आयटीची लठ्ठ पगाराची नोकरी सोडली, शेवग्याच्या पानांपासून हे दाम्पत्य कमावतात महिन्याला लाखो रुपये

शेवटी त्यांनी शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती करण्यास सुरुवात केली. हे पावडर मोरिंग्या पावडर म्हणून ओळखलं जातं. मधुमेहासाठी हे पावडर अत्यंत गुणकारी आणि रामबाण असल्याचं म्हंटलं जातं.

आयटीची लठ्ठ पगाराची नोकरी सोडली, शेवग्याच्या पानांपासून हे दाम्पत्य कमावतात महिन्याला लाखो रुपये
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 4:11 PM

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : 2018 साली पावडे दाम्पत्य नोकरी सोडून आपल्या गावी परतले. स्वतःच्या दहा एकर शेतीमध्ये कुठलंच पीक न घेता शेतात शेवग्याची लागवड केली. दोन ओळीत नऊ फूट अंतरावर शेवग्याची रोपे लावली. सुरुवातीला शेवग्याच्या शेंगांचा त्यांनी व्यवसाय सुरु केला होता. मात्र म्हणावं तस त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती करण्यास सुरुवात केली. हे पावडर मोरिंग्या पावडर म्हणून ओळखलं जातं. मधुमेहासाठी हे पावडर अत्यंत गुणकारी आणि रामबाण असल्याचं म्हंटलं जातं. एक हजार रुपये प्रती किलो दराने या पावडरची विक्री होते.

पावडे दाम्पत्यांना महिन्याकाठी दीड लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळून देणारा हा व्यवसाय मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे यशस्वीरित्या सांभाळत आहेत. या पावडरला पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठी मागणी आहे. डॉक्टर आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात पावडर खरेदी करीत असल्याची माहिती पावडे दाम्पत्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

शेवग्याच्या पानांपासून व्यवसाय

नांदेडच्या उच्च शिक्षित आणि आयटी इंजिनियर असलेल्या एका दाम्पत्याने लाखो रुपयांची नोकरी सोडली. शेवग्याच्या पाल्यापासून नवीन आणि वेगळा व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायातून हे दाम्पत्य महिन्याकाठी लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवत आहेत. मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे असं या दाम्पत्याचे नाव आहे.

hingoli 2 n

तीन लाख रुपयांचे पॅकेज सोडून आले गावात

नांदेड शहरालगत असलेल्या पावडेवाडी येथील रहिवासी मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे आयटी क्षेत्रातील इंजिनियर आहेत. पुणे आणि हैद्राबादसारख्या मेट्रो शहरात त्यांनी मागील काळात 15 वर्षे मोठ्या कंपनीत नोकरी केली. मंजुषा पावडे यांना महिन्याला 1 लाख 20 हजार तर त्यांचे पती गुलाब पावडे यांना जवळपास दोन लाख रुपये इतकं पॅकेज मिळायचे.

शेवग्याच्या पानांत विविध गुणधर्म

मात्र शेतीच्या माध्यमातून वेगळं काही व्यवसाय सुरु करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. हैदराबाद येथे वास्तव्यास असताना त्यांनी शेवग्याच्या शेतीची माहिती घेण्यास सुरुवात केली. शेवग्याच्या शेंगा आणि पाल्याचे काय गुणधर्म आहे. लागवड कशी करावी, त्यातून उत्पन्न किती मिळेल, याची संपूर्ण माहिती जाणून घेतली.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...