बाजारभाव : उडदाचे दर वधारले, सोयाबीनबाबत मात्र, चिंता कायम
सोमवारी खरीपातील उडदाने शेतकऱ्यांना दिलासा दिला तर सोयाबीन हे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकत आहे. कारण सोयाबीनची आवक केवळ 3000 क्विंटल होऊन देखील दर पोटलीत 5400 चा मिळाला आहे तर दुसरीतकडे 7200 वर असलेला उडीद सोमवारी 7400 वर गेला होता. उडदाचे दर वाढत आहेत. मात्र, खऱीपातील मुख्य पीक सोयाबीनच्या दरामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे.
लातूर : सलग दोन दिवस लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय चित्र राहणार याकडे शेतकऱ्यांचे तसेच व्यापाऱ्यांचेही लक्ष लागले होते. सोमवारी खरीपातील उडदाने शेतकऱ्यांना दिलासा दिला तर सोयाबीन हे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकत आहे. कारण सोयाबीनची आवक केवळ 3000 क्विंटल होऊन देखील दर पोटलीत 5400 चा मिळाला आहे तर दुसरीतकडे 7200 वर असलेला उडीद सोमवारी 7400 वर गेला होता. उडदाचे दर वाढत आहेत. मात्र, खऱीपातील मुख्य पीक सोयाबीनच्या दरामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे.
लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे रखडलेल्या सोयाबीन काढणी कामाला वेग आला आहे. वेळप्रसंगी चिखलात वाट काढत खरीपातील पिकांची काढणी कामे केली जात आहेत. मात्र, बाजारात सोयाबीनचे दर हे वाढत नसल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. 5800 रुपये क्विंटल असलेले सोयाबीन 5400 वर आले आहे.
शिवाय बाजारपेठेत आवक कमी असतानाही दर वाढत नाहीत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनची पूर्णपणे काढणी, मळणी होऊन आवक वाढली तर काय दर राहतील याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. लातूर बाजारपेठेत हंगामात दिवसाकाठी 30 ते 40 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असते. पण यंदा पावसामुळे काढणी कामे रखडलेली होती. आवक कमी झाली तर अधिकचा दर मिळणार हे बाजाराचे सुत्र असताना देखील सोयाबीनच्या दरात मात्र, घट होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
उडीद 7400 च्या वर, शेतकऱ्यांना दिलासा
खरीपातील उडीद हे देखील महत्वाचे पिक आहे. शिवाय यंदा तर आवक सुरु झाल्यापासून उडदाच्या दरात ही वाढ होत आहे. मात्र, पावसामुळे खराब झालेल्या मालाला दर्जानुसार दर मिळत आहे. लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील उडदाची काढणी कामे पावसापुर्वीच झाली होती. त्यामुळे चांगल्या प्रतिच्या उडदाला 7000 पर्यंतचा दर मिळालेला आहे. शिवाय उडदाच्या दरामध्ये अचानक घट झाली नसल्याने शेतकऱ्यांना याबद्दल चार पैसे मिळतील हा आशावाद आहे. काही भागात पावसामुळे उडदाचीही काढणी रखडलेली होती आता काढणी कामाला वेग आला आहे. मात्र, डागाळलेल्या मालाला त्याच्या दर्जाप्रमाणे दर मिळत आहे.
दोन दिवसांनंतर बाजारपेठ सुरु, तरीही आवक कमीच
महात्मा गांधी जयंती आणि रविवार यामुळे सलग दोन दिवस येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद होती. त्यामुळे शेती मालाची आवक मोठ्या प्रमाणात होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. सोमवारी सोयाबीनची आवक केवळ 3000 क्विंटल एवढी झाली होती. तर दर पोटलीत 5400 चा मिळाला होता. बाजारात पुढील आठवड्यापासून सोयाबनची आवक वाढेल असा अंदाज बालाजी जाधव यांनी व्यक्त केला आहे.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. सोमवारी लाल तूर- 6500 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6340 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6445 रुपये क्विंटल, जानकी चना 5050 रुपये क्विंटल, विजय चणा 5400, चना मिल 4950, सोयाबीन 6300, चमकी मूग 7116 , मिल मूग 6400 तर उडीदाचा दर 7390 एवढा राहिला होता. Latur market price: Rise in urad prices, fall in soyabean prices continue to raise concerns among farmers
संबंधित बातम्या :
फळलागवडी दरम्यानच डाळिंब उत्पादकांना फटका, पावसानंतर किडीचा प्रादुर्भाव
20 हजार कोटी रुपये अदा केले, मात्र 500 कोटींमुळे अर्धवट राहिली ‘महाविकास आघाडी’ची पीक कर्जमाफी
डिजिटल सातबारा उतारा काढायचा कसा? शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी..