Weather Report : राज्यातील 6 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट, पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट

राज्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसानं दडी मारली आहे. मान्सूननं दडी मारल्यानं राज्यातील 6 जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत.

Weather Report : राज्यातील 6  जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट, पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 10:37 AM

औरंगाबाद: महाराष्ट्रात जून महिन्यात दरवर्षीपेक्षा मान्सून पावसानं हजेरी लावली. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केली होती. राज्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसानं दडी मारली आहे. मान्सूननं दडी मारल्यानं राज्यातील 6 जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड,नंदुरबार,नाशिक अकोला धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Aurangabad Beed Nandurbar Nashik Akola Dhule districts facing problems due to low rain)

दुबार पेरणीचं संकट

महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनावेळी झालेल्या पावसाच्या जोरावर 22 जूनपर्यंत 27 टक्के पेरण्या पार पडल्या होत्या. मात्र, पावसात खंड पडल्यामुळे पेरणी केलेले शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांपुढं दुबार पेरणीरचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. कापूस, मका ,तूर आणि सोयाबीनच्या पिकांनी माना टाकल्याचं समोर आलं आहे.

अर्ध्या महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस नाही

नाशिक, धुळे, अकोला आणि नंदुरबार जिल्हे दुष्काळाच्या छायेत आहेत. यंदा 25 ते 50 टक्के कमी पाऊस झाला आहे. नंदुरबार मध्ये 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर नाशिक,धुळे,अकोला मध्ये 25 टक्के कमी पाऊस झाल्यानं दुष्काळाचं सावट आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलं आहे. निम्म्या महाराष्ट्रात पेरणी योग्य पाऊस नसल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.

राज्यात 7 आणि 8 जुलैला पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस 7 आणि 8 जुलै रोजी हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन दिवशी महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह राज्यात पाऊस हजेरी लाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या पुढील अपडेटस घेत राहावं, असं देखील सांगण्यात आलं आहे.

राज्यात कुठे पाऊस पडणार?

हवामान विभागानं राज्यातील काही भागात 7 आणि 8 जुलैला पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्याअंदाजानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

Weather Report : राज्यात मान्सून कधी परतणार, हवामान विभागाचा नवा अंदाज, जून महिन्यात कुठं किती पाऊस झाला? वाचा सविस्तर

Weather report: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा अंदाज

(Maharashtra Aurangabad Beed Nandurbar Nashik Akola Dhule districts facing problems due to low rain)

चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.