Cotton Market: एवढंच राहिलं होत, एकीकडे उत्पादनात घट तर दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून लूट
शेतकऱ्यांच्या या पांढऱ्या सोन्यावरही व्यापाऱ्यांची कायम नजर राहिलेली आहे. वाढत्या दरामुळे होत असलेले नुकसान भरुन काढण्यासाठी अमरावती येथील व्यापारी हे चक्क मापात पाप करीत असल्याचे समोर आले आहे.
स्वप्नील उमप: अमरावती : (Kharif Season) खरीप हंगामातील केवळ कापूस पिकानेच शेतकऱ्यांना तारले आहे. गेल्या 50 वर्षातील विक्रमी दरही कापसालाच मिळालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोन्याप्रमाणे (Cotton Storage) कापसाची साठवणूक करुन जसा दर वाढेल त्याप्रमाणे विक्री केलेली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या पांढऱ्या सोन्यावरही व्यापाऱ्यांची कायम नजर राहिलेली आहे. वाढत्या दरामुळे होत असलेले नुकसान भरुन काढण्यासाठी अमरावती येथील व्यापारी हे चक्क मापात पाप करीत असल्याचे समोर आले आहे. (Cotton Rate) कापसात असलेल्या पाला चोळ्याच्या नावाखाली एक क्विंटल कापसामागे अर्धा किलो कापसाची “कटनी” सध्या अनेक कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या कापसावर लावली जात असल्याचा प्रकार अमरावतीत सर्रास सुरू आहे. त्यामुळे वाढीव दराचा पाहिजे तेवढा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. बाजारपेठेत योग्य मुल्यमापन होण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
यंदा प्रथमच विक्रमी दर
खरीप हंगामातील सोयाबीन, तूर आणि कापूस उत्पादनात निसर्गाच्या अवकृपेमुळे मोठी घट झाली होती. त्यामुळे मागणी वाढेल असा अंदाज अखेर खरा ठरला आणि यंदा कापसाला 11 हजार रुपये क्विंटल दर मिळाला होता. गेल्या 50 वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात कापसाला दर मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरातून शेतकऱ्यांना भरुन काढता आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे प्रकार आता नव्याने समोर येऊ लागले आहेत. किमान बाजारपेठेत तरी योग्य मुल्यमापन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उत्पादनात घट
उत्पादनात घट हेच कापूस दरवाढीचे मुख्य कारण आहे. यंदा मुळातच कापसाचे क्षेत्र घटले होते. यामध्येच बोंडअळी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती मागणी यामुळे हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाच्या दरात वाढ झाली ती आता 11 हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचलेली आहे. वाढीव दराच्या अपेक्षेमुळे शेतकऱ्यांनीही लागलीच विक्री न करता साठवणूक करुन टप्प्याटप्प्याने विक्री केल्याचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. यंदा खरिपातील सर्व पिकांचे नुकसान झाले असले दरवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
यंदा प्रथमच मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या दारी जाऊन कापसाची खरेदी केलेली आहे. आता अंतिम टप्प्यामध्ये जागोजागी खरेदी केंद्र झाली आहेत. मात्र, कापसात असलेल्या पाला चोळ्याच्या नावाखाली एक क्विंटल कापसामागे अर्धा किलो कापसाची “कटनी” सध्या अनेक कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या कापसावर लावली जात असल्याचा प्रकार अमरावतीत सर्रास सुरू आहे. त्यामुळे बाजार समितीचा अंकूश असणे गरजेचे झाले आहे.
संबंधित बातम्या :
रब्बी हंगामानंतर उन्हाळी मूग लागवड ठरते फायदेशीर, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?