ऊसतोडणी धिम्या गतीने तरीही साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच घोडदौड कायम..! कारखान्यांवर दबाव कशाचा?

यंदाच्या ऊस गाळप हंगामात दोन नवे अनुभव शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांच्या संचालकांना येताना दिसत आहे. क्षेत्र वाढले म्हणून उत्पादनात वाढ झाली असली दुसरीकडे याच वाढत्या क्षेत्रामुळे नियमित वेळात ऊसाचे गाळप होत नाही हे देखील तेवढेच खरे आहे. कारण अजूनही महाराष्ट्रातील 15 ते 20 टक्के क्षेत्रावरील ऊसाचे गाळप हे बाकी आहे.

ऊसतोडणी धिम्या गतीने तरीही साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच घोडदौड कायम..! कारखान्यांवर दबाव कशाचा?
ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 5:12 AM

पुणे : यंदाच्या (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगामात दोन नवे अनुभव शेतकऱ्यांना आणि (Sugar Factory) साखर कारखान्यांच्या संचालकांना येताना दिसत आहे. क्षेत्र वाढले म्हणून उत्पादनात वाढ झाली असली दुसरीकडे याच वाढत्या क्षेत्रामुळे नियमित वेळात ऊसाचे गाळप होत नाही हे देखील तेवढेच खरे आहे. कारण अजूनही (Maharashtra) महाराष्ट्रातील 15 ते 20 टक्के क्षेत्रावरील ऊसाचे गाळप हे बाकी आहे. ही एक बाजू असली तरी साखर उत्पादनात महाराष्ट्राने यंदा उत्तर प्रदेशलाही मागे टाकले आहे. उत्तर प्रदेशापेक्षा तब्बल 27 लाख टन साखरेचे अधिकचे उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे. 15 फेब्रुवारीपर्यंतचे हे चित्र असले तरी आगामी काळात महाराष्ट्रातीलच साखर कारखान्यांचे गाळप सुरु राहणार आहे. त्यामुळे उत्पादन अधिक वाढेल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

उत्पादन वाढूनही धास्ती कायम

यंदा पोषक वातावरणामुळे ऊसाचे उत्पादन वाढलेले आहे. महाराष्ट्रात 197 साखर कारखान्यांच्या माध्यमातून गाळप झाले असले अजूनही ऊस हा फडातच आहे. त्यामुळे उर्वरीत ऊसाचे गाळप होणार की नाही याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील ऊसतोडीचा प्रश्न कायम आहे. उत्पादन वाढले ही एक बाजू असली तरी कारखाना क्षेत्रातल्या ऊसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करु नयेत असे पत्रच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी संचालकांना दिले आहेत. त्यामुळे तोड होणार असली तरी ती लांबणीवर पडत असल्याने उत्पादनात घट हे कोणी टाळू शकणार नाही.

महाराष्ट्रातील साखर उत्पादनाची स्थिती

यंदा राज्यातील 197 साखर कारखान्यांच्या माध्यमातून गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. असे असताना राज्यात 86 लाख 15 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीपेक्षा 10 लाख टनाने साखरेचे उत्पादन वाढले असले तरी यंदा 10 साखर कारखान्यांची संख्या वाढली हे ही तेवढेच खरे आहे. असे असूनही वेळेत ऊसाची तोड झालेली नाही. त्यामुळे यंदा लागलीच कारखान्यांचे गाळप बंद होणार नाही तर टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे संकेत साखर आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

यामुळे रखडली ऊसाची तोड..

काळाच्या ओघात ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर हे प्रमाण अधिक वाढले आहे. मात्र, ऊसतोडणीचे यंत्र हे अधिकचे क्षेत्र असलेल्या भागातच वापरता येते. शिवाय लगत ऊसाचे क्षेत्र असले तर ते अधिक सोयीचे होते. पण पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात शेत जमिनीत चढ-उतार आहे. त्यामुळे मजूरांशिवाय पर्याय नाही. यंत्र सामुग्रीमध्ये वाढ झाली असली तरी त्याचा वापर पाहिजे त्या प्रमाणात झाला नसल्याने तोड ही रखडलेली आहे.

संबंधित बातम्या :

Banana : केळी निर्यात लांबणीवर, आता दरावर काय होणार परिणाम?

Success Story :  शेती व्यवसयात आयुर्वेदिक औषध कंपनीची मदत, करार शेतीतून चित्रंच पालटले..!

यंदाचं काय घेऊन बसलावं, 4 वर्षापूर्वीच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत गंगाखेडचे शेतकरी, आता उपोषणाचे अस्त्र

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.