‘तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’, व्यापाऱ्यांचे पंतप्रधान मोदींनाच पत्र

येथील व्यापारी, प्रक्रिया उद्योजकांवर थेट साठा करण्याची मर्यादा ठरवून दिल्याने हा दुजाभाव का असा सवाल उपस्थित करीत गुजरातच्या खाद्यतेल, तेलबिया असोसिएशने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, तुमच्याकडून ही अपेक्षा नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान याचा पाढाच सांगितलेला आहे.

'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', व्यापाऱ्यांचे पंतप्रधान मोदींनाच पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 10:53 AM

मुंबई : खाद्यतेलाचे (edible oil ) दर मर्यादीत ठेवण्यासाठी केंद्र सरकार (Centrel Government) वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. पण तेलाच्या दराच तेजी ही कायम आहे. यातच खरीपातील तेलबिया बाजारात येताच व्यापारी, प्रक्रिया उद्योजक यांना साठा मर्यादा घालून देण्यात आली आहे. यामुळे तेलाचे दर घसरतील असा अंदाज बांधण्यात आला आहे. मात्र, या प्रक्रियेतून निर्यातदार आणि आयातदार यांना वगळण्यात आले आहे. या दोन्ही घटकांना केवळ निर्यात आणि आयात केलेल्या (oilseeds stock) तेलबियांची माहिती पोर्टलवर भरणे बंधनकारक केले आहे. तर येथील व्यापारी, प्रक्रिया उद्योजकांवर थेट साठा करण्याची मर्यादा ठरवून दिल्याने हा दुजाभाव का असा सवाल उपस्थित करीत गुजरातच्या खाद्यतेल, तेलबिया असोसिएशने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, तुमच्याकडून ही अपेक्षा नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान याचा पाढाच सांगितलेला आहे.

व्यापारी, प्रक्रिया उद्योजक हे तेलबियांचा साठा करतात. शेतकऱ्यांकडील शेतीमाल कमी किमतीमध्य खरेदी करायचा आणि दर मिळताच त्याची विक्री करायची हे या व्यापाऱ्यांचा उद्देश लक्षात घेता. त्यांच्यावर तेलबियांचा साठा करण्याबाबत मर्यादा घालण्यात आले आहे. शिवाय अतिरीक्त साठा केल्यास कारवाईच आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहे.

मात्र, दुसरीकडे आयातदार आणि निर्यातदार यांना साठा करण्याच्या नियमातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे देशातील व्यापारी, प्रक्रिया करणारे उद्योजक यांच्यावर परिणाम होणार असल्याने गुजरातच्या खाद्यतेल, तेलबिया असोसिएशनेचे अध्यक्ष समीर शहा यांनी पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय आहे पत्रात?

तेलबियांच्या साठ्याबाबतचा निर्णय केवळ देशातील लहान-मोठे व्यापारी, प्रक्रिया करणारे उद्योजक यांच्यासाठीच असणार आहे. निर्यातदार आणि आयातदार यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या निर्णयामुळे व्यापारी हे व्यवसयाच्या दृष्टीने 10 ते 15 वर्ष मागे खेचले जाणार आहे. या धोरणामुळे तेलबियांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या महत्वकांक्षेला सरकारच छेद घालत आहे. खाद्यतेलाच्या दराचा सामना करण्यासाठी ग्राहकांनीचे तेलाच वापर आवश्यकतेनुसार करणे गरजेचे असल्याचे पत्रात म्हणले आहे. तेलाचा वापर करुन पॅकींग केलेले पदार्थ वापरण्याचे प्रमाण कमी केले तरी सर्वसामान्य नागरिकांचे गणित कोलमोडणार नसल्याचेही या पत्रात शहा यांनी म्हणले आहे.

तेलबियांची बाजारात आवक

खरीप हंगामातील तेलबियांची आवक ही बाजारात सुरु आहे. मात्र, येथील व्यापाऱ्यांना ती मोठ्या प्रमाणात साठवणूक करता येत नाही. साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक नियामावली जारी केली असून यामध्ये व्यापाऱ्यांना मर्यादेपेक्षा तेलिबयांची खरेदी करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे तेलबियांच्या दरात मोठी घसरण होणार आहे. तर याचा फायदा हा निर्यातदार आणि आयातदार यांनाच होणार असल्याचे म्हणने हे येथील व्यापाऱ्यांचे आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतच खाद्यतेलाचे दर वाढले

खाद्यतेलाचे दर नियंत्रात रहावेत म्हणून जून-जुलैमध्ये केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातशुल्कामध्ये कपात केली होती तर आता तेलबियांच्या साठ्यात मर्यादा घालून दिलेल्या आहेत. मात्र, खाद्यतेलाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतच वाढलेले आहेत. त्यामुळे देशातही दर वाढलेलेच आहेत. तेलिबयांची आवक वाढूनही त्याची खरेदी ही येथील व्यापारी आणि प्रक्रीया करणारे उद्योजक यांना करता येत नसल्याने नुकसान तर होतच आहे पण शेतकऱ्यांच्या तेलबियांचेही दर कोसळतील असे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. (Limits on storage of oilseeds, trader’s direct letter to PM Modi)

संबंधित बातम्या :

कृषी विद्यापीठाकडील अतिरिक्त जमीन शेतकऱ्यांना परत करा: प्रहार जनशक्ती

पपईची लागवड करतानाच काळजी घ्या, अन्यथा बागच धोक्यात

यंदा रब्बी हंगाम लांबणीवर, योग्य नियोजन गरजेचे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.