काजू लागवडीत महाराष्ट्राचे योगदान, ‘या’ जिल्ह्यांमध्ये भरघोस उत्पन्न
भारतामध्ये केरळ, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये काजूची मोठ्या प्रमाणात लागवड (cashew farming) केली जाते. काळाच्या ओघात महाराष्ट्रामध्येही शेती व्यवसयात अमुलाग्र बदल होत आहेत. काजूच्या शेतीमध्येही महाराष्ट्र हा आघाडीवर आहे.
मुंबई : सुक्यामेव्याच्या फळामध्ये काजूची गणना होते जी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या फळाच्या माध्यमातून लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम जी उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारी बाबींचा पुरवठा हा मानवी शरिराला होतो. काजूची लागवड प्रक्रीया ही किचकट असली तरी यामधून मिळणारे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय काजूला देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात मागणीही आहे.
भारतामध्ये केरळ, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये काजूची मोठ्या प्रमाणात लागवड (cashew farming) केली जाते. काळाच्या ओघात महाराष्ट्रामध्येही शेती व्यवसयात अमुलाग्र बदल होत आहेत. काजूच्या शेतीमध्येही महाराष्ट्र हा आघाडीवर आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन तर मिळत आहे पण या बदलत्या शेती पध्दतीमुळे शेती व्यवसयाबाबत रुची वाढत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रात (महाराष्ट्र) 1.91 लाख हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड केली जाते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, कोल्हापूर आणि सांगली हे जिल्हे काजूसाठी प्रसिद्ध आहेत. देशभरात 10.10 लाख हेक्टरावर काजूची लागवड केली जाते. या माध्यमातून वर्षाकाठी 7.45 लाख मेट्रिक टन उत्पन्न होते. काजू हे परकीय चलन कमावणारे प्रमुख पीक आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ होतो.
काजू भारतात कसा आला
कृषी तज्ज्ञांच्या मते काजूचा उगम ब्राझीलमध्ये झाला. 1550 च्या सुमारास ब्राझीलवर राज्य करणाऱ्या पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी 1563 ते 1570 या काळात पोर्तुगीजांनी प्रथम गोव्यात आणून तेथे उत्पादन सुरू केले, असे सांगून निर्यात करण्यास सुरुवात केली. हे एक नगदी पीक आहे जे कमी काळात जास्त नफा देते.
काजूसाठी योग्य जमिन आणि हवामान महत्वाचे
कृषी विभागातील तज्ज्ञांच्या मते, काजू हे उष्ण कटीबंधीय पीक आहे जे उष्ण आणि दमट हवामानात चांगले उत्पन्न देते. ज्या भागात पालापाचोळा किंवा थंडी जास्त काळ असण्याची शक्यता असते तेथे त्याच्या लागवडीवर परिणाम होतो. सपाटीपासून 700 मी. ज्या उंच भागात आणि ज्या ठिकाणचे तापमान 200 सेंटी ग्रेडपेक्षा जास्त आहे त्या भागात काजूचे चांगले उत्पादन पदरी पडते. किनारपट्टी लगतचा भाग आणि ज्या भागाची जमिन ही लालसर आहे त्या ठिकाणी काजूचे उत्पादन अधिक होते. म्हणूनच केरळ, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू या भागाच अधिकचे उत्पादन हे घेतले जाते.
हे आहेत काजूचे सुधारित प्रकार
विविध राज्यांसाठी काजूच्या सुधारित जातींची शिफारस राष्ट्रीय काजू संशोधन केंद्राने केली असून, त्यापैकी वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 6, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 8 वेंगुर्ला 9 हे प्रमुख प्रकार आहेत.
काजू कधी काढायचे
काजूची छाटणी मे मध्ये केली तर अधिक फायदेशीर राहणार आहे. झाडाच्या कोरड्या, कोमेजलेल्या फांद्या कापून टाकायच्या आणि कापलेल्या ठिकाणच्या टोकावर बोर्डो पेस्ट लावावी. त्यामुळे वाढही होते आणि फळ जोमात येते.
काजूची कापणी आणि साठवण
काजूची फुले येण्यास सुमारे 60 दिवस लागतात. काजू परीपक्व झाल्यास त्याची काढणी काम सुरु करावे लागते. यानंतर काजू अधिक चमकदार करण्यासाठी 3 ते 4 दिवस हलका सुर्यप्रकाशात ठेऊन त्याला कोरडे करावे लागते.
काजूचे सर्वाधिक उत्पादन कोठे आहे?
कच्च्या काजूच्या निर्मितीत भारताचा दुसरा क्रमांक आहे तर ‘आयव्हरी कोस्ट’चे नाव प्रथम आहे. काजू प्रक्रियेत भारताचा पहिला क्रमांक लागतो. देशातील पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीच्या भागात त्याचे सर्वाधिक उत्पन्न आहे. मैदानी भागात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. येथे दरवर्षी 2,25,000 टनांपर्यंत काजूचे उत्पादन केले जाते. (Maharashtra contributes greatly to cashew farming, over-cultivation in these states)
इतर बातम्या :
खाद्य तेलावरील आयातशुल्क कमी करुनही दर तेजीतच
भाजप-मनसे युतीचा नारळ फुटला, राज्यातील पहिली युती ‘या’ जिल्ह्यात जाहीर!
उद्धव ठाकरे म्हणाले, नंतर कॅप्टनला मैदान साफ करायला जावं लागतं, कनेक्शन काय?