जे तीन वर्षात घडंल नाही ते यंदाच्या खरीपात लातूर विभागात पाहायला मिळालं…!

पावसाच्या नुकसानीच्या खुना आता कुठे प्रकर्षाने जाणवू लागलेल्या आहेत. आतापर्यंत केवळ नुकसानीचे अंदाज बांधले जात होते. कृषी विभाग किंवा विमा कंपन्यांकडून यामध्ये मदतीच्या अनुशंगाने कमी-अधिक प्रमाण झालेही असेल मात्र, लातूर विभागातील सोयाबीनच्या उत्पादनातील आणेवारीत कमालीची घट आलेली आहे.

जे तीन वर्षात घडंल नाही ते यंदाच्या खरीपात लातूर विभागात पाहायला मिळालं...!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 11:36 AM

राजेंद्र खराडे लातूर : पावसाच्या नुकसानीचे चित्र आता कुठे प्रकर्षाने जाणवू लागलेल्या आहेत. (Kharif Season) आतापर्यंत केवळ नुकसानीचे अंदाज बांधले जात होते. कृषी विभाग किंवा विमा कंपन्यांकडून यामध्ये मदतीच्या अनुशंगाने कमी-अधिक प्रमाण झालेही असेल (Latur Division) मात्र, लातूर विभागातील सोयाबीनच्या उत्पादनातील आणेवारीत कमालीची घट आलेली आहे. याबाबतचे प्रथम नजर (Agriculture department’s calculation) अंदाजपत्र कृषी उपसंचालकाच्या कार्यालयाने तयार केले असून गेल्या तीन वर्षात सर्वात कमी उत्पादकता यंदा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाचा सर्वाधिक फटका देखील लातूर विभागातील उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, आणि लातूर जिल्ह्याला बसलेला आहे.

उत्पादनाच्या दृष्टीने मराठवाड्यात खरीप हंगाम आणि खरीपातील सोयाबीनवरच शेतकऱ्यांची मदार असते. त्यामुळे दरवर्षी सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात वाढ होत आहे तर कापसाचे क्षेत्र हे घटत आहे. यंदा तर राज्यात तब्बल 52 लाख हेक्टरावर सोयाबीनचा पेरा झाला होता. मात्र, पावसाने सर्वाधिक नुकसान हे सोयाबीन पिकाचे केले आहे. पीक ऐन बहरात असतानाच मराठवाड्यात अतिवृष्टी झाली होती. यासंदर्भात आता कृषी विभाग उत्पादकतेचे अंदाजपत्र बांधत आहेत. त्यादरम्यान, गेल्या तीन वर्षात जेवढे कमी उत्पादन झाले नाही त्याहून कमी यंदा सोयाबीनचे उत्पादन झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये झाली होती अतिवृष्टी

लातूर विभागात लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. शिवाय नांदेडचा काही भाग वगळता खरीपात सोयाबीन या पिकाचीच मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदाही सोयाबीनचे क्षेत्र वाढले होते. मात्र, सोयाबीनला शेंगा भरण्याच्यापूर्वी पावसाने थैमान घातले आणि होत्याचे नव्हते झाले होते. यामध्ये सर्वाधिक फटका हा सोयाबीन पीकाला बसला होता. उत्पादकतेचा अंदाज कृषी विभागाने बांधलेला असून सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये कमालीची घट झाल्याचे सांगण्यात आले आहे.

35 लाख शेतकऱ्यांनी भरला होता विमा

लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यातील तब्बल 35 लाख शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम कंपन्यांना अदा केली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ही मिळणार आहे. शिवाय 20 लाख हेक्टरावरील पिकांच्या अनुशंगाने या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिकाविमा योजनेत सहभाग नोंदवला होता. आतात खरीपातील पीकांची काढणी मळणी झाली असून शेतकरी आता रब्बीच्या तयारीला लागलेला आहे.

15 लाख हेक्टरावर रब्बीची पेरणी

खरीपात झालेले नुकसान रब्बीतून भरुन काढण्यासाठी पुन्हा शेतकपी जोमाने कामाला लागलेला आहे. यंदाच्या हंगामात हरभरा या पिकाला पोषक वातावरण मानले जात आहे. रब्बी हंगामात या विभागातील सुमारे 15 लाख 50 हजार हेक्टरावर पेरा होईल असा अंदाज बांधण्यात आलेला आहे. शिवाय उस्मानाबाद, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये पेरणीला सुरवातही झाली आहे. (Latur division suffers highest soyabean crop loss in three years this year)

संबंधित बातम्या :

हे ही माहिती असू द्या 7/12 उताऱ्यावर वारसाची नोंद करतात कशी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 10 दिवसांसाठी बंद मात्र, ‘या’ बाजार समित्यांचे व्यवहार सुरुच

उलटी गणती सुरु…! आवक घटूनही कांद्याचे दर कोसळलेच

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.