Water Council : देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जल साक्षर पिढी घडवणे महत्वाचे, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मांडले केंद्राचे धोरण

काळाच्या ओघात वातावरणात अमूलाग्र बदल घडून येत आहे. या बदलाबरोबरच पाणी बचतीसाठी विशेष प्रय़त्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे जल संवर्धनासारख्या विषयांवर देशाची ही पिढी गांभीर्याने विचार करेल त्यावेळेस देशाचे भविष्य उज्ज्वल असेल.यासाठी केवळ नियोजनच नाही तर जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज आहे.

Water Council : देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जल साक्षर पिढी घडवणे महत्वाचे, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मांडले केंद्राचे धोरण
राष्ट्रीय जल परिषदेत जलसंवर्धानाचे महत्व सांगताना केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 3:45 PM

मुंबई : काळाच्या ओघात वातावरणात अमूलाग्र बदल घडून येत आहे. या बदलाबरोबरच (Water Save) पाणी बचतीसाठी विशेष प्रय़त्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे (water conservation) जल संवर्धनासारख्या विषयांवर देशाची ही पिढी गांभीर्याने विचार करेल त्यावेळेस देशाचे भविष्य उज्ज्वल असेल. यासाठी केवळ नियोजनच नाही तर (Water literate) जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी एकदिवसीय राष्ट्रीय जल परिषदेत केले आहे. 2024 सालापर्यंत प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोहोचविणार असा मानसही शेखावत यांनी व्यक्त केला.

जलव्यवस्थापनासाठी 4 घटक महत्वाचे

शासनाकडून जलव्यवस्थापन वा संवर्धनाच्या क्षेत्रात सुरु असणाऱ्या प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यासाठी चार घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यात राजकीय इच्छाशक्ती, सार्वजनिक स्वरुपातील निधी, सार्वजनिक कृतीशील धोरण आणि लोकसहभाग यांचा समावेश आहे. त्यामुळे जलव्यवस्थापनात अग्रक्रमी पोहोचण्यासाठी भविष्यात जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज आहे, हे सर्व जलसमृद्धीच्या माध्यमातून शक्य आहे. जलसमृद्धी ही केवळ लोक सहभागातून घडणार आहे, त्यामुळे पाण्याचे मूल्य सामान्यांनी ओळखले पाहिजे.देशात सर्वांत जास्त पाऊस हा 20-22 दिवसांत पडतो. त्यामुळे या पाण्याचे उत्पादन मूल्य घटते. परिणामी, जल जतन- संर्वधनासाठी खऱ्या अर्थाने रेन हार्वेस्टींगची अधिक गरज आहे. याविषयी, शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून सामान्यांचा या उपक्रमातील सहभागही वाढायला हवा.

जलसंवर्धन केले तरच शेतकरी उभा राहणार : अमरीश पटेल

जलसंवर्धनामध्ये ‘शिरपूर पॅटर्न’चे वेगळे महत्व आहे. गेल्या 15 वर्षापासून या भागात जलसंवर्धनाचे काम केले जात आहे. दरम्यानच्या काळात सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 42 चौरस फूटांत 320 छोटे- मोठे धरण तयार करुन 600 मिलीमीटर पाण्याचे संवर्धन केले आहे. येत्या पाच वर्षांत हे प्रमाण 900 मिलीमीटरवर नेण्याचा मानस आहे, या दिशेने प्रवास केल्यास दोन वर्षांत पाणी कपात झाली तरी चिंता नसेल असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. पिण्याचे पाणी वाचविणे महत्वाचे आहेच, मात्र त्याचबरोबर शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभ करण्यासाठी पाणी वाचविण्याची अधिक गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

‘वॉटर वॉरिअर’ पुस्तकाचे अनावरण

जलसंवर्धनासाठी ज्या सामाजिक संघटना, नागरिक तसेच समाजातील विविध घटक काम करीत आहेत. त्यांची अनेक उदाहणे घेऊन वॉटर वॉरिअर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.  आजचे जलसंवर्धन हे उद्या निर्माण होणाऱ्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी महत्वाचे राहणार असा या पुस्तकाचा एकंदरीत अर्थ आहे. या पुस्तकात देशभरातील बारा नव्या स्टार्टअपची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय जल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार अँड आशिष शेलार, फाऊंडेशनचे संस्थापक संचालक डॉ. विजय पागे,आमदार अमित साटम, स्थानिक नगरसेविका अलका केरकर, यूपीएल ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ राहुल बजोरिया आणि लेफ्टनंट जर्नल शैलेश तिनईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्राकडून 70 हजार कोटींची तरतूद, महाराष्ट्रासाठी 26 प्रकल्प

1970 सालापासून पाण्याविषयी मांडण्यात आलेले अनेक प्रकल्प हे केवळ कागदावरच होते, तर काही प्रकल्प बंद पडले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलसंपत्तीचे वैभव टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी या प्रकल्पांचा पुनःअभ्यास करुन यातील 106 प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केले, त्यातील 26 प्रकल्प-योजना महाराष्ट्रात आहेत. या संपूर्ण प्रकल्प योजनांसाठी केंद्र शासनाने 70 हजार कोटींची तरतूद केली असल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

Onion Rate : कांदा दराचा वांदा मिटणार! कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची काय आहे रणनिती?

Sugarcane Sludge : ऊस फडातच, गाळप बंद, सांगलीत साखर आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली

Nanded : पीक विम्याचा प्रश्न चिघळला, कृषिमंत्र्यांचे भाकीत अखेर खरे ठरले, नांदेडमध्ये असे काय घडले?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.