कोल्हापूरातही ‘लातूर पॅटर्न’, ‘केडीसी’ देणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी पीककर्ज

गतआठवड्यातच लातूर (Latur) जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्यावतीने घोषणा करण्यात आली होती की, शेतकऱ्यांना (Farmer) आतापर्यंत केवळ तीन लाखापर्यंतच बिनव्याजी कर्ज दिले जात होते. पण यापुढे शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोल्हापूर (Kolhapur DCC) जिल्हा मध्यवर्ती बॅंकेनेही सर्वसाधारण सभेच अशाच प्रकारे निर्णय घेतला आहे.

कोल्हापूरातही 'लातूर पॅटर्न', 'केडीसी' देणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी पीककर्ज
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 12:13 PM

कोल्हापूर : गतआठवड्यातच लातूर (Latur) जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्यावतीने घोषणा करण्यात आली होती की, शेतकऱ्यांना (Farmer) आतापर्यंत केवळ तीन लाखापर्यंतच बिनव्याजी कर्ज दिले जात होते. पण यापुढे शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोल्हापूर (Kolhapur DCC) जिल्हा मध्यवर्ती बॅंकेनेही सर्वसाधारण सभेच अशाच प्रकारे निर्णय घेतला आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री यांनी या निर्णयाची घोषणा केली. लातूर नंतर कोल्हापूर येथील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने घेतला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील व्यवहार कशा पध्दतीने सुरळीत सुरु आहेत ते लातूर आणि कोल्हापूर बॅंकेच्या कारभारावरुन लक्षात येत आहे. शेतकऱ्यांना अधिकच्या पीक कर्जाचा उपयोग होणार आहे. यापुर्वी केवळ तीन लाख रुपये कर्ज हे शेतकऱ्यांना दिले जात होते. मात्र, शेतकऱ्यांना नवनविन उपक्रम शेतामध्ये राबवता यावेत..शिवाय याकरिता आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून अशाप्रकारे निर्णय घेण्यात आल्याचे बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

कोल्हापूर जिल्हा बॅंकेला गतवर्षी 1372 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. ते पूर्ण करून जिल्ह्यात एकूण 3298 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते यामध्ये 72 टक्के वाटा हा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा असल्याचेही ऑनलाईन घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत सांगितले.

सरकारचा उद्देश बाजूलाच, शेतकरी मात्र मदतीपासून दूर

खरिप हंगामातील कामासाठी शेतकऱ्यांना पैसे मिळावेत, ज्यामधून मशागत, परेणी आणि काढणीचे कामे साईस्कर होतील. त्याअनुशंगाने पीक कर्जाचे वाटप केले जाते. विभागानुसार याचे उद्दीष्टही ठरवून देण्यात आले आहे. मात्र, पुणे विभाग वगळता इतर विभाग हे उद्दीष्टापासून कोसो दूर आहेत. यामुळे ना सरकारचा उद्देश साध्य होतोय ना शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होतेय. मात्र, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या बॅंकांनी उद्दीष्ट तर पूर्ण केलेच आहे शिवाय अधिकच्या रकमेचे पीककर्जही दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.

जिल्हा बॅंकेकडून 100 टक्के कर्जाचे वाटप

राष्ट्रीयकृत बॅंकाकडून कर्ज वाटपास दिरंगाई केली जात आहे. पण गावस्तरावर ज्या बॅंकेच्या शाखा आहेत त्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना कर्ज वाटपाचे टार्गेट हे पूर्ण केले आहे. जिल्हा बॅंकेने 23 लाख शेतकऱ्यांना 13 हजार 649 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांनी केवळ 8 लाख 83 हजार शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप केलेले आहे.

5 लाखापर्यंत कर्ज देणारी दुसरी जिल्हा बॅंक

आता पर्यंत जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज हे दिले जात होते. मात्र, यामधून योग्य तो फायदे शेतकऱ्यांना घेता येत नाही. अधिकची रक्कम अदा केल्याने शेतकऱ्यालाही उलाढाल करण्यास सोईस्कर होणार असल्याने हे निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव पीक कर्जाबरोबरच जिल्ह्याभरात असलेल्या शाखांच्या ठिकाणी वेगवेगळ्या सोई-सुविधा देण्याची निर्धार या सर्वसाधारण सभेत संचालकांनी व्यक्त केला आहे. गतआठवड्यात लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने 5 लाखापर्यंत पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला तर सोमवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने असा निर्णय घेतला आहे. (Kolhapur Bank also decides to provide crop loan up to Rs 5 lakh after Latur)

संबंधित बातम्या :

…अखेर त्या 44 साखर कारखान्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांनो आता ‘ही’ यादी पाहूनच ऊस घाला

‘जलयुक्त’ चे पाणी कुठे मुरले ? ‘एसीबी’कडून खुल्या चौकशीला सुरवात

सहा दिवसांमध्ये 6 लाख हेक्टराने वाढले नुकसानीचे क्षेत्र, पावसाचा कहर सुरुच

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.