Maharashtra Rain Update : कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अॅलर्ट, कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, मुसळधार सुरुच
हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
मुंबई:भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं कोकणाामध्ये मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याविषयी ट्विट करुन माहिती दिली आङे. संपूर्ण कोकण म्हणजेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये विक्रमी पाऊस झाला, असंही हवामान विभागाकडून कळवण्यात आलं आहे. हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईत सकाळपासून काही ठिकाणी रिमझिम पाऊस होत आहे.
19 Jul, 8.45 am Entire Konkan line including Mumbai Thane covered up with very deep clouds alongwith adjoining Arabian sea as seen in latest satellite obs. Thane Palghar Ratnagiri recorded extremely heaाvy fall in last 24 hrs with some huge numbers Will share the obs Follow IMD pic.twitter.com/qYDEqMebUF
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 19, 2021
राज्यात ठिकठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग
कल्याण डोंबिवली, नवी मुंबईत पाऊस
कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळी साडे नऊ वाजल्यापासून पाऊस सुरू आहे. पाऊस असाच राहिला तर काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. नवीमुंबई मध्ये जोरदार पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ऐरोली मध्ये पाणी साचल्याने चालकांना आपली गाडी पाणीतून काढावे लागत आहे. त्यामुळे जोरदार पाऊस पडत असल्याने वेगळ्या मार्गाचा वापर वाहनधारकांना करावा लागत आहे.
वसई विरारमध्ये रात्रीपासून रिमझिम
वसई विरार शहरात मध्यरात्री पाडून रिमझिम पाऊस सुरू आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसाने सध्यातरी सकल भागात कुठेही पाणी साचलेलं नाही. काल दिवसभर साचलेले पाणी आता पूर्णपणे ओसरले आहे. विरार ते चर्चगेट धावणाऱ्या दोन्ही दिशाच्या लोकल सकाळ च्या वेळेत सुरळीत सुरू आहेत. नालासोपारा रेल्वे ट्रैक वर ही पाणी साचलेलं नाही.उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे .मात्र, सध्या फक्त रिमझिम पाऊस सुरू आहे
सिंधुदुर्गमध्ये रात्रभर पाऊस
सिंधुदुर्गमध्ये रात्रभर पाऊस झाला.मात्र पहाटे पासून पावसाची थोडी विश्रांती.काल दुपार नंतर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.नदी नाले रात्री भरून गेले होते. मुसळधार पावसाचा कणकवलीला चांगलाच फटका बसला.सायंकाळी काही दुकानात पाणी शिरले होते. तर, नांदगावमध्ये ही काही घरात पाणी शिरले होते.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला रेड अॅलर्ट दिला आहे. रत्नागिरीत पहाटेपासून मुसळधार पाऊस होत आहे. तर, जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रत्नागिरीमध्ये चिपळूण, गुहागर, खेड परिसरात रात्रभर पाऊस पडतोय. पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिपळूण मधील शिवनदी व वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाणी भरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनानं केलं आहे.
रायगडला मुसळधार पावसानं झोडपलं
रायगड जिल्ह्याला पावसाने रात्रभर झोडपून काढले आहे. अलिबाग ते रामराज मार्गे रोहा रस्ता खचला आहे. सहाण येथे हा मार्ग खचला असुन या रस्त्याचा काही भाग वाहतुकीसाठी बदं केला आहे.तर खोपोली-खालापूर परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने खोपोलीतील लौजी या रहिवाशी भागात पाणी साचले होते. बाळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरुन पाणी गेले. डोणवत धरणाच्या निघणा-या पाण्यानं बाणगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पेण तालुक्यातील मायणी गावाकडे जाणा-या पुलावरुन पाणी जात असल्याने दोन्ही बाजुला नागरीक पाणी कमी होण्याची वाट पाहत बसले आहेत.
इतर बातम्या:
मुंबई का तुंबली?; पाच तासात 200 मिमी पावसाची नोंद; वाचा सविस्तर
Maharashtra Rain Update IMD issue Red Alert for various districts in Kokan and Western Maharashtra heavy rainfall continue at Raigad, Ratnagiri and Sindhudurg