यशोगाथा : खडकावर बहरलीय सिताफळीची बाग अन् उत्पन्न मिळतंय लाखात

हताश न होता त्यांनी भौगोलिक स्थितीचा अभ्यास करुन सिताफळ लागवडीवर भर दिला. निसर्गाला पुरक असलेल्याच फळाची लागवड करण्याचे ठरवले आणि आज लाखोंमध्ये उत्पादन मिळत आहे.

यशोगाथा : खडकावर बहरलीय सिताफळीची बाग अन् उत्पन्न मिळतंय लाखात
लातूरच्या खडकाळ जमिनीवर सीताफळातून लाखोंचे उत्पादन
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 12:59 PM

लातूर : शेती व्यवसयात यशापेक्षा अपयश अधिक आहे. म्हणूनच एकदा नाद केलेला नवखा शेतकरी शेतीच्या बांधावरही जात नाही. पण लातूरातील एका शेतकऱ्याने हा समज दूर केलाय. प्रगतीशील (Damage to vineyards) द्राक्षबागायतदार असलेल्या शेतकऱ्याचे काही वर्षांपूर्वी युरोप खंडात पाठवलेल्या द्राक्षात पेस्टीसाईडचा तांत्रिक दोष दाखवून ते द्राक्ष समुद्रात फेकून दिले… त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले. यामध्ये त्यांना आपली बाग मोडावी लागली. मात्र, हताश न होता (Sitafal cultivation by studying geographical location) त्यांनी भौगोलिक स्थितीचा अभ्यास करुन सिताफळ लागवडीवर भर दिला. निसर्गाला पुरक असलेल्याच फळाची लागवड करण्याचे ठरवले आणि आज लाखोंमध्ये उत्पादन मिळत आहे.

लातूर जिल्ह्यतील जानवळ येथील बाळकृष्ण नामदेव येलाले यांचा शेती व्यवसयाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातून अनेकांना प्रेरणा मिळेल असा त्यांचा प्रवास आहे. केवळ व्यवसाय म्हणून शेतामधीलच ज्ञान पुरेसे नाही तर बाजारभाव आणि काळानुरुप होणाऱ्या बदलाचाही त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यामुळेच द्राक्षेची बाग मोडून सिताफळ लागवडीचा निर्णय घेतला होता.

म्हणून केली सिताफळाची निवड

” एन एम के गोल्डन ” या जातीच्या सिताफळाची 2011 ला लागवड केली… या जातीच्या सीताफळाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणात फळ धारण क्षमता आणि फळ तयार झालं तरी देठ सोडत नाही…फळ तोडल्यानंतर 4 थ्या दिवशी तयार होते. एक फळ 500 ते 700 ग्रॅम भरते…लागवडी नंतर फक्त चार वर्षात फळ लागायला सुरुवात होते. जानवळ हा डोंगरी भाग आहे… इथे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि तापमान अधिक हमखास असते. जानवळचा डोंगर जवळ आहे त्यामुळे रानटी जनावरं मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी करतात. सीताफळाच्या पानाचा उग्रवास असल्यामुळे कोणतेही रानटी जनावर ते खात नाही. अत्यल्प पाणी हवं असलेलं हे फळ आहे. याला जास्त पाणी झालेतर फळ कमी लागते. यावर्षी फूल धारण करतांना सुरुवातीला पाऊस कमी झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळं धरली गेली. आता झाड फळांनी लगडले आहेत. येत्या आठ दिवसात याची तोड सुरु होईल.

सीताफळ इतर पिकापेक्षा परवडते का?

2011 ला सात एकर क्षेत्रात लागवड केली त्यानंतर आता पर्यंत तीन ते चार सिझन मिळाले… सुरुवातीला तेजी होती म्हणून फार म्हणावा तसा भाव मिळाला नाही.त्यानंतर बाजारपेठेचा अभ्यास झाला दलाला शिवाय स्वतः मार्केटला जाऊ लागलो.. त्यामुळे देशभरातल्या मार्केटचा अभ्यास झाला. सिताफळाला एकरी दरवर्षी खर्च अधिकाधिक 50 हजार होतो. एकरी उत्पन्न 5 ते 10 टन होतं, कमीत कमी 25 रुपये किलोचा भाव मिळतो. मागच्या दोन वर्षात या सात एकर मध्ये 40 लाख रुपयाचे सिताफळ विकल्याचे बाळकृष्ण येलाले सांगतात.

सिताफळ मार्केट

हैद्राबाद, दिल्ली आणि नवी मुंबई ( वाशी ) हे देशातील मार्केट आहेत. यातील सर्वात मोठे मार्केट नवी मुंबई ( वाशी ) येथे आहे. अनेक पल्प तयार करणाऱ्या कंपन्या यातले सर्वात मोठे ग्राहक आहे. त्यामुळे चांगल्या जातीचे थोडे जास्त काळ राहणारे सिताफळ कोरडवाहू शेतीत बागायती शेतीचे उत्पन्न काढू शकतात तेही कमी खर्चात… बघा ज्याला रानटी जनावरं खाणार नाहीत पण माणसं आवडीने खातात ती शेती करा. एक फायद्याच्या शेतीचा उत्तम पर्याय आहे. (Latur farmer earns lakhs from sitafal cultivation without getting bogged down by failure)

युवराज पाटील

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 50 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर दारी, मात्र, नियम अटींचे करावे लागणार पालन

शेतकऱ्यांसमोर हाच पर्याय : खराब सोयाबीनची विक्री अन् चांगल्या मालाची साठवणूक

आंबिया बहरातील फळपिक विमा योजनेचा असा घ्या लाभ, फळबागायत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.