जनावरांच्या गोठ्यातूनच होतो लंम्पी आजार, प्रतिबंधात्मक उपायोजनेमुळे प्रादुर्भाव कमी
जनावरांच्या अंगावर गाठी निर्माण होतात आणि दुभत्या जनावराचे उत्पादन हे कमी होते त्यामुळे या साथीच्या आजाराची नेमकी कारणे काय आणि उपाययोजना काय हे पाहणे महत्वाचे आहे. याबाबच पशुवैद्यकीय अधिकारी डॅा. शैलेश केंडे यांनी माहीती दिलेली आहे.
नंदुरबार : जिल्ह्यात जनावरामध्ये (Lumping diseases,) लंम्पी आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. या संसर्गजन्य आजारामुळे कमी कालावधीत अधिक जनावरांना याची लागण झाली आहे. (Nandurbar) त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात लासिकरणाला सुरवात करण्यात आली होती आता पर्यंत जिल्ह्यात दोन लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. लंम्पी हा जनावरांना होणारा त्वचा रोग (vaccination) असून तो संसर्गजन्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेतली तर या आजाराची लागणच होणार नाही.
शिवाय हा त्वचा रोग असल्याने याची लागण झाली तरी जनावर दगावले आहे अशी एकही केस समोर आलेली आहे. मात्र, जनावरांच्या अंगावर गाठी निर्माण होतात आणि दुभत्या जनावराचे उत्पादन हे कमी होते त्यामुळे या साथीच्या आजाराची नेमकी कारणे काय आणि उपाययोजना काय हे पाहणे महत्वाचे आहे. याबाबच पशुवैद्यकीय अधिकारी डॅा. शैलेश केंडे यांनी माहीती दिलेली आहे.
लंम्पी हा जनावरांना होणारा त्वचा रोग असून तो संसर्गजन्य आहे त्यामुळे त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असतो यात जनावरांच्या अंगावर मोठ्या आणि छोट्या गाठी उठत असतात .त्यामुळे गुरे अशक्त होत असतात. त्याचा फटका जिल्ह्यात दुध उत्पादनाला बसला आहे. जिल्ह्यातील 365 गावात या रोगाची लागण झाल्याचे समोर आले होते सर्वाधिक लसीकरण नवापूर तालुक्यात झाले 65 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आता पर्यंत २ लाख गुरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे अजून २६ हजार गुरांचे लसीकरण बाकी आहे.
कशामुळे लागण होते लंम्पी रोगाची ?
काळाच्या ओघात शेती पध्दतीमध्ये बदल झालेला आहे. त्याचबरोबर जोडव्यवसायही वाढत आहे. मात्र, हे करीत असताना जमिनीच्या आणि जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. जनावरांना लीम्पी रोग होण्याचे कारणही तसेच आहे. जनावरांच्या गोठ्यातील गोचिड, माश्या, टिक्स यांच्या मार्फत या लंम्पी आजाराची लागण होते. गोचिड किंवा चावणाऱ्या माशा यामुळे जनावरंच्या अंगावर गाठी असणारे फोड येतात व त्यामध्ये पू होतो. हा संसर्गजन्य रोग असल्याने इतर जनावरांनाही त्याची लागण होते. लसीकरणामुळे यावर लागलीच नियंत्रण मिळवता येते.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी
आजही ग्रामीण भागातील गोठे सर्व सोईयुक्त नाहीत. गोठे हे अंधार कोठडीचे असतात. यामध्ये सातत्याने अंधार असतोच पण हवा देखीव खेळती राहत नाही. त्यामुळे गोचिड, माशा आणि गोमाश्या यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गोठ्यामध्ये सुर्यप्रकाश येणे आवश्यक आहे. शिवाय खळती हवा राहण्यासाठी गोठ्याची बांधणी योग्य प्रकारे गरजेची आहे. अन्यथा गोठ्यातील कपारी, क्रक्स या अंधार कोठडीत गोचिड, माशा बसतात आणि खूप अंडे टाकतात. हेच अंडे पुन्हा जनावरांच्या अंगावर बसतात. जनावरांचे रक्त पितात असाच हा उपक्रम सुरु असल्याने लंम्पी आजाराची लागण होती. तर शेतकऱ्यांनी गोठा स्वच्छ आणि हवा खेळती राहील अशा ठिकाणी बांधणे आवश्यक आहे. शिवाय गोठ्याच्या भिंतीला चुनखडीचा कलर दिला तर गोचडी, माशा यांचे प्रमाण कमी होणार आहे.
गोमाशी, माशी यांचे उत्पादन वाढू नये म्हणून घ्यावयाची काळजी
जनावरांचा गोठाा ह स्वच्छ असायला पाहिजे एवढेच नाही तर गोठा सातत्याने कोरडा असायला पाहिजे. शिवाय गोठ्यामध्ये कपारी नसायला पाहिजेत त्यामुळे गोमाशी आणि माशांचे प्रजोत्पादन होणार नाही. चुनखडीला एक उग्र वास आहे. त्यामुळे गोमाशी आणि माशा गोठ्यात वाढणार नाही. याची काळजी शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. शिवाय मंडळाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लिम्पी या संसर्गज्यन आजारावरील लस ही उपलब्ध आहे. शेतरकऱ्यांना कोणत्याही कादगत्राशिवाय मोफत ही लस दिली जाते. लिम्पी आजाराचा संसर्ग जर झपाट्याने वाढत असला तर त्या गाव परिसरातील 5 किमी अंतरावरील जनावरांचे लसीकरण हे केले जाते. (Lympi disease occurs in animal shed, preventive measures important)
जिल्ह्यात आता पर्यंत गुरांचे पूर्ण करण्यात आलेलं लसीकरण .
नंदुरबार तालुका 39 हजार 144
अक्कलकुवा तालुका 30 हजार 439
शहादा तालुका 40 हजार 600
नवापूर तालुका 65 हजार 513
धडगाव तालुका 35 हजार 500
तळोदा तालुका 27 हजार 300
संबंधित बातम्या :
कर्जमुक्तीसाठी आवश्यक असलेले आधार प्रमाणीकरण म्हणजे नेमंक काय?
तुटपुंज्या नुकसानभरपाईचा ‘असा’ हा निषेध, सडलेल्या सोयाबीनची होळी
कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा