Grape Export : उत्पादनात घट त्यात शेतीमाल निर्यातीच्या धोरणामुळे दुष्काळात तेरावा

प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार मिळेल असे धोरण सरकारचे असायला पाहिजे. शिवाय तसा निर्वाळाही सरकारकडून केला जातो पण प्रत्यक्षात स्थिती ही वेगळीच आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे पदरी पडलेल्या उत्पादनातून का होईना शेतकऱ्यांना अधिकचा नफा होणे अपेक्षित होते पण तसे झालेले नाही. कारण द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही अजून चीनमध्ये द्राक्षाची निर्यातच झालेली नाही. त्यामुळे परकीय चलन शेतकऱ्यांना मिळालले नाही शिवाय दरवर्षी होणाऱ्या मालाचे यंदा करायचे काय असा सवाल आहे.

Grape Export : उत्पादनात घट त्यात शेतीमाल निर्यातीच्या धोरणामुळे दुष्काळात तेरावा
यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीचे धोरण ठरवले नसल्याने शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 5:10 AM

नाशिक : प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार मिळेल असे धोरण सरकारचे असायला पाहिजे. शिवाय तसा निर्वाळाही (Central Government) सरकारकडून केला जातो पण प्रत्यक्षात स्थिती ही वेगळीच आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे (Grape Production) द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे पदरी पडलेल्या उत्पादनातून का होईना शेतकऱ्यांना अधिकचा नफा होणे अपेक्षित होते पण तसे झालेले नाही. कारण द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही अजून चीनमध्ये (Grape Export) द्राक्षाची निर्यातच झालेली नाही. त्यामुळे परकीय चलन शेतकऱ्यांना मिळालले नाही शिवाय दरवर्षी होणाऱ्या मालाचे यंदा करायचे काय असा सवाल आहे. हे कमी म्हणून की काय रशिया आणि युक्रेन युध्दाचाही परिणाम निर्यातीवर झाला आहे. या देशामध्येही निर्यातीसाठी अडचणी येत आहेत. निसर्गाच्या लहरीपणानंतर द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष निर्यातीसाठीही तेवढाच संघर्ष करावा लागला आहे. सरकारने निर्यातीचे योग्य धोरण ठरवले असते तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता.

चीनमध्ये द्राक्ष निर्यातीस काय अडचण?

द्राक्ष निर्यातीमध्ये ‘अपेडा’ महत्वाची भूमिका असते. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी द्राक्षाची निर्यात केली जाते. मात्र, कोरोनानंतर चीन आयाती होणाऱ्या शेतीमालाबद्दलची धोरणे बदलेली आहेत. त्यांच्या नियमांची पूर्तता केली तरच तेथील कृषी विभाग हा आयातीसाठी परवानगी देत आहे. त्याअनुशंगाने हंगामाच्या सुरवातीला चीनच्या अधिकाऱ्यांनी येथील शीतगृह आणि वेष्टनासंबंधीच्या यंत्रणाची ऑनलाईनच्या माध्यमातून तपासणी केली होती. त्यावेळी त्यांनी आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, असे असतानाही अपेडाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप द्राक्ष बागायतदार संघाकडून केला जात आहे.

द्राक्ष निर्यात न झाल्याचा परिणाम काय?

यंदा केवळ चीन येथेच द्राक्ष निर्यात बंद होती असे नाही तर रशिया-युक्रेन युध्दामुळे येथील निर्यातीमध्येही अडचणी निर्माण झाल्या होत्या. या देशांमध्ये भारतातून लांब मण्याच्या सुपर, सोनाक्का आणि जम्बो द्राक्षाची निर्यात होत असते. या निर्यात होणाऱ्या द्राक्षाला प्रती किलो 45 ते 55 रुपये असा दर मिळतो. सध्या निर्यात सुरु असती तर 10 रुपये अधिकच्या दराने विक्री झाली असती. यामुळे देशांअतर्गत बाजारातही तेजी कायम राहिली असती. मात्र, उत्पादनात घट झाल्यानंतरही केंद्र सरकारने द्राक्ष उत्पादकांच्या समस्याच समजावून घेतल्या नाहीत.

गतवर्षी अशी झाली होती द्राक्षाची निर्यात

गतवर्षी तर कोरोनाचे प्रतिबंध होते. असे असतानाही देशातून रशियाला 24 हजार टन, चीनला 1 हजार 708 टन तर युक्रेनला 252 टन द्राक्षाची निर्यात झाली होती. यंदा आता हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही चीनला निर्यातच झालेली नाही. तर रशिया आणि युक्रेनला होणाऱ्या निर्यातीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तब्बल 250 कोटींचा फटका सहन करावा लागला आहे. यंदा केवळ युरोपीयन राष्ट्रांनी द्राक्ष उत्पादकांना तारले आहे.

संबंधित बातम्या :

PM Modi : पंतप्रधान मोदींनी मानले शेतकऱ्यांचे आभारही अन् एका ट्विटने दिले ‘पीएम किसान सन्मान योजने’बद्दल महत्वाचे संकेत

कृषी विभागाचे वरातीमागून घोडे, डाळिंब बागाचे नुकसान अन् हंगाम संपल्यानंतर आता कीड नियंत्रणाचे धडे

Excess Sugarcane : शेतकऱ्यांबरोबर साखर आयुक्तांचीही धावपळ, 90 लाख टन अतिरिक्त ऊस अन् दीड महिन्याचा कालावधी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.