कांद्यासाठी प्रसिद्ध लासलगांव बाजार समिती डाळिंब लिलावाला सुरुवात, शुभारंभाच्या क्रेटला 5200 चा दर

लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज डाळिंब लिलावाचा शुभारंभ सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 600 क्रेट्स मध्ये डाळींब लिलावसाठी दाखल झाले होते. Lasalgaon APMC Pomegranate auction

कांद्यासाठी प्रसिद्ध लासलगांव बाजार समिती डाळिंब लिलावाला सुरुवात, शुभारंभाच्या क्रेटला 5200 चा दर
लासलगांव बाजार समितीत डाळिंबाचे लिलाव सुरु
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 2:10 PM

नाशिक: कांदा म्हटले की तोंडात नाव येते ते चटकन लासलगांवचे… लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज डाळिंब लिलावाचा शुभारंभ सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 600 क्रेट्स मध्ये डाळींब लिलावसाठी दाखल झाले होते. यातील एका 20 किलो क्रेट्समधील डाळिंबाचा शुभारंभांचा लिलाव करण्यात आला त्याला 5,200 रुपये इतका कमाल बाजार भाव लिलावात मिळाला. उर्वरित डाळिंब क्रेट्सला 2000 ते 1800 रुपये इतका सर्वसाधारण बाजारभाव मिळाला. (Lasalgaon APMC Pomegranate auction stars from today farmers happy for this move)

नाशिकमध्ये डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर लागवड

लासलगांवसह परीसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगांव, सिन्नर, कोपरगांव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यातील गावांमध्ये शेतक-यांनी डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. या परिसरातील शेतक-यांना डाळींब विक्रीसाठी जवळ सोय निर्माण व्हावी म्हणून लासलगांव बाजार समितीने सन 2014 पासुन डाळींब लिलाव सुरू केले आहेत. शेतकरी व व्यापारी वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येथून दररोज देशातर्गत दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहारसह इतर राज्यात मोठ्या प्रमाणत डाळिंब जात आहेत. याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होत असून त्यामुळे चालू हंगामातील डाळिंब लिलाव जून महिन्यापासून सुरु करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या डाळींबाची प्रतवारी करून विक्रीसाठी आणल्यास योग्य बाजार भाव मिळेल, असे बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितंलं.

शेतकऱ्यांमध्ये समाधान

लासलगांव बाजार समितीने कांद्या बरोबर आता आम्हाला डाळिंब विक्रीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. यामुळे लांब जाऊन डाळिंब विक्री करण्याची गरज आम्हाला राहणार नाही. यामुळे वाहतूक खर्चही वाचणार आहे, या बाजार समिती विक्रीसाठी आणलेल्या कांद्या बरोबर आता डाळिंबाला ही चांगला बाजारभाव मिळत आहे. आज माझ्या डाळिंबाला 5200 रुपये इतका शुभारंभ बाजार भाव मिळाला, असं गोरख बुल्हे डाळिंब उत्पादक शेतकरी यांनी सांगितलं आहे.

महिलांना लिलावात सहभागाची संधी

आशियातील कांद्याची अग्रेसर बाजार समितीमध्ये कृषी साधना महिला शेतकरी संस्थेवरुन व्यापाऱ्यांनी कादा लिलालावत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. टीव्ही 9 मराठीनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांची भूमिका बदलली. अखेर विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्थेला लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलावात सहभागी होण्यासाठी व्यापाऱ्यांनी बैठकीत नाफेडच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सहमती दर्शवली होती

संबंधित बातम्या:

TV9 Marathi Impact: लासलगावात स्त्री शक्तीचा विजय, कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांची सहमती

Onion Price Today: शेतकऱ्यांच्या मागणीला यश, आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजार समिती सुरु

(Lasalgaon APMC Pomegranate auction stars from today farmers happy for this move)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.