कामगार आयुक्तांचा नवा निर्णय, वाहतूकदारांकडून स्वागत- शेतकऱ्यांवर मात्र आर्थिक भार, वाचा सविस्तर

आतापर्यंत वाहनात शेतीमाल भरला की, थेट विक्री झाल्यावर पट्टी आणायलाच जायचे ही भूमिका शेतकऱ्यांची होती. मात्र, यामध्ये आता बदल झाला आहे. कामगार आयुक्तांच्या एका निर्णयामुळे माल वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक झळ बसणार आहे. कारण आता ज्याचा माल त्यानेच हमाली देणे बंधनकारक झाले आहे.

कामगार आयुक्तांचा नवा निर्णय, वाहतूकदारांकडून स्वागत- शेतकऱ्यांवर मात्र आर्थिक भार, वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 11:02 AM

नाशिक : आतापर्यंत वाहनात शेतीमाल भरला की, थेट विक्री झाल्यावर पट्टी आणायलाच जायचे ही भूमिका शेतकऱ्यांची होती. मात्र, यामध्ये आता बदल झाला आहे. (Labour Commissione) कामगार आयुक्तांच्या एका निर्णयामुळे ( Transportation of agricultural produce) माल वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक झळ बसणार आहे. कारण आता ज्याचा माल त्यानेच हमाली देणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे हमाली, वराई आणि भराई ही वाहतूकदारांना द्यावयाची गरज नाही. त्यामुळे शेतकरी किंवा आडते यांच्यावरच हा भार येणार आहे.

काशामुळे झाला हा निर्णय?

गेल्या अनेक दिवसांपासून ज्याचा माल त्यानेच वाहतूक करण्याची मागणी कामगार वाहतूक संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. याविषयी कामगार आयुक्तांना निवेदनही देण्यात आले होते. शिवाय याची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबई येथील आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा राज्यभरातील कामगार संघटनांनी दिला होता. मात्र, ही वेळ येण्याअगोदरच कामगार आयुक्त यांनी सर्व पदाधिकारी यांची भेट घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मास वाहतूक करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

अशी होणार अंमलबजावणी..

कामगार आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी याकरिता हे परिपत्रक 14 जानेवारी पर्यंत कामगार आयुक्त कार्यालय येथे पाठवावे लागणार आहे. त्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. शिवाय ज्याचा माल त्यानेच हमाली अदा करायची हा निर्णय झाला असून राज्य शासनाच्या 2016 च्या परिपत्राकाची आता अंमलबजावणी करण्याची गरजच राहणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्येच हा बदल दिसणार आहे.

कशी असते हमाली?

मालाची वराई आणि भराई या दोन पध्दती असतात. यामध्ये वाहनातील माल काढायचा तर दुसरी शेतीमाल वाहनात भरायचा. आतापर्यंत जो मालाची भराई किंवा वराई करण्यासाठी गेला असेल त्यालाच हमाली अदा करावी लागत होती. पण आता यामध्ये बदल होणार आहे. हमाली देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर किंवा व्यापाऱ्यांवर येऊन ठेपणार आहे. वराईकरिता हमाली ही 60 रुपये टन अशी आहे. त्यामुळे आता ही रक्कम शेतकरी किंवा व्यापारी यांनाच द्यावी लागणार आहे. यामधून वाहतूकदारांची मात्र सुटका झाली आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून सुरु झालेला लढा आता मालमत्ता जप्तीपर्यंत, मराठवाड्यातील 20 कारखान्यांची काय आहे कहाणी?

अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी जमिनीची सुपिकता आहे महत्वाची, अशी घ्या शेतजमिनीचे काळजी

Summer Season: उन्हाळी हंगामाचे बदलते चित्र ‘हे’ आहे मुग लागवडीचे योग्य तंत्र

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.