AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special News : बीडच्या जाधव बंधूची ‘फिनिक्स भरारी’, आता थेट ‘कृषिभूषण’ पुरस्काराची मोहर

शेती व्यवसायात एक वेळ जरी अपयश आले तरी चक्क व्यवसायाला राम-राम ठोकणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. शेती व्यवसायात उरलंय काय असा सवाल उपस्थित करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बातमी आहे. शेती असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी ही बातमी आहे. आता तुम्हाला वाटेल यामध्ये एवढे असे काय आहे? पण बीड तालुक्यातील उदंडवडगावच्या जाधव बंधूचा शेती व्यवसायातील प्रवास असा असाच थक्क करणारा आहे. केवळ परस्थितीने शेती करण्याची वेळ दत्ता जाधव व त्यांचे बंधू शंकर यांच्यावर आली होती. पण हे लादलेले ओझे नाही तर आईच्या कष्टाचे चीज करण्याची संधी त्यांनी यामध्ये शोधली.

Special News : बीडच्या जाधव बंधूची 'फिनिक्स भरारी', आता थेट 'कृषिभूषण' पुरस्काराची मोहर
शेती व्यवसायातील योगदान पाहून बीड तालुक्यातील दत्ता जाधव यांना कृषिभूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 1:49 PM

बीड : शेती व्यवसायात एक वेळ जरी अपयश आले तरी चक्क व्यवसायाला राम-राम ठोकणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. शेती व्यवसायात उरलंय काय असा सवाल उपस्थित करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बातमी आहे. शेती असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी ही बातमी आहे. आता तुम्हाला वाटेल यामध्ये एवढे असे काय आहे? पण (Beed Farmer) बीड तालुक्यातील उदंडवडगावच्या जाधव बंधूचा शेती (Agricultural) व्यवसायातील प्रवास असा असाच थक्क करणारा आहे. केवळ परस्थितीने शेती करण्याची वेळ दत्ता जाधव व त्यांचे बंधू शंकर यांच्यावर आली होती. पण हे लादलेले ओझे नाही तर आईच्या कष्टाचे चीज करण्याची संधी त्यांनी यामध्ये शोधली. दत्ता जाधव हे 10 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र, आईचे स्वप्न आणि काळ्या मातीशी इमान जोपासण्यासाठी 1 गुंठे (Vegetable) भाजीपाल्यापासून सुरु केलेला प्रवास आज 25 एकरावरील बागायती क्षेत्रापर्यंत येऊन ठेपला आहे. हा प्रवास यापुढेही सुरुच राहणार आहे. शिवाय दत्ता जाधव यांना कृषिभूषण पुरस्कार मिळणार असल्याने त्यांच्या मेहनतीला अधिक बळ मिळणार आहे. दरम्यानच्या काळात निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वकाही उध्वस्त झाले असताना त्यांनी घेतलेल्या फिनिक्स भरारीची ही कहाणी.

1 गुंठ्यापासून झाली होती सुरवात

उदंडवडगाव बीड शहरापासून 25 ते 30 किमी अंतरावरील गाव. या डोंगराळ भागात ना शाश्वत पाण्याची सोय ना कुणाचे शेती संबंधी मार्गदर्शन. मात्र, वडिलांच्या निधनानंतर आईने घेतलेले कष्टच आपल्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन ठरल्याचे सांगत दत्ता जाधव यांनी शेती व्यवसायाला सुरवात केली होती. अधिकचे क्षेत्र असून उपयोग नाही तर असलेल्या क्षेत्रातून अधिकचे उत्पादन कसे मिळवायचे यावरच त्यांनी भर दिला. म्हणून 30 एकर क्षेत्र असतानाही त्यांनी केवळ 1 गुंठ्यामध्ये भाजीपाल्याची लागवड केली होती. गेल्या 19 वर्षात दत्ता जाधव आणि शंकर जाधव काळ्या आईची सेवा करताना एवढे एकरुप झाले आहेत की त्याची दखल शासनालाही घ्यावी लागली आहे. 2 मे रोजी त्यांना कृषिभूषण हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

एका रात्रीत सर्वकाही उध्वस्त, अन् उभारीही

शेती व्यवसायात दरवर्षी उत्पादनात वाढ होईलच असे नाही. पण ज्या वर्षी जाधव बंधू यांनी सर्वस्व पणाला लावून सन 2016 साली मिरची उत्पादनासाठी शेडनेट उभारले होते. त्याच वर्षी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात 1 एकरातील शेडनेट उध्वस्त झाले होते. या वादळाने शेडनेट बरोबर जणूकाही जाधव यांचे स्वप्नही हिसकावून नेले असेच चित्र झाले होते. यामध्ये लाखोंचे नुकसान झालेच पण उभ्या मिरची पिकाचे काय होणार असा सवालही त्यांच्या मनात घोळत होता. पण त्यांची मेहनत आणि जिद्द याच दरम्यान कामी आली. शेडनेटचे नुकसान झाले तरी मिरचीचा असा ठसका उठला की यामधून त्यांना 10 लाखाचे उत्पन्न मिळाले. आणि येथून पुढे त्यांच्या यशोगाथेला सुरवात झाली. गेल्या 6 वर्षात त्यांनी मागे वळून पाहिलेलेच नाही.

कृषी विभागाचे लाभले सहकार्य

केवळ योजनांचा लाभ घ्यायचा म्हणूनच कृषी कार्यालयाचे उंबरटे जिझवायचे नाहीतर कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळते म्हणून दत्ता जाधव हे तास् – तास कृषी कार्यालयात बसून रहायचे. जाधव यांचे प्रयत्न आणि उत्पादनवाढी विषयी असलेली धडपड पाहून कृषी अधिकाऱ्यांनीही त्यांना मदत केली आहे. त्यामुळेच तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, पी.जी कुलकर्णी यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचे जाधव हे सांगत आहेत.

आख्खं कुटुंब राबतंय शिवारात

शेती हा एकट्याने आणि मजुरांच्या भरवश्यावर करणारा व्यवसाय राहिलेला नाही. त्यामुळे घरच्या सर्व सदस्याने मेहनत केली तरच उत्पादन पदरी पडते. त्यामुळे दत्ता जाधव त्यांचे बंधू शंकर जाधव त्यांच्या पत्नी आणि मुले आणि वयोवृध्द आईही दिवस उजाडताच शेतामध्ये हजर असतात. शेती व्यवसायात सामूहिक प्रयत्न हेच यशाचे गमक असल्याचे दत्ता जाधव यांनी tv9 मराठी बोलताना सांगितले.आता 2 मे रोजी वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दिला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Cotton Rate : संपूर्ण हंगामात कापसाला वाढीव दराची झळाळी, अंतिम टप्प्यात विक्रमी दर

Turmeric Crop: अवकाळीनंतरही हळदीला चढला ‘पिवळा’ रंग, प्रतिकूल परस्थितीमध्ये उत्पादन वाढले दराचे काय?

Chickpea Crop : हमीभाव केंद्रावर हरभरा विक्रीचा मार्ग मोकळा, पणन मंडळाने ‘असा’ कोणता निर्णय घेतला?

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.