कोरोनाविरुद्धच्या लढ्यात इफको मैदानात, रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन पुरवठ्याचा निर्णय
इफको कंपनी गुजरातमधील प्लांटमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणार आहे. Iffco started oxygen plant

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी खत उत्पादक आणि पुरवठा करणारी इफको कंपनी कोरोना संकटाविरुद्धच्या लढ्यात उतरली आहे. भारतात कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. देशभरात ठिकठिकाणी ऑक्सिसजनची कमतरता जाणवतं आहे. या समस्येवर मात करण्यासाठी इफको कंपनी गुजरातमधील प्लांटमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणार आहे. इफकोचे डॉ.यू.एस. अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Largest Fertilizer Producer Iffco started oxygen plant)
इफको ऑक्सिजन निर्मिती कुठं करणार?
अवस्थी यांनी केलेल्या ट्विटमध्ये इफको गुजरातमधील काटोल येथील प्लांटमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याचं सांगितलं. इफको 200 क्युबिक मीटर प्रतितास इतक्या क्षमतेनं ऑक्सिजन निर्मिती करणार आहे. रुग्णालयांना ऑक्सिजन मोफत देण्यात येईल, असं अवस्थी यांनी सांगितलं.
मंत्री सदानंद गौडा यांचं ट्विट
Kudos to @IFFCO_PR for dedicating their four plants for production of medical oxygen. I request other urea units to kindly follow the suit wherever possible. Government is taking all measures to ramp up production and availability of medical oxygen. pic.twitter.com/ArrYSebo2p
— Sadananda Gowda (@DVSadanandGowda) April 19, 2021
आणखी तीन प्लांट सुरु करणार
इफकोच्या काटोल येथील प्लांटमधून मेडिकल ग्रेडचा ऑक्सिजन तयार केला जाणार आहे. काटोल येथे 700 D टाईप सिलेंडर्स भरले जातील. तर मागणी वाढल्यास 300 मध्यम बी साईजचे सिलेंडर भरले जातील. तर, रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. इफको ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी आणखी तीन ऑक्सिजन प्लांट सुरु कऱणार आहे.
तीन प्लांट कुठं सुरु होणार?
केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी इफकोच्या फूलपूर, परादीप आणि अओनिया येथील प्लांटमध्ये ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे.
भारतात इफकोचे पाच प्लांट
इफकोकडे भारतामध्ये 5 उर्वरक संयंत्र आहेत. खतनिर्मिती क्षेत्रात इफको देशातील सर्वात मोठी संस्था आहे. इफकोने सामान्य विमा, ग्रामीण दूरसंचार, कृषी रसायन, खाद्यप्रक्रिया और जैविक शेती क्षेत्रात गुंतवणूक करुन नफा वाढवला आहे. गेल्या 54 वर्षांमध्ये इफको भारतीय शेतकऱ्यांना जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा वापर करत उच्च प्रतीचं खत पुरवठा करण्याचा प्रयत्न केलाय. इफको भारतात उत्पादित होणाऱ्या फॉस्फेटिकमध्ये 32.1 टक्के, यट्रोजन उर्वरक निर्मितीत 21.3 टक्के योगदान देते. फॉर्चून 500 भारत कंपन्यांच्या यादीमध्ये इफको 57 व्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांसाठी खुशखबर!, डीएपीच्या किमती जैसे थे, ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय
FACT CHECK | खरच डीएपीच्या किंमती 300 रुपयांनी वाढवल्या? इफकोनं काय केला दावा?