची कारणे
कोवळ्या, जास्त प्रथिनयुक्त व किण्वन करू शकणाऱ्या ज्वारी, बाजरी व वाटाणा, मक्याची हिरवी धाटे यासारख्या वनस्पती जास्त प्रमाणात खाल्ल्यास तसेच जास्त प्रमाणात ऊसाची मळी, चोथरी जनावरांच्या खाद्यात गेल्यास जनावरांचे पोट फुगते. अन्ननलिकेवरील व जठरावरील सूज, जतांचा प्रादुर्भाव तर काही जनावरांत आनुवंशिकतेने तोंडातील लाळेचा होणारा स्त्राव हा कमी प्रमाणात असल्यामुळे अन्न चावताना किंवा रवंथ करताना लाळ अन्नात योग्य प्रमाणात मिसळू शकत नाही. अखाद्य वस्तू उदा. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लास्टिक व इतर अखाद्य वस्तू सेवन केल्यास पोट फुगीचा त्रास होतो.
ही आहेत पोटफुगीची लक्षणे
जनावराचे पोट फुगल्यावर जनावर खात पीत नाही, ते सुस्तावते. जनावरांच्या पोटाचा आकार विशेषतः डाव्या भकाळीचा जास्त प्रमाणात वाढतो. जनावर डोळे व मान उंचावून ताणते. मागच्या पायाने पोटावर लाथा मारते, डाव्या भकाळीकडे पाहते. पोटातील वायूमुळे पोटाच्या पिशव्यांच्या दाब फुफ्फुस आणि हृदयावर पडतो त्यामुळे जनावरास श्वासोच्छावासास त्रास होतो. पोटफुगी एवढी वाढते की, पोटाच्या पिशव्यांचा ताण फुफ्फुसावर जास्त प्रमाणात येऊन दम कोंडी होऊन जनावर कोसळते. फुफ्फुसावर जास्त दाब वाढला तर श्वास कोंडून जनावर दगावतेही.
काय आहेत उपचार
उपचाराबरोबरच योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे जनावरे बांधताना पुढचे पाय उंचावर व मागचे पाय उतारावर असतील. यामुळे फुगलेल्या अन्नाचा पिशवीचा दाब फुफ्फुसावर पडणार नाही. पोट फुगल्यावर जनावराच्या डाव्या भकाळीवर हाताने मालिश केल्यास जनावरांना आराम वाटतो. जनावरांच्या तोंडात आडवी कडुलिंबाची एक फूट लांबीची लाकडी काठी ठेवून ती मुरकीस दोन्ही बाजूस बांधावी. अशाप्रकारे ही काठी तोंडात राहिल्यामुळे जनावर त्या काठीस सतत चघळत राहील. त्यामुळे लाळेचे प्रमाण पोटफुगी कमी होण्यास मदत होईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोवळया, ज्वारी, बाजरी व वाटाणा, मक्याची हिरवी घाटे यासारख्या वनस्पती, उसाची मळी, चोथा जास्त प्रमाणात देवू नये. अन्यथा अधिकच त्रास होतो. (संबंधित माहिती पशूवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील डॉ.गिरीश यादव यांच्या लेखातील आहे. पशूपालकांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसारच उपचार करावेत.)
संबंधित बातम्या :
आता पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काय आहे रणनीती?
Carrot : कवलापूरच्या गाजराची चवच न्यारी, काय आहे गावच्या पाण्याचा गुणधर्म, वाचा सविस्तर
काळाच्या ओघात शेती व्यवसयाचे बदलते स्वरुप, हवामान तज्ञांचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला