शेती सांभाळत सेंद्रिय खत निर्मितीतून लाखोंची कमाई, कोल्हापूरच्या शेतकरी महिलेची प्रेरणादायी कहाणी…

शेती व्यवसाय हा काही बांधावरुन करण्याचा विषय राहिलेला नाही. कष्टाला योग्य नियोजनाची दिली तर एक महिला शेतकरी काय करुन दाखवू शकते हे कोल्हापूरातील विजया माळी यांची 12 तपश्चार्या पाहिल्यावर लक्षात येते. त्यांनी केवळ शेतीच जोपासली नाही तर त्याला गांडूळ खत निर्मितीची जोड देत वर्षाकाठी लाखो रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

शेती सांभाळत सेंद्रिय खत निर्मितीतून लाखोंची कमाई, कोल्हापूरच्या शेतकरी महिलेची प्रेरणादायी कहाणी...
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 8:00 AM

कोल्हापूर : शेती व्यवसाय हा काही बांधावरुन करण्याचा विषय राहिलेला नाही. कष्टाला योग्य नियोजनाची दिली तर एक (women farmers) महिला शेतकरी काय करुन दाखवू शकते हे (Kolhapur) कोल्हापूरातील विजया माळी यांच्या 12 वर्षातील परिश्रमाकडे पाहिल्यावर लक्षात येते. त्यांनी केवळ शेतीच जोपासली नाही तर त्याला (Organic farming) गांडूळ खत निर्मितीची जोड देत वर्षाकाठी लाखो रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. एखाद्या तरुण शेतकऱ्यालाही लाजवेल असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. काळाच्या ओघाच पुन्हा सेंद्रिय शेतीला महत्व येऊ लागले आहे. पण विजया माळी यांनी गांडूळ खताची जोड ही कायम ठेवलेली आहे. आता त्यालाच मागणी वाढत आहे. गांडूळ खताच्या खरेदीसाठी त्यांच्याकडे कायमस्वरुपी असे ग्राहकही आहेत.

कृषी विज्ञान केंद्राची मिळते मदत

कोल्हापूर जिल्ह्यातील विजया माळी यांच्याकडे केवळ अडीच एकर शेतजमिन आहे. याच कमी क्षेत्रावर त्या शेती तर करतातच पण सेंद्रिय खताचा वापर आणि गांडूळ खताची निर्मितीही करीत आहेत. डीडी किसन यांच्या अहवालानुसार विजया माळी यांनी खादी ग्रामउद्योग महामंडळाने जिल्हा परिषदेच्या मदतीने सेंद्रिय खत संस्कृती आणि त्याचा व्यापार सुरू केला आहे. कोल्हापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातून त्यांनी गांडूळ खत निर्मितीची वैज्ञानिक पद्धती विषयी माहिती घेतली आणि प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी केवळ स्वता:च्या शेतातच सेंद्रिय खताचा वापर केला. सेंद्रिय खताच्या वापरामुळे उत्पादन वाढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच या खताचे उत्पादन वाढविण्याचा निर्धार केला. उत्पादन वाढत गेले त्याच प्रमाणात मागणीही वाढली आहे. सर्वकीही सकारात्मक होत गेल्याने विजया माळी यांनी समर्थ अॅग्रो प्रॉडक्ट्स नावाची स्वत:चीच कंपनी सुरु केली आहे.

बेराजगारांच्या हाताला कामही

शेतामधील वाढते उत्पादन आणि गांडूळ खताची वाढती मागणी यामुळे माळी यांना त्यांच्या व्यवसयाचे स्वरुप वाढवण्याची गरज भासू लागली. समर्थ अॅग्रो प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून केवळ कोल्हापूर जिल्ह्यातूनच नाही तर इतर जिल्ह्यातूनही खताची मागणी होऊ लागली. त्यामुळे गावातीलच महिलांच्या हाताला काम देण्याचे ठरवले. यामुळे खत निर्मितीत वाढ तर झालीच शिवाय ज्या महिला त्यांच्याकडे कामासाठी येत होत्या त्यांनी देखील सेंद्रिय खताचाच वापर करण्यास सुरवात केली आहे. विजया माळी यांनी सुरु केलेल्या छोट्याखानी व्यवसायाला आता चळवळीचे स्वरुप मिळाले आहे. केवळ दीड एकरावरील शेती करणाऱ्या माळी बाई आता उद्योजकही झाल्या आहेत.

कंपोस्ट खताला परराज्यातूनही मागणी

विजया माळी यांच्या अॅग्रो प्रॉडक्ट्समधून दरवर्षी 35 ते 40 टन गांडूळ खत उत्पादित होत आहे. या खताला 12 रुपये किलोचा दर मिळत आहे. या खतातून त्या वर्षाकाठी 5 लाख रुपये कमावत आहेत. त्यांच्या वर्मी कंपोस्टला महाराष्ट्र तसेच कर्नाटकसह गोव्यातही मागणी आहे. माळी यांच्या शेतात 6 महिला शेतकऱ्यांना कायम रोजगार मिळालेला आहे. विजया माळी यांच्याशी गावातील सर्व शेतकरी हे जोडले गेले आहेत. याचा फायदा असा झाला आहे की, गावातील प्रत्येक शेतकऱ्याचे उत्पन्न हे वाढत आहे. येथे काम करणाऱ्या महिला तसेच खेड्यातील व परिसरातील महिला शेतकरी आपले कर्तृत्व उदाहरण म्हणून घेऊन वेळोवेळी शेताला भेट देऊन बारकावे समजून घेऊन असेच काही करण्याचा विचार करीत आहेत. एका शेतकरी महिलेने सुरु केलेल्या कार्याचा आवाखा वाढत आहे. त्याचाच फायदा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना होत आहे.

संबंधित बातम्या :

…म्हणून केळींच्या बागांवर कुऱ्हाड, बागायतदार शेतकरीही दुहेरी संकटात

आता तुरीच्या विम्याचा प्रश्न ऐरणीवर, विमा कंपन्यांची टाळाटाळ, प्रशासनाचा मात्र पाठपुरावा

ऊसाच्या पाचटाचे करायचे काय? जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी कृषितज्ञांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...