Vegetable Price : अतिवृष्टीचा असा हा परिणाम, भाजीपाल्याच्या दरात दुपटीने वाढ, काय आहेत नेमके दर?

शेतशिवरातील घटलेल्या भाजीपाल्याच्या उत्पादनाचा परिणाम थेट आता शहरातील बाजारपेठेवर होत आहे. आवक वाढली की दरात घसरण आणि आवक घटली दरात वाढ हे बाजारपेठेचे सूत्रच आहे. सध्या नागपूर शहरात मागणीच्या भाजीपाल्याचा पुरवठा हा कमी होत आहे. अतिवृष्टीमुळे शेतातून भाजीपाला बाहेर निघालेला नाही. पुर आणि अतिवृष्टीमुळे भाजीपालाल्याचं नुकसान झाले आहे.

Vegetable Price : अतिवृष्टीचा असा हा परिणाम, भाजीपाल्याच्या दरात दुपटीने वाढ, काय आहेत नेमके दर?
अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले असून दरात दुप्पट वाढ झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 12:34 PM

नागपूर : शेतातील उत्पादन आणि पिके बहरण्यासाठी (Rain) पाऊस हा गरजेचा असतो. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की काय होते त्याचा प्रत्यय सध्या येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सबंध राज्यात पावसाचा हाहाकार आहे. त्यामुळे उत्पादनवाढीचे सोडा शिवरात आहे ते पदरात पडेल की नाही अशी स्थिती आहे. अतिवृष्टीमुळे (Vegetable Damage) भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. तर पावसामुळे वाहतुकीचाही प्रश्न निर्माण झाल्याने (Vegetable Rate) भाजीपाल्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. वाढत्या पावसामुळे खरिपातील पिके तर धोक्यात आहेतच पण भाजीपाल्याच्या उत्पादनात देखील मोठी घट होत आहे. त्यामुळे दर वाढले तरी त्याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही. सध्या सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे. तर पावसामुळे नवीन लागवडही ठप्प असल्याने भविष्यात भाजीपाल्याचे दर गगणाला भिडणार यामध्ये शंका नाही.

पूर शेतात परिणाम शहरी बाजारपेठेत

शेतशिवरातील घटलेल्या भाजीपाल्याच्या उत्पादनाचा परिणाम थेट आता शहरातील बाजारपेठेवर होत आहे. आवक वाढली की दरात घसरण आणि आवक घटली दरात वाढ हे बाजारपेठेचे सूत्रच आहे. सध्या नागपूर शहरात मागणीच्या भाजीपाल्याचा पुरवठा हा कमी होत आहे. अतिवृष्टीमुळे शेतातून भाजीपाला बाहेर निघालेला नाही. पुर आणि अतिवृष्टीमुळे भाजीपालाल्याचं नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर वाढलेले असतात पण यंदा दरवाढीची तीव्रता ही अधिक आहे.

पालेभाज्यांवर अधिकचा परिणाम, पंचनामे करण्याची मागणी

पावसामुळे पालेभाज्यांचे अधिकचे नुकसान झाले आहे. यामध्ये पालक, मेथी, कोथिंबरचा सहभाग आहे. दुसरीकडे बटाटा, मिरची. कारले, वांगी यांचे नुकसान झाले नसले तरी मागणीच्या तुनलेत पुरवठा झालेला नाही. त्यामुळे नुकसान झालेल्या पालेभाजांचा पंचनामा करुन भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पालेभाज्यांची जोपासणा केली मात्र, ऐनवेळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला आहे. त्यामुळे नुकसाभरपाईची मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा

कसे आहे दराचे चित्र?

भाजी              आठवडापूर्वीचे दर               आताचे दर

फरसबी           170 रु. किलो                   320 रु. किलो

शिमला           80 रु. किलो                     120 रु. किलो

ढेमुस             100 रु. किलो                    140 रु. किलो

कारली          80 रु. किलो                     120 रु. किलो

फुलकोबी      80 रु. किलो                     120 रु. किलो

कोथिंबीर       120 रु. किलो                  160 रु. किलो

पालक         80 रु. किलो                      120 रु. किलो

मेथी             120 रु. किलो                     160 रु. किलो

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.