AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवा, लेमन ग्रासची शेती करा आणि पाच वर्ष कमवा

Lemon Grass एक औषधीय वनस्पती आहे. याचा वापर औषध, कॉस्मेटिक आणि डिटरजंटमध्ये केला जातो.

कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवा, लेमन ग्रासची शेती करा आणि पाच वर्ष कमवा
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 10:42 AM

मुंबई : जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवायचा असेल (Lemon Grass Cultivation), तर आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही व्यवसाय घेवून आलो आहोत. हे व्यवसाय सुरु करण्यात जास्त पैसे लागत नाही, पण नफा तुम्हाला पुढील पाच वर्षांपर्यंत मिळत राहील (Lemon Grass Cultivation).

आम्ही तुम्हाला आज लेमन ग्रासच्या शेतीबाबत सांगणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मन की बात कार्यक्रमात (Mann Ki Baat) लेमन ग्रासच्या शेतीचं कौतुक केलं आहे.

Lemon Grass एक औषधीय वनस्पती आहे. याचा वापर औषध, कॉस्मेटिक आणि डिटरजंटमध्ये केला जातो. लेमन ग्रासची शेती करुन तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

चार महिन्यात लेमन ग्रास तयार होते

लेमन ग्रास चार महिन्यांमध्ये तयार होते. लेमन ग्रासने तेल बनवलं जातं आणि बाजारात याला चांगला भावही मिळतो. बाजारात याची खूप मागणी आहे. लेमन ग्रासची शेती करताना नाही खताची गरज असते नाही जनावरं शेतीला नुकसान पोहोचवण्याची भीती असते. त्यामुळे ही शेती फायद्याची असते. एकदा लेमन ग्रास पेरलं की ते पाच ते सहा वर्षांपर्यंत चालतं.

याला पेरण्याचा योग्य काळ हा फेब्रुवारी ते जुलै दरम्यान असतो. एकदा पेरल्यानंतर सहा ते सात वेळा याची कापणी केली जाते. एका वर्षात तीन ते चारवेळा याची कापणी केली जाते. यातून तेल काढलं जातं. एका वर्षात एक एकरातून 3 ते 5 लीटर तेल निघतं. याच्या एक लिटर तेलाची किंमच 1000 ते 1500 रुपये आहे (Lemon Grass Cultivation).

लेमन ग्रास लावल्यानंतर 3 ते 5 महिन्यांनंतर याची पहिली कापणी केली जाते. लेमन ग्रास तयार झालं की नाही हे माहित करुन घेण्यासाठी त्याला तोडून त्याचा गंध घ्या, गंध घेतल्यानंतर लिंबाचा सुगंध आला तर समजा हे तयार झालं आहे. जमीनीपासून 5 ते 8 इंचाच्या वर याची कापणी करा. दुसऱ्या कापणीमध्ये प्रती कट्टा 1.5 लिटर ते 2 लिटर तेल निघतं. तीन वर्षांपर्यंत याची उत्पादन क्षमता वाढते.

कमाई किती होणार?

एक हेक्टरमध्ये लेमन ग्रासती शेती करण्यासाठी 30 हजार ते 40 हजार रुपये लागतात. एकदा पीक लावल्यानंतर वर्षभरात तीन ते चारवेळा कापणी केली जाऊ शकते. लेमन ग्रासच्या शेतीतून एका वर्षात तब्बल 1 लाख ते 1.50 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. यातून तुम्ही 70 हजार ते 1.20 लाख रुपयांपर्यंतचा नफा होऊ शकतो.

Lemon Grass Cultivation

संबंधित बातम्या :

पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार?

‘कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलेय’

Photos | पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 11 एकरात 26 हजार स्ट्रॉबेरीची लागवड

कोबीला एक रुपया किलो भावही नाही, हताश शेतकऱ्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.